महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

ब्राह्मणो के अश्लिल पुराण–डी.आर.ओहोळ


अनंगदान – मस्त्त्यपुराणातील ७० वां अध्याय..

एकदा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी “चातुर्मासात” घरात पोथी-पुराण लावण्याचा आग्रह धरला..

महाराज त्यांना वारंवार समजावून सांगायचे की, पोथ्या पुराणाचा काही उपयोग नाही. हे सर्व थोतांड आहे.

त्यामुळे तुम्ही देखील या पोथ्या-पुराणे लावू नये, असे राणीसाहेबांना महाराज समजावून सांगायचे. परंतु, राणीसाहेब काही ऐकायला तयार नव्हत्या. त्यांनी सासूबाईकडून म्हणजे मोठ्या राणीसाहेबांकडून पोथी लावण्याची परवानगी घेतली. तेंव्हा छत्रपती शाहू महाराज राणी साहेबांना म्हणजे लक्ष्मीबाईंना म्हणाले, आता तुम्ही पोथी लावतच आहात तर मत्स्यपुराणाची पोथी लावा..

पोथी लावण्याची परवानगी मिळालेल्या राणीसाहेबांनी आनंदाने मत्स्यपुराणाची पोथी लावण्याचे ठरविले. त्यांनी इकडे पोथी सुरु केली आणि तिकडे महाराज लंडनला निघून गेलेत.

दररोज एक अध्याय या प्रमाणे हा धार्मिक कार्यक्रम घरी सुरु झाला.

आणि, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, बरोबर ७० व्या दिवशी लंडनवरुन परत आले. सर्वांना आनंद झाला.

मग महाराजच राणीसाहेबांना म्हणाले, छत्रपती महाराजांना कोण विरोध करणार.?

आपण शांतपणे बसून हा ७० वा अध्याय ऐकावा, म्हणजे तेवढेच पुण्य पदरात पडेल.

त्या दिवशी राजवाड्यातील पोथी-पुराणे सांगणारा नियोजित भटजी तेथे आला. त्याची पाद्यपुजा झाली. म्हणजे त्या भटजीचे पाय धुण्यात आले. महाराज सोडून बाकीच्यांनी त्याचे दर्शन घेतले.

तो पाटावर बसला. समई लावण्यात आली. उदबत्या लावण्यात आल्या. सर्व वातावरण अगदी मंगलमय झाले आणि अशा मंगलमय वातावरणात त्या भटजीने ७० वा अध्याय सांगायला सुरुवात केली.

■ भटजी सांगू लागला – चातुर्मासात श्रावण महिण्यातील प्रत्येक सोमवारी ब्राह्मणेत्तर स्त्रीला सुगंधादि पाण्याने आंघोळ घालावी. तिला नवीन कपडे परिधान करण्यास द्यावीत. तिला अंलंकारादि भूषणाने नटवावे व हे सर्व झाल्यानंतर रात्री भोगण्यासाठी तिला ब्राह्मणाकडे सुपूर्द करावे व ब्राह्मणाने त्या ब्राह्मणेत्तर महिलेला यथेच्छ भोगावे..

जशीही त्या मत्स्यपुराणातील ७० व्या अध्यायातील मुक्ताफळे भटजीच्या तोंडून राणी-साहेबांनी ऐकली..

त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यांच्या पायाची आग मस्तकाला भिडली. त्यांचे सर्वांग थरथरु लागले. त्या रागाने बेभान झाल्या व पायातील पायताण घेऊन राणीसाहेब भटजीच्या अंगावर धावून गेल्या.

तेंव्हा शाहू महाराज राणीसाहेबांना म्हणाले, “असू द्या, राणीसाहेब, ते आपलेच काका आहेत.”

परंतु, राणीसाहेबांनी मात्र भटजींना हाकलून दिले. तेंव्हा पासून राजवाड्यातील पोथ्या पुराणे बंद झाली.

〰〰〰〰〰〰〰〰〰

असे होते आपले महाराज ते प्रत्येक गोष्ट उदाहरणाने पटवून देण्याचा प्रयत्न करायचे.

जिज्ञासू वाचकांनी मत्स्यपुराणातील ७० वां अध्याय जरुर पहावा/वाचावा. केवळ मत्स्यपुराणच नव्हे तर, युरेशियन ब्राह्मणांनी लिहिलेला कोणताही धर्मग्रंथ पाहा.

त्यात मुलनिवासी बहुजनांची आणि सर्व महिलांची केवळ बदनामीच आहे. दुसरे तिसरे काही नाही.

चार वेद, रामायण, महाभारत, गीता, मनुस्मृती, श्रुती, स्मृती, १८ पुराणे काहीही वाचा.

त्यामध्ये आपली बदनामीच आहे. कारण, हे सर्व साहित्य युरेशियन ब्राह्मणांना महत्व देण्यासाठी, त्यांना श्रेष्ठ ठरविण्यासाठी, त्यांचा गौरव करण्यासाठी, लिहिलेले आहे. व त्या सोबतच मुलनिवासी बहुजनांची बदनामी करण्यासाठी, त्यांचा अपमान करण्यासाठी, त्यांना कनिष्ठ समजण्याठी हे साहित्य निर्माण केले आहे. आणि, मनुस्मृतीमध्ये तर मुलनिवासी बहुजनांची त्यातल्या त्यात स्त्रियांची सर्वाधिक बदनामी करण्यात आली आहे.

( संदर्भ – राजातील माणूस आणि माणसातील राजा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज.)

लेखक – डी.आर.ओहोळ सर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!