नळदुर्ग येथील माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे यांना मातृशोक
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग नगरीचे माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे यांच्या मातोश्री श्रीमती माणिकबाई अंबादास जगदाळे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९३ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे .
नळदुर्ग येथील आलियाबाद स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे माणिकबाई जगदाळे यांना आक्का या नावाने ओळखले जात होते. त्या मनमिळावु स्वभावाच्या होत्या. वृद्धापकाळामुळे त्या गेल्या कांही दिवसांपासुन आजारी होत्या. दोनच दिवसांपुर्वी त्यांना अस्वस्थ वाटु लागल्याने नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सकाळी उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात्य एक मुलगा, एक विवाहित मुलगी सुना, नातवंडे असा परीवार आहे. माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे यांच्या त्या मातोश्री होत्या त्यांच्यावर नळदुर्ग येथील आलियाबाद स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत