हिंदूराष्ट्र एक भ्रामक संकल्पना.
प्रा. डॉ. आर.जे. इंगोले
स्वामी विवेकानंद यांना आपल्या देशात हिंदू धर्माचे प्रचारक म्हणून सादर केले जाते पण हे सत्य नाही. आपल्या देशातील भटांनी हा भ्रम निर्माण केला आहे. प्रथम समजून घेतले पाहिजे. कारण स्वामी विवेकानंद हे अमेरिकेतील शिकागो येथे परिषदेला गेले आणि त्यांनी हिंदू धर्माची बाजू मांडली पण याचे वास्तव वेगळे आहे. ते आपण अगोदर समजून घेऊ. स्वामी विवेकानंद हे स्वत:च्या खर्चाने एक अभ्यासक म्हणून अमेरिकेला गेले होते. आणि त्या परिषदेत त्यांना बोलण्यासाठी वेळ सुद्धा दिला नव्हता. पण श्रीलंकेचे एक बौद्ध भिक्खू यांनी त्यांचा अर्धा वेळ यांना दिला आणि त्यामुळे ते बोलू शकले. येथे स्वामी विवेकानंद यांचे ब्राम्हणीकरण केले आहे आणि हा या भटांचा जुनाच धंदा आहे. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात की, “ आपल्या प्राचीन धर्मातून ब्राम्हण काढून टाकले तर जगातील सर्वोत्कृष्ट धर्म आपल्याला प्राप्त होईल.” ( संदर्भ – ब्र.पू.९ ) याचा अर्थ हिंदू धर्माला जर कोणी सर्वात जास्त बदनाम केले असेल तर तो वर्ग म्हणजे ब्राम्हण आहेत. ब्राम्हणाला चांगले माहीत आहे की, आपल्या देशात असणार्या लोकांना एखादे भावनिक इंजेक्शन दिले की, ते अनेक वर्ष त्याच्या नशेत जगतात आणि झाले तेच आपल्या बहुजन समाजाला कोणत्याही घटनेचा अर्थ माहीत नसतो. आणि जास्त चिकित्सा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. तशी त्यांची मानसिकता तयार केली आहे. बहुजन समाजाने या ब्राम्हण वर्गाला पृथ्वीवरील देव मानले आहे त्यामुळे यांना प्रश्न विचारने पाप समजले जाते. आणि या वर्गाकडे आर्थिक ताकद एवढी मोठी आहे की, ते या देशातील कोणत्याच व्यवस्थेला घाबरत नाहीत. साधी बाब आहे एखाद्या माणसाला थोडे जरी पैसे मिळाले तरी तो स्वत:ला इतरांपेक्षा काहीतरी वेगळे समजतो. गाडीत बसल्यावर रस्त्यावर चालणारे लोक त्याला फार क्षुल्लक वाटतात तर मग हे तर अनेक वर्षापासून या देशात सरकारच्या बजेटपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत हे आपल्या देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २८ फेब्रुवारी २००५ ला भारताचे बजेट मांडत असतांना हे स्पष्ट केले आहे की, भारतातील मंदिराकडे १३ हजारटन सोने आहे. ते सोने आपल्या देशाकडे असणार्या सोन्याच्या चारपाट आहे. आणि त्याचे मालक ब्राम्हण आहेत. तरी यात मंदिरे आणि ट्रष्ट यांच्या जमिनी धरल्या नाहीत आपण यात फक्त सोने आणि रोख रक्कम धरली तर २२ लाख कोटी आणि आपल्या देशाचे बजेट ५ लाख ५४ हजार कोटी म्हणजे आपल्या देशाच्या चारपट ताकद जर या ब्राम्हण म्हणजे शंकराचर्याकडे आहे, तर मग ते कोणाला घाबरतील ? आणि यासाठीच त्यांनी सामान्य बहुजन समाजाला असे भावनिक इंजेक्शन देऊन टाकले आहे. म्हणजे या देशात वास्तव काय चालले आहे ते कोणाला कळू नये. ब्राम्हणाचे एक विशेष आहे त्याला जेंव्हा असुरक्षित वाटते तेंव्हा तो इतर बहुजन समाजाला आपल्याबरोबर घेतो आणि काम संपले की, बाजूला करतो. राम मंदिर आंदोलन सुरू केले की, मग त्यांना ओबीसी पाहिजे कारण त्याला त्यावेळी हिंदू म्हटले जाते आणि जेंव्हा ओबीसीला आरक्षण द्यायची वेळ आली मग मात्र गुणवत्तेला बाधा येते. याचा विचार आपल्या बहुजन ओबीसी वर्गाने केला पाहिजे. म्हणजे बहुजन समाजाला आवश्यक तेंव्हा हिंदू आणि आवश्यक तेंव्हा ओबीसी,आदिवासी ,भटके असा वापर केला जातो. आणि मग अशा परिस्थित आपल्याला हिंदूराष्ट्र संकल्पना किती भ्रामक आहे आणि तिचे वास्तव काय आहे याचा गांभिर्याने विचार करण्याची आज गरज आहे नाही तर आपल्या भावी पिढीचे आपण फार मोठे नुकसान करणार आहे.हिंदूराष्ट्र संकल्पनेची आपण जर भौगोलिक व्याप्ती पाहिली तर ती म्हणजे यांना असे राष्ट्र तयार करायचे आहे की, ज्यामध्ये भारत ,पाकिस्तान ,श्रीलंका ,अफगाणिस्तान आणि नेपाळ असा एक मोठा देशसमूह म्हणजे हिंदू राष्ट्र आहे. आता यावरून आपणास ही संकल्पना जी अनेक हिंदू मानणार्या लोकांनी आपल्या मनात साकारली आहे ती किती पोकळ आणि अशक्य बाब आहे हे लगेच लक्षात येईल. आणखी खूप अशा बाबी आहेत की, ज्या ब्राम्हण वर्गाला सुद्धा पटणार नाहीत आणि इतर बहुजन समाजाला सुद्धा पटणार नाहीत. की,जसे आपल्याला एखादा डोंगर दुरून पाहिला तर किती मोहक वाटतो पण जेंव्हा जवळ म्हणजे डोंगरावर जायची वेळ येते तेंव्हा पहिले तर जाण्यास खूप कष्ट लागतात आणि सर्वात महत्वाचे वर गेल्यावर तिथे फार मोठे दगड आणि झाडे ज्यात काही काटेरी असतात आणि मग समजते की, अरे हा डोंगर तेवढा सुंदर आणि मोहक नाही जेवढा आपण दुरून पाहिला होता. आता इथे तरी आपण त्या डोंगरावर जाऊन पाहू शकतो पण इकडे तर हिंदूराष्ट्र हे मृगजळ आहे जे दिसते पण आपण त्याचा वास्तवात अनुभव कधीच घेऊ शकणार नाही. टांग्याच्या घोडयाला जसे समोर हिरवे गवत बांधले जाते आणि त्याला वाटते आपण थोडे पुढे चालावे आणि गवत घावे पण पुढे चालले तर टांगा चालतो आणि त्याला हे आमिष दाखवले जाते आणि दिवसभर त्याच्याकडून काम करून घेतले जाते तसे आपले होणार आहे. आपला वापर हिंदूराष्ट्र दाखवून त्यांच्या स्वार्थासाठी करून घेतला जाणार आहे. आपण कल्पना करू की, हिदूराष्ट्र झाले तर काय होईल आणि मग यामागे धावणारे जे लोक आहेत त्यांना कसा पश्चाताप होणार आहे. हिंदूराष्ट्र झाल्यावर आपल्या देशात मनुस्मृतीचा कायदा लागू होईल हा सर्वात मोठा धोका आपल्या समाजाला होणार आहे. आणि सर्वात मुख्य उद्देश आर.एस.एस. चा हाच आहे की, त्यांना भारताचे संविधान जे सामान्य लोकांना हक्क आणि अधिकार देते ते काढून घ्यायचे आहे. मग हिंदूधर्माचे शंकराचार्य आणि त्यांचे अनुयायी साधू तुमचे मालक असतील ज्यांनी आज देशात किती मोठा हाहाकार माजवला आहे. कारण गोवर्धन पीठाचे जगतगुरु काही वर्षापूर्वी म्हणाले होते की, “ हिंदू धर्माने अस्पृश्यता स्वीकारली असून काही माणसे जन्मजात अस्पृश्य आहेत असे हा धर्म मानतो.” तसेच दुसरी घटना म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडककरांनी या लोकशाहीप्रधान देशाला स्वतंत्र भारताची घटना सभागृहाला सादर केल्यानंतर त्यावेळचे जेरेशास्त्री आणि नंतर नाशिक पीठाचे शंकराचार्य यांनी घटनेची गंगेच्या पाण्याशी तुलना केली आणि म्हटले की, “ घटनेचे जनकत्व डॉ. आंबेडकरासारख्या अतिशुद्राकडे आल्यामुळे ही गंगा गटारातून आली आहे.” आणि २०१४ नंतर आपल्या चुकीने झालेले संसद सदस्य आणि साधू काय काय बरळतात हे आपण मागील दहा वर्षात पाहिले आहे. मनुस्मृतीचा कायदा हिंदूराष्ट्रात लागू झाल्यावर या महिला सक्षमीकरण आणि महिला सन्मानासाठी काम करणार्या महिलांना घरात बसावे लागेल आणि कोणतेही शिक्षण घेण्याचा आणि पुरुषाबरोबर कोणत्याही क्षेत्रात काम करण्याचा अधिकार काढून घेतला जाईल आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेले स्त्री शिक्षणाचे कार्य व्यर्थ जाईल. आणि महिलांना बाहेर पडण्यास बंदी असेल हे सुद्धा या ज्या महिला आहेत ज्या हिंदूराष्ट्र समर्थनार्थ बाहेर रस्त्यावर येत आहेत त्यांनी हे लक्षात घ्यावे की हिंदूराष्ट्राचे खरे स्वरूप काय आहे? आणि यात वर्णाश्रम व्यवस्था असल्यामुळे आपापली कामे वाटून दिली आहेत. मग आता सेवा कोणी करावी तर शुद्रांनी मग जे आज सेवा क्षेत्र आहे यात अनेक क्षेत्र येतात ( आय.आय.टी. सुद्धा यात आहे ) मग द्या राजीनामे आणि राखीव ठेवा हे क्षेत्र फक्त शुद्रासाठी कारण जेंव्हा असे आधुनिक क्षेत्र जगात कुठेच नव्हते तेंव्हा या ब्राम्हण लोकांनी वर्णव्यवस्था लागू केली आहे. पण आज सर्वात जास्त ब्राम्हण हे सेवा क्षेत्रात आहेत. क्षेत्रीय आहेत आणि कांही प्रमाणात वैश्य सुद्धा आहेत. मग आज जे फार मोठया दिमाखाने म्हणतात की, आम्ही क्षत्रिय आहोत त्यांनी फक्त सैन्यातच जावे इतर क्षेत्र सोडून द्या आहे का हिंमत सोडण्याची ? आणि रस्त्यावर तर हेच असतात हिंदूराष्ट्राच्या बाजूने आणि तेही या भटांच्या इशार्यावर यासाठी अगोदर कोणत्याही घटनेचा अभ्यास केला पाहिजे आणि मग त्यावर अंमल केला पाहिजे. कोणी आपल्याला सांगतो आणि आपण लगेच निघाले रस्त्यावर म्हणजे तुमच्या मेंदूवर इतर कोणीतरी कंट्रोल करीत आहे आणि हे खूप भयंकर आहे. आज ब्राम्हण हा फक्त लोकाना धर्मच सांगत नाही तर अनेक क्षेत्रात काम करीत आहे. आणि मनुस्मृती प्रमाणे या ब्राम्हण लोकांना समुद्र ओलांडता येणार नाही ,दारू पिता येणार नाही आणि मांसाहार करता येणार नाही पण आज हे सर्व करतात हे सर्व समाजाला माहीत आहे. जोपर्यंत बहुजन शिक्षण घेत नव्हता म्हणजे यांनीच बंदी आणली होती तोपर्यंत आपल्या देशात सर्व मोठया पदावर हेच ब्राम्हण होते पण आज बहुजन समाज शिक्षित झाला आणि त्यामुळे तो अनेक क्षेत्रात काम करीत आहे आणि मग आता ब्राम्हण हे सर्वात जास्त बाहेर देशात आहेत. आणि आपल्या देशातील न्यायव्यवस्था ,प्रशासन यात मोठया पदावर आहेत आता या भटांनी शिक्षण क्षेत्र सोडले आहे यांचे प्रमाण कमी होत आहे आता आपल्याला प्राध्यापक ,शिक्षक असे ब्राम्हण दिसत नाहीत ते सचिव ,कुलगुरू अशा प्रशासकीय पदावर काम करीत आहेत.जगातील ब्राम्हण हे एवढी धूर्त आणि स्वार्थी आहेत, की, लोकांना सांगायचे आपल्याला हिंदुराष्ट्र करायचे आहे. आणि त्याचे सर्व नियम इतर बहुजन समाजाला सांगायचे आणि आपण स्वत: मात्र सर्व फायदे घेत राहायचे असे यांचे षड्यंत्र आहे. मुळात हिंदुराष्ट्र यामधील हिंदू शब्द यांनी हेतुपूर्वक तयार केला आहे. खरे तर यांना ब्राम्हणराष्ट्र निर्माण करायचे आहे पण असे सांगितले तर इतर बहुजन समाज आपल्या मागे येणार नाही म्हणून एक हिंदू शब्द जोडला आहे. पण आपला बहुजन समाज वाचत नाही चिंतन करीत नाही, एखाद्या गोष्टीची चिकित्सा करीत नाही फक्त अंधपणे या भटांच्या मागे पळत असतो आणि यांनी एकदा या बहुजन समाजाची नाडी ओळखली की, ते बरोबर यांचा वापर करतात. आज मुस्लिम समाजाबद्दल एक गैरसमज निर्माण करून आक्रोश मोर्चे काढले जात आहेत पण या मोर्चात किती ब्राम्हण असतात ? किती यांची तरुण मुले आणि बायका असतात ? याचा विचार आपल्या हिंदू म्हणून घेणार्या बहुजन समाजाने केला पाहिजे. म्हणजे हे आपल्याला रस्त्यावर यायला सांगतात आणि हे मात्र ए.सी. मध्ये बसलेले असतात उद्या काही केसेस झाल्या तर आपले तरुण आहेत हा यांचा ब्राम्हणी कावा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या सर्व महापुरुष आणि संत यांनी केलेल्या कार्याचा आपणास विसर पडला आहे तो आपणास पुन्हा आठवावा लागेल. आपल्या कोणत्या एखाद्या महापुरुषाने असे सांगितले होते की, हिंदुनो एकत्र या ,हिंदू खतरेमे है | आणि गर्व से कहो हम हिंदू है | अशा घोषणा कोणी जरी दिल्या तरी यामागे स्वार्थ आहे हे मात्र नक्की आहे. कारण हे स्वार्थी राजकारणी आपल्या महापुरुषांपेक्षा मोठे नक्कीच नाहीत. मग आपण आता आपण निश्चित केले पाहिजे की, यांचे ऐकायचे की, आपल्या महापुरूषांचे ? छ्त्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे रयतेचे राजे होते पण यांनी गो-ब्राम्हण प्रतिपालक केले आणि छ्त्रपती संभाजी महाराजांना धर्मरक्षक केले पण सत्य हे नाही असे आपल्याच विद्वान इतिहास तज्ञांनी आपणास सांगितले आहे.फॅसिस्टांची –मूलतत्ववाद्यांची दोन प्रमुख शस्त्र असतात एक अफवा आणि दुसरे फेक न्यूज ते झुंडशाहीला चिथावणी देऊन आपलं उद्दीष्ट साध्य करतात. त्यांचा विकृत तर्क असा असतो की, लोकशाही बहुमताने चालत असेल तर झुंडशाहीच्या मागे बहुमत असतं ना ? कोणता राजकीय पक्ष लोकशाहीवर शरसंधान करेल ? त्यांना (फॅसिस्टांना ) हेही माहीत असतं की, झुंडीला नांव देता येत नाही,अटक करता येत नाही ,तिच्यावर खटला चालवता येत नाही व तिला शिक्षा करता येत नाही. त्यामुळे खुन आणि दशहत अटकाव न करता चालू राहते. (संदर्भ : द फ्री व्हाईस –रविश कुमार )आणि याच तत्वाचा वापर करून आज आपला समाज वेठीस धरला जात आहे आणि त्याचा वापर केला जात आहे. जर आपणास या अशा समाजविघातक संस्थावर नियंत्रण करायचे असेल तर आपल्या देशातील सरकार आणि सर्वोच्च न्यायालय हे खंबीर असले पाहिजे. न्यायालय हे एक स्वतंत्र सरकारी संस्था आहे. त्यावर कोणाचा दबाव नसावा आणि तेवढेच न्यायाधीश सुद्धा सचोटीचे असले पाहिजे. याचा संदर्भात पंडित नेहरू एका ठिकाणी याबद्दल म्हणतात की, “ आपल्याला अत्युच्च सचोटी असलेले न्यायाधीश गरजेचे आहेत. त्यांच्या वाटेत कोणीही आले तरी ते कार्यकारी सरकारच्या विरोधात उभे टाकू शकतील. पुन्हा एकदा भारतात अशा प्रकारच्या न्यायधीशांची संख्या वाढेल ,अशी अशा आपल्याला ठेवता येईल.” ( संदर्भ : EPW 3 oct.2020) आता हा पंडित नेहरू यांचा आशावाद आपणास साकार होईल असे चित्र आज तरी वाटत नाही. मागे फेब्रुवारीमध्ये आपल्या देशात एक धर्मसंसद भरली आणि यात हिंदू धर्माचे साधू म्हणाले की, “ मुस्लिम लोकांना ठार मारल्यास त्यांना लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाईल.” तरी आपल्या देशातील प्रशासन आणि न्यायव्यवस्था काहीच बोलली नाही हे कशाचे द्योतक आहे. आज आपल्या देशात जातीयवाद इतका वाढला आहे की, लोक स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. पण यावर न्यायालय कोणतीच भूमिका घेत नाही. याचा अर्थ काय होतो की, यावर सरकारचा दबाव आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयातील न्यायधीश हे पत्रकार परिषद घेऊन सांगतात की, जे चालले आहे ते बरोबर नाही. आणि अयोध्याचा निर्णय देतांना न्यायापेक्षा त्यांना लोकभावना जास्त महत्वाची वाटते हे सचोटीला धरून नक्कीच नाही. कोणत्याही परिस्थितीत न्यायालय हे तटस्थ असले पाहिजे आणि त्यांचे निर्णय हे सत्याला धरून असावे लागतात. पण निर्णय हे पक्षपाती झाले आहेत असे वाटते आणि अयोध्येचा निर्णय झाल्यावर पुढील काळात त्यापैकी एका न्यायधीशाला राज्यसभेची खासदारकी मिळते याला काय म्हणावे ? २०१४ पासून आपल्या देशात न्यायालय, मीडिया आणि तपासयंत्रणा यावर संशय येईल असे त्यांचे वर्तन आहे. विचारधन या आर.एस.एस.च्या मुखपत्रिकेत गोळवलकर गुरुजी यांनी असे म्हटले आहे की, “ चतुर्वर्ण्यव्यवस्था ही ईश्वरनिर्मित आहे.” याचा अर्थ काय आहे तर यांना देशात हिंदूराष्ट्र या नांवाखाली खरे तर मनुस्मृती लागू करायची आहे. आज हिंदुना बरे वाटत आहे पण उद्या जेंव्हा याच हिंदुना ते गुलामीत आणतील तेंव्हा मग फार काही करता येणार नाही. आपल्याला आपल्या देशातील तरुण वर्गाला चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले पाहिजे. आणि म्हणून आपल्या तरुणांनी पहिले आपले शिक्षण पूर्ण करावे आणि आपल्या जीवनात या प्रतिगामी संघटना आणि त्यांचे कार्यक्रम यात कधीही सहभागी होऊ नये. हे हिंदू राष्ट्राच्या नांवाखाली जुनी वर्णाश्रम व्यवस्था आणत आहेत. यांचा हेतु कधीच साध्य होऊ देऊ नका. कारण आपल्या महापुरुषांनी आणि संतांनी जे कार्य केले आहे ते सार्थकी लागणार नाही. आता शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट ज्यावर मी जास्त विचार केला आहे की, आपल्या देशात वर्णव्यवस्था होती मग चार वर्ण होते ते म्हणजे ब्राम्हण ,क्षत्रिय ,वैश्य आणि शूद्र मग भारतात संविधान लागू झाले आणि तेंव्हापासून यामध्ये आज क्षत्रिय कोणी नाही ,वैश्य कोणी नाही आणि शूद्र सुद्धा कोणी नाही मग ब्राम्हण कसा शिल्लक राहिला ? याचा विचार केला तर असे लक्षात येते की, यांनी स्वत: जाणीवपूर्वक हे लोकांच्या मनावर बिंबविले आणि स्वत: ब्राम्हण श्रेष्ठ आहे त्यामुळे ते नांव तसेच चालू ठेवले. आपल्या बहुजन समाजाला कसे फसविले याबद्दल दक्षिण भारतातील सामाजिक क्रांतीचे लोकनायक व्ही.एस. पेरियार म्हणतात की,“ जो कहते है की, शिक्षा और नौकरीयोंमे आरक्षण १० वर्षो के लिए था ,क्या ओ ये जानते है की, ब्रह्मा ने सिर्फ दो पिढीयो के लिए ही ब्राम्हण होने का नियम बनाया थाउसके बाद खुद को ब्राम्हण कहनेवालोंको जुतेसे पिटने नियम बनाया था ?( संदर्भ : ऋग्वेद खंड – ७ , श्लोक ८५६ – पंडित वी.एस. पेरियार. )
प्रा. डॉ. आर.जे. इंगोले
नाशिक , मो: ९४२३१८०८७६ )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत