नळदुर्ग नगर परिषदे समोर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन आज संपाचा दुसरा दिवस
नागरिकांच्या नगर परिषदे कडे फेऱ्या चालू . ” बेमुदत संपामुळे नागरीकांची हेळसांड “
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
महाराष्ट्र राज्यभर नगरपालिका संवर्ग अधिकारी संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी पुकारलेल्या बेमुदत बंद संप चालू आसुन या संपात नळदुर्ग नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन बेमुदत संप चालू केला आहे . आज संपाचा दुसरा दिवस आहे या संपामुळे नळदुर्ग नगर परिषद कडे नागरिकांच्या फेऱ्या वाढत आहेत अनेक नागरीकांची कामे खोळंबलेली दिसून येतात हा संप तात्काळ मिटावा आणि नागरीकाची कामे तात्काळ करण्यात यावेत अशा प्रकारची मागणी नागरिकातून होत आहे
बेमुदत संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले असून या निवेदना मध्ये जुनी पेन्शन योजना मिळावे आश्वासीत प्रगती योजना लागू करावी , सहाय्यक अनुदान एक महिना आगाऊ देणे , सातवा आयोग व महागाई भत्ता फरक देणे , सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचे व पक्के घर मिळावे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे सर्वसाधारण बदल्यांमधील जाचक अटी रद्द करणे आदी प्रमुख मागण्या सह सर्व कर्मचारी ठिय्या मांडून नगर परिषदेसमोर बसलेले असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत संप करणार आहोत अशा प्रकारची मागणी आजही वरिष्ठांकडे होत आहे या संपा मध्ये अजय काकडे नगर अभियंता वैभव चिंचोले पाणीपुरवठा अभियंता दिक्षा सिरसट कार्यालयीन अधीक्षक दिपक कांबळे स्वच्छता विभागाचे खलील शेख ,संघटिका राणूबाई सपकाळ तानाजी गायकवाड दस्तगिर जहागीरदार , विठ्ठल खंदारे , ज्योती बचाटे , आनंद खारवे , आण्णाराव जाधव , भिमसेन भोसले , सुरज काळे , प्रविण चव्हाण, नितीन पवार , सतीश आखाडे , सुशांत भालेराव , नवनाथ होड्राव्ह , सुशांत [ बाबा ] डुकरे , शहाजी येडगे , फुलचंद सुरवसे , एम जी भुमकर , खंडु नागणे , चंद्रकांत जाधव , सुरेश भालेराव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत