Thangalan न पाहिलेला पण समजलेला सिनेमा…
पा_रंजीत दिग्दर्शित आणि अभिनेता चियान विक्रम यांच्या सुरेख अभिनयाने नटलेला हा सिनेमा इतिहासाच्या खोलात जाऊन सत्य बाहेर काढणारा ठरलेला आहे.
#भारताचा इतिहास हा सिंधू संस्कृतीचा सभ्यतेमध्ये दडलेला आहे. ही सिंधू संस्कृती नंतर नाग लोकांची संस्कृती बनलेली होती. या नाग लोकांचा देश म्हणजे भारत देश आहे आणि या भारताला बुद्धाच्या विचारांचा खजिना लाभलेला आहे. नाग लोकांच्या या देशांमध्ये सिंधू संस्कृती पासून ते तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धा पर्यंत 27 बुद्ध होऊन गेले आणि या परंपरेतील शेवटचे 28 वें बुद्ध म्हणजे सिद्धार्थ तथागत गौतम बुद्ध आहेत. यांच्या विचारांचा भारताच्याच नव्हे तर जगाच्या पटलावर प्रभाव पडलेला आहे. या बुद्धाच्या विचारांचा वारसा जपणारे, त्याला संरक्षित करणारे त्या काळात स्त्रिया होत्या. या स्त्रियांना नागणिका म्हणत असत. बुद्धांना नाग लोकांनी जिवंत ठेवलेला आहे. या भारत देशाचे मूळ मालक नागवंशीय लोक आहेत.
पा. रणजीत दिग्दर्शित #थंगलान चित्रपट हा भगवान बुद्धाच्या विचारांना मानणाऱ्या आणि त्या बुद्धाच्या विचारांचा संरक्षण करणाऱ्या नागनिकाचा प्रभाव कसा होता हा या चित्रपटाचा मुख्य भाग आहे. ही नागणिका बुद्धाचं कसं संरक्षण करते हे या चित्रपटात आवर्जून प्रमुख रूपात दाखवण्यात आलेला आहे.
#ब्राह्मण पुरोहित भगवान बुद्धाच्या विचारांना नष्ट करण्यासाठी त्या काळातील क्षत्रिय समजल्या जाणाऱ्या लोकांचा वापर करून बुद्धाच्या विचारांना नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असतात हे या चित्रपटात स्पष्ट दाखवण्यात आलेला आहे. याचाच अर्थ बुद्धाची विचारधारा नष्ट करण्यासाठी ब्राह्मणी विचारधारा काम करत आहे आणि या दोघांमध्ये लढाई चालू आहे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं वाक्य आणि इतिहास आपल्याला आठवला पाहिजे.
सोन्याचा खजिना शोधण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजेच बुद्धांच्या विचारांचा खजिना आहे. सोन म्हणजेच बुद्धांचे विचार जतन करण्यासाठी नागणिका कशा पद्धतीने ते वाचविण्यासाठी प्रयत्न करते हे यातून दाखविण्यात आलेले आहे.
भारताच्या इतिहासात स्त्रिया ह्या रक्षण करणाऱ्या महानायिका आहेत. म्हणूनच भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये महाकाली, तुळजाभवानी, जगदंबा, अशा विविध देव्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्या सर्व भारताच्या रक्षण करणाऱ्या महानाईका त्या काळातल्या महाराण्या होत्या.
परंतु #ब्राह्मणी व्यवस्थेच्या गुलामगिरीत अडकल्यानंतर आणि ब्राह्मणांच्या हातात इथली व्यवस्था आल्यानंतर स्त्रियांना गुलाम आणि दास बनवण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे. ग्रंथ आणि पुराणाच्या माध्यमातून स्त्रियांना गुलाम बनवण्यात आलं आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास,लढवय्या इतिहास गडप करण्यात आला. –
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत