भारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

बनवा बनवीचा खेळ!

विनायकराव जामगडे

दलित उपेक्षित शोषित समाजाचे अविरत शोषण सुरू आहे. कधी अंधश्रद्धेमुळे बळी दिला जातो धनप्राप्ती करिता बळी दिला जातो देवि देवताचा नवस फेडण्यासाठी द्लित आदिवासी समाजाच्या मानसाचा बळी देऊन पुण्य प्राप्त केले जाते. आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी नेहमीच गरीब मानसाला भक्ष्य केल्या जाते.उच्यजातीच्या लोकांचा नरबळी दिल्याचे ऐकिवात नाही. कमजोर व्यक्तीवर नेहमीच अन्याय अत्याचार केला जातो.
देववादी संस्कृती नेहमीच देवाचे महत्व वाढविण्यासाठी आपले प्रशिक्षित कार्यकर्ते समाजात कार्यरत ठेवत असून विषमतावादी संस्कृतीचा प्रचार व प्रसार केला जातो. समाजात रोगराई पसरत असेल तर देवांचा किंवा देविचा कोप झाला देवी रागावली असून तिला नरबळीची गरज आहे मग दलित गरीब मानसाचा शोध घेतला जातो व देवाला संतुष्ट करण्याकरिता त्याचा बळी दिला जातो.
विषमतावादी संस्कृती समाजात भेद कायम ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशिल असते उच्यजातीचे ‌श्रेष्ठत्व राखण्यासाठी नेहमीच पुराणकथा भजन किर्तनाचा उपयोग करून देवांनी राक्षसाचा कसा संहार केला याचे चविष्टपणे निरूपण करून समाजाला प्रभावित करून एका विशिष्ट समाजाविषयी घृणा निर्माण केली जाते. जगलात राहणारे राक्षस देवाला त्रास देत असत म्हणून देवांनी निरनिराळे अवतार घेऊन त्यांचा नायनाट केला. देव संस्कृतीचे रक्षण केले बदिस्त समाज आवरणाच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घेतली जाते यज्ञ संस्कृतीचे जतन करून समाजाला यज्ञ करण्यास प्रवृत्त केल्या जाऊन पंड्या पुजारी यांची सोय केली जाते..
समाज सतत देवधर्म व विषमतावादी संस्कृतीच्या दहशतीखाली जगत असतो. त्याची मानसिकताच त्या पद्धतीची घडविली जाऊन त्याची विचार करण्याची शक्ती कुंठीत केल्या जाते. आपल्या स्वतंत्र विचारांनी न जगता विषमतावादी संस्कृतीच्या दबावाखाली भिति ग्रस्त जीवन जगत असतात. वर्णव्यवस्थेनुसार एका वर्णाची तीन वर्णाच्या लोकांनी सेवा करावी जातीच्या उतरंडीमुळे एक जात दुसर्या जाती जातीत अंतराची दरी कमी न होता ती सतत वाढत जाईल ह्यासाठी नवनवीन प्रयोग करून येथील भांडवलदार व धर्माचे ठेकेदार कार्यरत असतात.बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षण अत्यंत आवश्यक आहे पंरतु बहुजन समाजाच्या विद्यार्थी प्रगत विद्ये शाखेत न जाता ज्यात बेकारीचा भस्मासुर उभा आहे त्यात ढकलल्या जातो नविन ज्ञानाच्या क्षेत्रात एकाधिकार निर्माण करून दुसर्याच्या प्रवेश होणार नाही याची खबरदारी घेतली जाते. याच भुमिकेतुन आरक्षण धोरणाचा विरोध केला जातो कारण आरक्षणामुळे बहुजन समाजातील गरीब विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होऊ शकते., म्हणून येथील भांडवलदार व वर्ण व्यवस्थेचे पुरस्कर्ते त्याचा विरोध करण्यासाठी आकाशपाताळ एक करतात.
दलित मुस्लिम द्वेष
आरक्षणामुळे समाज विभक्त होतो असा प्रचार करून भोळ्या बहुजन समाजाला आपल्या नांदी लावण्यासाठी मंदिर मंस्जिदचा वाद उकरून काढुन मुसलमान समाजा बरोबर बहुजन समाजाला भिडविले जाते. मुस्लिम समाजा विषयी अनेक गैरसमज पसरवून त्यांच्याविषयी द्वेष पसरविला जातो मुसलमान कितीही देशभक्त असला तरी त्याच्या निष्ठे विषयी शंका निर्माण केली जाते. दलित समाज आरक्षणाचा फायदा घेऊन मोठमोठ्या पदावर कार्यरत आहे बुद्धिचे काम करणाऱ्या सोबत बरोबरी करिता असल्यामुळे मनात सतत सलत असतो. दलित समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरनेने स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करतो हे विषमतावादी लोकांना नेहमीच खटकतं असते धर्माच्या आज्ञे प्रमाणे दलितांनी केवळ उच्च वर्णियाची सेवाच करावी् गुलामीलाच कव टाळीत राहावे. त्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करू नये धन संचय करून सवर्ण समाजाची बरोबरी करू नये हे गृहीत धरल्या जाते व तेच अपेक्षित असते. दलितशिक्षण घेऊन अनेक क्षेत्रांत स्पर्धा करू लागला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज उपाशी राहील परंतु मुला-मुलींना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असतो. शिक्षणामुळे शहाणपण येते राहणीमानात फरक पडतो.पाढरपेशा समाजाच्या एकाधिकाराला सुरुंग लावला जातो. समाजात समतेचे वातावरण तयार होण्यास मदत होते. ही समतेची चळवळ तीव्र करण्याचा प्रयत्नं करत असून विषमताव्द्यांना आव्हानं ठरत आहे. जो गावकुसाबाहेर राहुन जोहर मायबाप म्हणत होता तो ताठ मानेने समाजात वावरत असून देव धर्माची चिकित्सा करून बुद्धिनिष्ठ विवेक जागृत करण्याचे काम करितआहे हे विषमतावादी याना सहन होत नाही.त्याचे पर्यावसन दलित हत्याकांडात होत असते. देशांत अनेक दलितांची हत्या घोडयावर बसला म्हणून झाली तर त्याने सवर्ण समाजाची आज्ञा पालन करण्याचे नाकारले म्हणून झालेली आहे. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी येथे झालेली दलीत हत्याकांड ह्याच मानसिकतेतून झालेले आहे करणारे बहुजन समाजातील लोक आहेत. ते ब्राह्मणी व्यवस्थेने गुलाम आहेत‌.
बहुजन व दलीता मध्ये भांडण लावणयाचे काम सुरू आहे बहुजन समाज समतेच्या चळवळीचा विचार न करता ब्राह्मणी व्यवस्थेच्या हातचे खेळणे बनण्याचा प्रयत्न करित आहे हे खेदजनक आहे.
विनायकराव जामगडे
मो. ९३७२४५६३८९, ७८२३०९३५५६

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!