बौद्ध तलाठ्याची हत्या आणि संवेदनाहीन प्रशासन

२७ ऑगस्ट २०२४ रोजी आडगाव रांजेबुवा ता.
वसमत जिल्हा हिंगोली येथील तहसील कार्यालयात संतोष पवार या तलाठी अधिकाऱ्याचा डोळ्यात मिरची पूड टाकून तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला होता . सर्व जिल्हा हादरला .तलाठी संघटनेने राज्यभर काम बंद आंदोलन केले .आरोपीला त्याच दिवशी
अटक झाली .
एक सरकारी अधिकारी जो कर्तव्यावर असताना भर दिवसा क्रूरपणे खून झाला , याहून धक्कादायक घटना कोणती असेल . सरकारी अधिकारी जर या राज्यात सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल. आपल्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी हि प्रशासनाची आहे ,पण ती जबाबदारी पार पाडण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. हे प्रशासनाचे अपयश आहे .
हिंगोली जिल्ह्यातील एका सरकारी अधिकाऱ्याची हत्या होते पण कुठलाही लोकप्रतिनिधी त्यांच्या घरी भेट देण्यास गेला नाही .आमचे आमदार खासदार यांना एकदाही या दिवंगत अधिकाऱ्याच्या घरी भेट द्यावी असे वाटले नाही का , कारण अधिकारी हा बौद्ध आहे. म्हणून कदाचित त्याच्या घरच्यांना भेटणे हे अवाश्यक समजले नाही जातीवादी लोकप्र तिनिधींनी .
दिवंगत संतोष पवार यांच्या खून करणाऱ्या नराधमाला फाशी झाली पाहिजे , त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी दिली पाहिजे . प्रशासनानें हि तरतूद केली पाहिजे ,नाहीतर आमचा इतिहास संघर्षाचा आहे हि गोष्ट लक्षात ठेवावी.
जयभिम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत