अ ब क ड – काडी संघाने लावली !-ज्येष्ठ पत्रकार आयु. रणजित मेश्राम
आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार व ज्येष्ठ पत्रकार आयु. रणजित मेश्राम
आरक्षणाच्या संविधानिक तरतुदीत अ ब क ड वर्गवारी व क्रिमिलेएर ची जोड सर्वोच्च न्यायालयाने सूचविणे हे गेल्या काही वर्षांपासून संघाने चिकाटीने केलेल्या द्वेषपेरणीचे फलित असल्याचे मत आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार व ज्येष्ठ पत्रकार आयु. रणजित मेश्राम यांनी इथे व्यक्त केले.
बानाई ने आयोजित भरगच्च बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सदर बैठक बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, उरुवेला काॅलनी इथे संपन्न झाली. प्रारंभी बानाई चे अध्यक्ष आयु .अरविंद गेडाम यांनी बैठक आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली.
या बैठकीला स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष आयु .जे. एस. पाटील प्रमुख वक्ते होते. त्यांनी आपल्या भाषणात सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती मध्ये आरक्षण या प्रकरणासोबत दि.०१ ऑगस्ट रोजी च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण वर्गिकरणाच्या निकालाबाबत अभ्यासपुर्ण विश्लेषण केले.
आयु . रणजित मेश्राम पूढे म्हणाले, प्रत्येक घटनेमागचे राजकीय डावपेच समजून घेणे महत्त्वाचे झाले आहे. अलीकडे ४० टक्क्यात सत्ता हे एका पक्षाचे ब्रिद झालेय. यासाठी एकेक मतपेटी पक्की करण्याच्या नादात ही वर्गवारी सूचल्याचेही ते म्हणाले. वर्गवारीचा पुरस्कार "अज्ञानातून " होत असण्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ते म्हणाले, दिर्घ विचार केला तर, अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी या एकसंघतेला कायम तडा यामुळे जाऊ शकतो. तडा न जाता एखादा प्रश्न सोडविता येऊ शकतो काय ? याचा जरूर विचार करावा. तसेच न्यायपालिका ही कार्यपालिका होऊ शकते काय ? अशीही विचारणा केली.
त्याचप्रमाणे आपली आंदोलने क्रियेवर प्रतिक्रिया (reaction) वळणाकडे जाणारं नाहीत. इतरांना कट्टर करण्यात प्रोत्साहित करतील असेही होऊ नये याची दक्षता घेतली जावी.
याप्रसंगी समता सैनिक दल रा. प्रवक्ते. आयु . प्रकाश दार्शनिक, आवाज इंडिया चे आयु. अमन कांबळे, बुद्ध विहार समन्वय समितीचे आयु. अशोक सरस्वती, युवा ग्रॅज्युएट फोरमचे आयु . अतुल खोब्रागडे, बुद्धिस्ट यूथ इम्पावरमेंटचे आयु. राजरक्षित, संयुक्त नागरी जयंती व बाहार फाऊं. व बाहो.चे आयु डॉ अशोक उरकुडे, VIPJP चे आयु एस. के. गजभिये, संविधान परिवार चे आयु राहूल मून , ससैदचे आयु प्रशिक आनंद, राष्ट्रीय चर्मकार संघाचे आयु लिलाधर कानडे, चर्मकार महासंघाचे अशोकराव जोनवाल, कास्टर्टाईब अध्यक्ष आयु अरुणजी गाडे, ऑफिसर्स फोरमचे आयु. सच्चिदानंद दारुंडे, आयु. धर्मेश फुसाटे, मानव अधिकार चे आयु राजू खोब्रागडे, आयु. नागदेवे सावनेर, आयु . रंगारी यांची प्रातिनिधिक संघटना स्वरूपात समयोचित भाषणे झाली. या भाषणातून "आमचा एकोपा तोडू नका ". आमचा १३ टक्केचा असलेला वाटा अबकड मधे २ ते ३ टक्क्यांवर आणूनही उद्धार होईल असे फसवे-प्रलोभन देऊन , एकजीव असलेल्या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाची पदे Not Found Suitable (NFS) च्या कत्तलखान्या मार्फत अनारक्षित (de-reserved ) करून *खुल्या प्रवर्गाच्या घशात घालण्याचे कुटील संघी षडयंत्राला अनुसूचित जाती जमाती च्या नागरिकांनी वेळीच ओळखून बळी पडू नये." उलट आपले शैक्षणिक उत्थानाकडे विषेश लक्ष देऊन शिक्षणातील गळती प्रमाण (drop out) थांबवून शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर, अ.जा. प्रवर्गातील 59ही जातींनी , संपूर्ण १३% जागांवरील आणि अ.ज. मधील सर्व जमातींनी ७% जागांवरील आपला दावा कायम ठेवावा. वर्गीकरणाचा संघी फास आता उघड होतं आहे. रोहीणी कमिशन मार्फत वर्गीकरणासाठी ओबीसी प्रवर्गाचा बळी घेणे सुनिश्चित केल्यानंतर एस्सी एसटीतला एकोपा न्यायालयामार्फत तोडणे, आदि बाबी काडी लावणार्या संघाच्या अंगलटी येतील. ही काडी EWS , खुला प्रवर्ग आदि संघी समर्थकांनाही धोक्याची घंटा ठरून अंगलटी येणार असल्याचा सूचक इशारा ठरू पाहत आहे. असा सूर या बैठकीतून उमटला. आपापल्या संघटनेच्या वतीने मनोगत व्यक्त करणार्या संघटना व्यतिरिक्त, समता सैनिक दल केंद्रीय संघटक आयु सुनील सारिपुत्तजी, आयु . गौतम फुलझेले नगर पंचायत संघर्ष, आयु. अनिल गरुडकर बहादूर संघर्ष, चर्म. महासंघाचे आयु. रुपेंद्र बसेशंकर, आयु ज्ञानेश्वर काकडे, महा.बॅंक समितीचे आयु रजनीश मेश्राम, RITTES चे आयु. वैभव बोरकर, ससैदचे आयु. नागसेन बागडे, भारतीय बौद्ध महासभेचे आयु. विशाल वानखडे, कार्स्टाईबचे आयु शामरावजी हाडके, पॅंथर अध्यक्ष आयु प्रकाश बन्सोड, स्व.मजदूर यु. चे आयु. नरेद्र जारोंडे, प्रेरणा नगर बुद्धविहार चे आयु. राज पाटील AIISC asso.चे आयु.रुबल साळवे, बुद्धिस्ट अका. पर्फा.आर्टचे आयु.अशोक जांभूळकर, मानव अधिकार संरक्षण मंचचे आयु. आशिष फुलझेले अमर बुद्ध विहार समिती चे दादा आवळे, ऑल इ..ससैदचे कानिलाल भांगे, लोकजागर चे आयु.जितेश भूरे ,ऑ.काॅ. सो.वे. चे मंगेश सोनटक्के, SC,ST,OBC, welfare asso.चे एस.बी. जांभूळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समितीचे आयु. केशवजी डोंगरे, AISc St asso.चे हेमराज दाहाट, मानव कल्याण चे आयु. धरमपाल आवळे , प्रबुद्ध जे.ना.चे इ.एस. सोमकुंवर, बुद्ध विहार मैत्रीचे सुर्यभान वैद्य, SEMचे आयु. संजय भूरे, बुद्ध विहार समिती चंद्रपूर चे चंद्रशेखर वनकर, ब. रि. सो.चे रमेश पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आमगाव गोंदिया चे प्रा.डी.एस. टेंभूर्णे व बानाई नागपूर परिवाराचे सदस्य मोठ्ठ्या संखेने उपस्थित होते.
शेवटी एकमताने …
१) आरक्षण वर्गिकरणा विरुद्ध व्यापक जनआंदोलन उभारावे ,असे एकमताने ठरविण्यात येतं आहे.
२) दिनांक २१/ ०८/ २०२४ बुधवार रोजी ” भारत बंद “च्या हाकेला प्रतिसाद म्हणून ” सकाळी ११.०० वाजेपासून दुपारी २.०० वाजेपर्यंत संविधान चौक येथे, काळी फीत लावून धरणे आंदोलन व २.३० वाजता संबोधन सभा आणि जिल्हा प्रशासनास निवेदन….
असे दोन ठराव पारित करण्यात आले.
उपरोक्त दोन्ही ठरावाचे उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समर्थन केले असून पुढील कृती आराखडा निश्चित करण्यासाठी – “आरक्षण हक्क संघर्ष समन्वय समिती निर्माण करण्यात यावी. असे ही सर्वानुमते ठरले.
दि.२१/०८/२४ च्या पुर्वतयारी साठी एक बैठक दि.१८/०८/२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता घेण्याचेही ठरले.
या बैठकीचे संचालन डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक अध्यक्ष आणि विविध सामाजिक लढ्यात सक्रिय भुमिका बजावणारे आयु. अनिल नगराळे यांनी केले.
सरतेशेवटी बानाई नागपूर सचिव जयंत इंगळे यांनी सर्व उपस्थित सन्माननीय संघटना प्रतिनिधी व सन्माननीय उपस्थितांचे आभार व्यक्त करुन अध्यक्षांचे परवानगी ने सभा संपन्न झाल्याचे घोषित केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत