नळदुर्ग येथे ऐतिहासिक किल्ल्या सह विविध ठिकाणी तिरंगा ध्वजारोहण संपन्न
अक्षरवेल महिला मंडळ व कविता पुदाले यांच्या वतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग या ऐतिहासिक शहरांमध्ये ऐतिहासिक किल्ल्यामध्ये तुळजापूरचे नायब तहसीलदार संतोष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नळदुर्ग मंडल विभागाचे मंडल अधिकारी जयंत गायकवाड तलाठी वायचळ नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे यांनी आपल्या टीम सह तिरंगा ध्वजाला सलामी दिली यावेळी गावातील सर्व विद्यार्थी पालक शिक्षक प्रतिष्ठित नागरिक पत्रकार आधी जण उपस्थित होते .
नळदुर्ग नगर परिषदेच्या वतीने नळदुर्ग नगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच नळदुर्ग येथील हुतात्मा स्मारक मध्ये नळदुर्ग येथील मंडळ अधिकारी जयंत गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नळदुर्ग येथील माजी सैनिकांनी तिरंगा ध्वजाला सलामी दिली तसेच जिल्हा परिषद कन्या प्रशाला नळदुर्ग येथे मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोह करण्यात आले शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राणी धनराज वाघमारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले शिवाय जयकुमार गायकवाड व सत्यशील नळदुर्गकर यांच्याकडून
भारतीय संविधानाचा ग्रंथ देऊन शाळेचा सन्मान करण्यात आला तर यावेळी अक्षरवेल महिला मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन दहावी मध्ये पहिली आलेली प्रबोधिनी दादासाहेब बनसोडे दुसरी अनुष्का शिवाजी गायकवाड तिसरी आहे करिष्मा चव्हाण या तिन्ही गुणवंत विद्यार्थीनीचा अक्षरवेल महिला मंडळाच्या अध्यक्षा शिल्पा पुदाले उपाध्यक्षा शांताताई ठाकुर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालिका उमा दयानंद जाधव आक्षरवेलच्या संस्थापिका कवियत्री कविता पुदाले वैशाली डुकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत