दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
आरे नतद्रष्ट्यांनो कुठे फेडाल हे पाप!
महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
सोमवार दि. 26 ऑगस्ट 2024
मो.नं. 8888182324
वर्ष 2014 पासून भारताला खऱ्या अर्थाने घरघर लागली आहे. 1947 चा स्वातंत्र्य नाकारुन 2014 ला स्वातंत्र्य मिळाले समजणाऱ्या या नालायक सरकारचा निषेध करावा तितका थोडाच आहे. भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा पार करुन अदानी, अंबानी सारख्या व्यापाऱ्यांच्या हातात देश गेला आहे. बळीराजाला भिकेला लावून आया बहिणींच्या अब्रूचे धिंडवडे काढून बेरोजगारांना देशोधडीला लावण्याचे पाप या नालायक (लायक नसलेल्या) सरकारने केले आहे. महागाईचा आगडोंब उसळून भारतीय रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीला हे सरकारच जबाबदार आहे. हे सर्व कमी होते की काय तर निवडणूकीत मतांची भिक मिळावी म्हणून माझ्या राजाचा पुतळा घाईघाईत उभारुन त्याचे उद्घाटन पवणतीच्या हस्ते झाल्याने नियतीला ते मान्य झाले नाही म्हणून आज माझ्या राजाचा पुतळा धाराशाही झाला. किती हि दुखःद आणि मनाला वेदना देणारी घटना घडली आहे. पुतळा उभारण्यासाठी सिमेंटमध्ये "जान" असून चालत नाही, तर बांधणाऱ्यांच्या काळजात "इमान" असावं लागतं आणि ते या सरकारच्या काळजात नाही.
मालवण येथे 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त मोठा गाजावाजा करत मतांच्या लाचारीसाठी पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. भ्रष्टाचाराची लागण झालेला महाराजांचा पुतळ्याच्या कामासंदर्भात स्थानिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. महाराजांनी 400 वर्षापुर्वी बांधलेले गड किल्ले अजूनही शाबूत असतांना आठ महिन्यापुर्वी उभारलेल्या महाराजांचाच पुतळा कोसळणे अतिशय दुर्देवी आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या काळजाला यामुळे धक्का बसला आहे. सरकार विरोधात तळपायाची आग मस्तकात गेली आहे. रस्ते खचणे, पुल कोसळणे, विमानतळाचे छत पडणे इतकेच काय तर प्रभू श्रीरामचंद्राच्या गाभाऱ्यात पावसाचे पाणी गळणे हि किती खेदाची बाब आहे. देवालाही यांनी सोडले नाही तर जनतेचे काय? अशा नतद्रष्ट सरकारच्या बेजबाबदारपणामुळे आज माझ्या राजाचा अवमान झाला आहे. या अवमानाचा बदला महाराजांचे मावळे या विधानसभा निवडणूकीत नक्कीच घेऊन या सरकारला यांची जागा दाखवतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत