घर घर तिरंगा देशभक्ती म्हणावी की,आर्थिक व्यवहार म्हणावा हेच समजत नाही !
विजय अशोक बनसोडे
( गंभीर सूचना : मागच्या दहा वर्षांमध्ये तिरंगा ध्वजाचा कधीच सन्मान न करणाऱ्या आर.एस.एस प्रणित भारतीय जनता पार्टीनं घर घर तिरंगा,हर घर तिरंगाच्या घोषणा देऊन राष्ट्रध्वजा प्रति असलेल्या निर्मळ भावना,प्रेम, आपुलकी,आदर संपुष्टात आणण्याचच काम करण्यात आलं आहे.तर भविष्या मध्ये ही काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी मिळून घर घर संविधान,हर घर संविधानचा नारा देऊन संविधानाची पायमल्ली करणे आणि संविधानामध्ये भेळ मिसळ करण्याचं षडयंत्र ही राबवलं जाऊ शकते.ते आपणास कळणार ही नाही.कारण आपण ही संविधानाचं वाचन कधीच करत नाहीत नां…)
भाग – 1 सामान्य :
1.2 भारताचा राष्ट्र ध्वज हाताने निर्माण केलेल्या सुतापासून ऊनी/सुती/सिल्क खादी कपड्याचा असावा.
1.3 भारताचा तिरंगा राष्ट्र ध्वज हा आकाराने आयताकार असावा. ध्वजाची लांबी आणि उंची (चौडाई) अर्थात अनुपात 3:2 असावा.
त्याच बरोबर राष्ट्र ध्वजाचे मान्यता असलेले आकार भारत ध्वज संहिता मध्ये दिलेले आहेत.त्या प्रमाणे राष्ट्र ध्वजाची निवड करण्यात यावी असा नियम आहे.
भारतीय तिरंगा ध्वज हा भारतीय नागरिकांच्या आशा आणि आकांक्षाचे प्रतिनिधित्व करतो. तिरंगा ध्वज हा भारत राष्ट्राच्या गौरवाचे प्रतिक आहे.त्यामुळे भारत राष्ट्राच्या ध्वजाप्रती प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनात प्रेम,आदर,निष्ठा असायलाच पाहिजे.
दि. 14/08/2024 रोजी,आज शासकीय कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होतो.जवळपास दुपारच्या साडेबाराच्या दरम्यान “उमेद” या संस्थेने घर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी गेट समोर गेटच्या आतच आपला डिजिटल स्टॉल लावला व तिरंगा ध्वज विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.तर आत मध्ये महिलांसाठी साड्या सुद्धा विक्रीला ठेवण्यात आलेल्या होत्या तिरंगा ध्वजाची किंमत सत्तर रुपये 70/- आणि साडीची किंमत 350/- रुपये असे दर होते.
मागच्या काही वर्षापासून भारतीय जनता पार्टीने तिरंगा ध्वजाचे सुद्धा अर्थकारणामध्ये रूपांतर करून गुजराती कंपन्यांना करोडोचे टेंडर देण्याचं काम केलं.भारत स्वातंत्र्यापासूनच भारतीय प्रत्येक भारतीय नागरिकाच्या हृदयामध्ये तिरंगा ध्वज कोरला गेला असताना सुद्धा भारतातील मूलभूत समस्या कडे दुर्लक्ष करून भारतीय नागरिकांच्या शिक्षण,आरोग्य,उद्योग, व्यवसाय,नोकरी,स्वास्थ्य याकडे पाठ फिरवून केवळ देशभक्तीच्या नावाखाली भारतीय नागरिकांना इमोशनल ब्लॅकमेल करण्याचं कामच या अभियानाच्या माध्यमातून होताना दिसत आहे.
साडीचा विषय वगळला तर महत्त्वाचा विषय शिल्लक राहतो तो म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अतिशय युनिक असे अभियान म्हणून घर घर तिरंगा ही मोहीम 13/14/15 प्रत्येक शासकीय आणि निम शासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहण करणे,त्याचे सरकारकडून जाहीर केलेल्या लिंक वरती फोटो अपलोड करणे,हे काम मोठे तेजीत चालू आहे.तर भारतात कोणत्या ही नागरिकांच्या पूर्व परवानगीशिवाय कॉलर धुन बदलून भाषण ऐकविणे इत्यादी…सुरु केले आहे.
परंतु महत्त्वाचा विषय असा आहे की, बाजारात मिळणारे आणि अशा प्रकारच्या स्टॉलवर मिळणारे तिरंगा ध्वज हे भारतीय ध्वजसंहितेला नियमाला धरून आहेत का ? भारतीय ध्वजसंहितेमध्ये ध्वजाच्या सर्व प्रकारच्या साईज आणि त्याचे सूत कोणत्या प्रकारचे असावे याच्या सक्तीच्या गाईड लाईन दिल्या असताना सुद्धा अशा प्रकारच्या स्टॉलवर विक्री करण्यात येत असलेले तिरंगे त्या क्वालिटीचे नाहीत,हे माहीत असताना सुद्धा राजरोसपणे तिरंगा ध्वजाचा अपमान करून ते विकले जात आहेत.
गुजरातच्या ज्या कंपन्यांनी हा प्रॉडक्ट तयार केला,सरकारकडून टेंडर देत असताना काही नियम अटी त्या कंपन्यांना लागू केल्या आहेत का नाहीत ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.खरं तर घर घर तिरंगा ही संकल्पना मनाला आनंददायी वाटत असली तरी भारतीय जनता पार्टी सरकारने तिरंगा ध्वजाची इज्जत कमी केली,हे मात्र प्रकर्षाने जाणवत आहे.
कदाचित आपल्या सर्वांना आपले लहानपण आठवत असेल अतिशय दुर्मिळ आणि मनामध्ये भीतीयुक्त आदर तिरंगा ध्वजाच्या बाबतीत प्रत्येकाकडे होता.ती भीती आणि भीतीयुक्त आदर आज तिरंग्याच्या तिरंगा ध्वजाच्या बाबतीत दिसून येत नाही.ही बाब नेमकं काय दर्शवते ? एक बाजूला तिरंगा ध्वजाच्या नावावर आणि अशा प्रकारच्या युनिक अभियानाच्या नावावर करोडो रुपयाचे टेंडर गुजरातला दिले जाते आणि अतिशय निकृष्ट दर्जाच्या कपड्याचे तिरंगा ध्वज घरा घरावर लावण्याचे आदेश देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देतात यास देशभक्ती म्हणावे की व्यवहार म्हणावा हेच समजत नाही.
विजय अशोक बनसोडे
लेखक / संपादक 8600210090
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत