देशातील अनेक चळवळी कलावंतांनीच यशस्वी केल्या : काकासाहेब खंबाळकर
ठाणे दि.(प्रतिनिधी) देशातील अनेक चळवळी कलावंतांनीच यशस्वी केल्या आहेत, कलावंत हा नेत्याची विचारधारा घराघरात पोहोचवण्याचं अतिशय महत्त्वाचं आणि अवघड काम आपल्या गायनाच्या शाहिरी कलेच्या माध्यमातून करत असतात तो कलावंत दूर्लक्षीत राहता कामा नये अशी भावना कलावंतांच्या प्रति रिपब्लिकन सेना पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समाजभूषण मा.काकासाहेब खंबाळकर यांनी ठाणे येथे व्यक्त केली, रिपब्लिकन सेना ठाणे प्रदेश आणि समता बहुउद्देशीय चैरीटेबल ट्रस्ट च्या वतीने आयोजित केलेल्या कलावंतांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ गौतम गोसावी संचालक जी जी पैरामेडीकल इन्स्टीट्यूट हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खाजामिया पटेल, महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीपती ढोले,डॉ अशोक झगडे, समता बहुउद्देशीय ट्रस्ट च्या अध्यक्षा श्रीमती वत्सलाबाई जाधव आदी विचार मंचावर उपस्थित होते, सदर कलावंतांचा सन्मान सोहळा कार्यक्रम ठाणे कोपरी येथील मंगला हिंदी हायस्कूल हॉल मध्ये रविवार दि ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला,
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात काकासाहेब पुढे म्हणाले की, आज बाहेर येथील मनुवादी व्यवस्थेने जसा गोंधळ घातला आहे तसाच गोंधळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळातही सामाजिक व्यवस्थेत जातीयवादी उच्च वर्णीयांनी भयानक गोंधळ घातला होता त्यातून अत्यंत कष्टाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिलेले हक्क अधिकार संविधानाच्या रुपात अबाधित राखण्यासाठी जागृत राहिले पाहिजे, कलावंतांना मी आवर्जून सांगतो की, आर एस एस नावाचा वैरी आपल्यात घुसून फुले आंबेडकरी चळवळ नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे, १९२५ ला कॉंग्रेसमधून बाहेर पडून आर एस एस ने आज देशातील सर्व महत्त्वाच्या यंत्रणांवर कब्जा करून भारतीय संविधानालाच धोका निर्माण केला आहे, त्यामुळे कलावंतांनी पूर्वीच्या जलसाकारांच्या पावलावर पाऊल टाकत आंबेडकरी चळवळीसाठी काम केले पाहिजे, आंबेडकरी बाण्याची रिपब्लिकन चळवळ भक्कम करण्यासाठी सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे,अशी उपस्थित कलावंतांना साद घालत कलावंतांमध्ये त्यांनी चैतन्य निर्माण केले, प्रमुख वक्ते श्रीपती ढोले यावेळी बोलताना म्हणाले की कलावंतांनी मरगळ झटकून आंबेडकरी चळवळीचा सांस्कृतिक दरारा वाढवण्यासाठी झटलं पाहिजे, आपली लेखणी आणि वाणी आंबेडकरी घराण्याच्या कामी आली पाहिजे, पूढच्या पिढीवर येणारी नवी गुलामी हाणून पाडण्यासाठी झपाटून कामाला लागले पाहिजे, त्याची सुरुवात झाली असं या कार्यक्रमातून मला ठाण्यात दिसून आली आहे, पत्रकार आबासाहेब चासकर ठाणे जिल्हा अध्यक्ष यांनी पूढील वर्षाची आखिल भारतीय आंबेडकरी जलसा परीषद घेण्याचा मानस जाहीर केला आहे, मी ठाणेकरांना धन्यवाद देतो, हा जागृतीचा विस्तव महाराष्ट्रभर पेटला पाहिजे असे उद्गार मा.ढोले यांनी काढले, समता बहुउद्देशीय चैरीटेबल ट्रस्ट चे संस्थापक बाबुराव वानखेडे यांनी सांगीतले की, ठाणे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व राजकीय गटांचे नेते कार्यकर्ते संस्था संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे, आपला राजकीय सहभाग असलाच पाहिजे, तरच आपले सामाजिक अस्तित्व टिकवून ठेवणे सोपे होईल,
पूढील काळात हा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी कलावंतांनी एकत्र येऊन रिपब्लिकन सांस्कृतिक कला मंचाची निर्मिती करुन या महाराष्ट्राला आदर्श घालून दिला पाहिजे,
आपल्या प्रास्ताविकात रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष पत्रकार आबासाहेब चासकर म्हणाले की, जागतिक चर्चेचा आणि आंबेडकरी समाजाचा अस्मितेचा मुद्दा दादर चैत्यभूमी येथील इंदू मिलच्या जागेचा लढा यशस्वी करणारे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या पाठीशी सर्व कलावंतांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, ज्या प्रमाणे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी पूर्वीचे जलसाकार ठामपणे उभे राहिले होते, म्हणून ठाण्यातून हि सुरुवात झाली तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.
या कार्यक्रमाचे पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन गीतकार भास्कर केदारे यांनी केले तर दुसरे सत्रं रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा गडांकुश यांनी सांभाळले, या कलावंत सन्मान सोहळ्याला ठाण्यातील आंबेडकरी कलावंतांनी भरभरून प्रतिसाद दिला, या कार्यक्रमात साठ कलावंतांना सन्मान चिन्ह सन्मान पत्र पुष्पगुच्छ आणि जयभीमचे निळे गमचे देऊन सन्मानित करण्यात आले, याप्रसंगी कलावंत विकास भंडारे, वसंत हिरे, संजय रोकडे, बबन जोंधळे राजू गोधम, राजरत्न राजगुरू, मनिषा मेश्राम, दैवशाला हराळे , अलका झेंडे, के पुरुषोत्तम, कामिनी धनगर, रमेश आव्हाड , शाहिर अशोक कांबळे, शाहिर बाळासाहेब जोंधळे, धनंजय सरोदे , मारुती शेलार, कविता भोसले, प्रशांत शिंदे आदी कलावंतांच्या कलेला उपस्थितांनी भरपूर दाद दिली,प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन सेना महाराष्ट्र रिपब्लिकन वाहतूक सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अलकाताई जगताप, ठाणे जिल्हा कोषाधयक्ष रामराव कांबळे, कार्यालय प्रमुख विनायक कांबळे,नवी मुंबई अध्यक्ष विरेंद्र लगाडे, ठाणे शहर अध्यक्ष बाबासाहेब येडेकर, भिवंडी शहर अध्यक्ष राबिया लोंगे, डॉ पद्माकर तायडे, व्ही जी सकपाळ, अशोक मगर, रामकुमार गायकवाड, उत्तम शिनगारे, शरद गांगुर्डे, सुभाष उघडे,जीतेश जाधव,विजय सावळे, ज्योती सोनकांबळे, संघर्ष शिरसाठ, सागर तायडे, मनोहर बोदडे, सुनिल शिंदे,आदी उपस्थित होते,
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत