पलटवार करण्याची वेळ आली आहे….!!
* भास्कर भोजने.
क्रांती प्रतिक्रांतीची लढाई ही प्राचीन काळापासून सुरू आहे. आजच्या काळातही तो लढा सुरू आहे…!!
प्रत्येक कालखंडात जी विचारधारा आपले ध्येय साध्य करण्यासाठी निकराने लढते ती विचारधारा त्या त्या काळात यशस्वी ठरते…!!
आज प्रतिक्रांती मुजोर झाली आहे. त्याचे कारण १९५० मध्ये रुजू होणाऱ्या भारतीय संविधानाने समतेचा आग्रह धरला आणि ही समता आपल्या साम्राज्यासाठी धोकादायक आहे हे इथल्या मुठभर सवर्णांनी हेरले. त्याच दिवसापासून संविधान संपवण्यासाठी मुठभर मनुवादी कार्यरत झाले. त्यांची संख्या कमी असल्याने ते समोरासमोरची लढाई लढतं नाहीत. ते छूप्या पद्धतीने लढतात. संविधान संपवण्यासाठी सवर्णांनी बुरखे पांघरले कुणी, सेक्युलर झाला. कुणी पुरोगामी, कुणी डावा, कुणी ऊजवा, कुणी समाजवादी तर कुणी लोकशाहीवादी. प्रत्येकाचे धेय्य मात्र एकच संविधान संपविणे…!!
सवर्णांनी बुरखे पांघरूण मोक्याच्या जागा काबीज केल्या आणि मग एका एका वाराने भारतीय संविधानाला नामशेष करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे…!!
भारतीय संविधानातील आरक्षणाच्या तत्वाची मोडतोड करायला सुरुवात झाली आहे. राज्यघटनेत कुठेही आरक्षण ५०% असावे असे नमूद नसतांनाही सवर्णांनी तसा निर्णय कोर्टाच्या तोंडी देऊन लागू करून घेतला. आणि उर्वरित ५०% जागा आपल्या सवर्ण समूहासाठी राखीव करुन घेतल्या….!!
ओबीसी समुहाचे आरक्षण संपवण्यासाठी क्रिमिलेअर आणून नंतर इम्पेरिकल डेटा चा आग्रह धरून ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली. आणि आता एस. सी. एस. टी. आरक्षणाचे वर्गीकरण करून एस. सी. एस. टी चे आरक्षण संपवण्याचं षडयंत्र यशस्वी करण्यासाठी सरसावले आहेत…!!
सवर्ण वारावर वार करीत आहेत आणि क्रांती दर्शी छावणी सामसूम असेल तर संविधान वाचणार कसे.??
ही लढाई आहे. लढा लढावा लागतो. वाराला पलटवार केला तरच तुमची धडगत आहे. नाही तर आपणं सपशेल पराभूत झालेले असु…!!
राजकीय पातळीवर ब्राम्हणी नेतृत्व असलेल्या किंवा सवर्ण नेतृत्व असलेल्या राजकीय पक्षाकडून आरक्षण बचाव लढाई लढता येणार नाही.मृगजळाच्या पाठिमागे लागू नये…!!
क्रांतीदर्शी समुहाला यशस्वी होण्यासाठी स्वबळावर निकराने लढणे अत्यावश्यक आहे. आरक्षणवादी समुहाची संख्या ओबीसी + एस.सी.+ एस. टी. ५४+१५+७= ७६% आहे. एकत्र येऊन ३% सोबतं लढायचं आहे…!!
क्रांती दर्शी छावणी कडे बहुमत आहे. शत्रू अल्पसंख्य आहे. त्याला परास्त करण्यासाठी पलटवार करण्याची नितांत गरज आहे…!!
धुर्त सवर्णांनी आरक्षणावर गदा येईल असे वार करायला सुरुवात केली आहे. आणि ते विजयी अविर्भावात वावरत आहेत आणि म्हणून आरक्षणवादी समूहाने पलटवार केला पाहिजे….!!
आरक्षणवादी समूहाने रस्त्यावर आंदोलन केले पाहिजे. आणि खडसावून जाब विचारला पाहिजे.
३% वाले प्रशासनातील ९०% जागांवर कोणत्या सुत्राने हक्कदार झाले..?
न्याय पालिकेतील कॉलेजिअम सिस्टम बंद झाली पाहिजे
आरक्षणवादी समुहाच्या आंदोलनातील मागण्या पाहून आणि ऐकून सवर्णांच्या लक्षात आले पाहिजे की, आता फार काळ आपणं आरक्षणवादी समूहाला मुर्ख बनवू शकतं नाही..!!
सवर्णांच्या लबाडीचा पर्दाफाश करण्या बरोबरच समतेच्या तत्वानुसार आणि न्याय भूमिकेतून आरक्षणाची गरज अधोरेखित करण्याची आवश्यकता आहे…!!
क्रांती दर्शी छावणी कडून जोरदार पलटवार करण्याची गरज निर्माण झाली आहे…!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत