कायदे विषयकदेशमहाराष्ट्रमुख्यपान

अनुसूचित जाती- जातीत व अनुसूचित जमाती -जमातीत भांडणे लावण्याचा डाव–सिद्धार्थ देवरे

एक ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व जमाती या वर्गामध्ये विविध जातीनुसार आरक्षण देण्याचा निकाल दिला आहे. निर्णय नव्हे!किंवा न्याय नव्हे! उच्च न्यायालय सोयीचाच निकाल देतो. अनुसूचित जाती- जातीत व अनुसूचित जमाती -जमातीत भांडणे लावण्याचा डाव प्रस्थापितांनी आखला आहे. हा निकाल देणाऱ्या बेंच मध्ये सात जजेस असून डी वाय चंद्रचूड मुख्य सरन्यायाधीश आहेत इतर पाच न्यायाधीश ब्राह्मण जातीचे आहेत.अनुसूचित जातीचे भूषण रामकृष्ण गवई यांचा सुद्धा समावेश आहे. भूषण गवई महाराष्ट्रातील अमरावतीचे आहेत.
1)डी वाय चंद्रचूड मुख्य सरन्यायाधीश ब्राह्मण
2)मनोज मिश्रा न्यायाधीश ब्राह्मण
3)सौ बेला त्रिवेदी न्यायाधीश ब्राह्मण
4)पंकज मित्तल न्यायाधीश ब्राह्मण
5)विक्रम नाथ जे न्यायाधीश ब्राह्मण
6)सतीश चंद्र शर्मा न्यायाधीश ब्राह्मण
7)भूषण रामकृष्ण गवई न्यायाधीश बौद्ध.
सात न्यायाधीश मध्ये सहा न्यायाधीश ब्राह्मण फक्त एक न्यायाधीश बौद्ध आहे. डी वाय चंद्रचूरचे वडील यशवंतराव चंद्रचूड हे तर पूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश होते इतर पाच न्यायाधीशाची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता त्यांचे पूर्व सुद्धा उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते. यामध्ये OBC , ST व minority चा एकही न्यायाधीश नाही.भूषण रामकृष्ण गवई यांच्या नावे 280 पानाचे निकाल पत्र आहे. त्यामध्ये काही संस्कृतचे कोटेशन सुद्धा आहेत. English इंग्लिश चा निकाल पत्रामध्ये संस्कृतचे कोटेशन असणे ही आश्चर्यकारक बाब आहे. संस्कृत भाषा कोणाची?कदाचित हे निकाल पत्रक कोणी लिहून तर दिले नाही ना? अशी शंका मनामध्ये येते. आपल्या 280 पानाच्या निर्णयामध्ये एससी एसटींना क्रिमिलेवर लावण्याची शिफारस भूषण रामकृष्ण गवई यांनी केली आहे. creamy layer principal is also applicable to SC and ST lays down the correct position of law..
पंकज मित्तल यांनी निर्णय कन्क्लुड केला आहे आणि त्यामध्ये ते म्हणतात reservation had to be Limited only for the first generation or one generation. म्हणजे या निर्णयामुळे आपले पुढील पिढीचे आरक्षण नष्ट होणार आहे. या बेंच मधील फक्त भूषण गवई वगळता सुप्रीम कोर्टात हायकोर्टात सर्वांचे पूर्वज न्यायाधीश होते. आज ते नियम त्यांनी आपल्यासाठी का लावला नाही. त्यांचे सर्वांचे पूर्वज तर सुप्रीम कोर्टात आणि हाय कोर्टात न्यायाधीश पदावर होते. हा निकाल लागल्याबरोबर त्यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. कारण त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांनी हे पद उपभोगवेले आहेत. म्हणजे आम्हाला कळेल तुमचा निर्णय किती प्रामाणिक आहे. अन्यथा बोलाचीच कढी बोलाचाच भात, जातीजातीत भांडण लावणारा निकाल आहे फोडा झोडा आणि राज्य करा असा हा मनुवाद्यांचा कुटील डाव आहे. त्या डाव मध्ये आमचा एस सी आमचा प्रतिनिधी मधून या विभाजनाला प्रतिकूल निर्णय दिला पाहिजे होता परंतु तसे घडले नाही.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे गवई कुटुंबाला विधान परिषदेचे उपसभापती,सभापती व राज्यपाल या पदापर्यंत पोहोचत आले.सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशापर्यंत पोहोचता आले. काही दिवसानंतर ते सरन्यायाधीश सुद्धा होणार आहेत. त्यांचेकडून बहुजन समाजाच्या अपेक्षा विस्तारित झाल्या होत्या. परंतु निराशा झाली.ते सुप्रीम कोर्टात एस टी एस सी चे प्रतिनिधी म्हणून काम करतील अशी समाजाची अपेक्षा होती परंतु कुऱ्हाडीचा दंडा होताच काळ. ही म्हण येथे पुरेपूर लागू पडते असे मला वाटते. ज्याप्रमाणे कुराडीचा दंडा लाकडाला तोडतो अशातील हा प्रकार आहे. मान्यवर कांशीरामजींनी चमचा युग मध्ये अनेक प्रकारच्या चमच्यांचा उल्लेख केला आहे स्टीलचा चमचा, पितळचा चमचा,तांब्याचा चमचा,सोनेरी चमचा,चांदीचा चमचा परंतु प्रत्येक चमचाचा काम ताट रिकामे करणे हेच असते.
या निकालामुळे भारतीय संविधानाच्या 341 व्या अनुच्छेदचं उल्लंघन झाला आहे अनुसूचित जाती व जमातीचे उपविभाग करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे व राज्याचे अधिकार राष्ट्रपती मार्फत राज्यपालांना आहे.ही संविधानाची पायमल्ली आहे.
सुप्रीम कोर्टात जेव्हा भूषण गवई साहेबांची सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली त्यावेळेस सर्व समाजाने त्यांना डोक्यावर घेतलं होतं अनेक ठिकाणी मोठमोठे त्यांचे सत्कार झालेत अमरावती ला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये सुद्धा मोठा सत्कार झाला मी सुद्धा त्या कार्यक्रमाला हजर होतो. परंतु आजच्या निर्णयामुळे माझा भ्रमनिरास झाला. इतर सहा न्यायाधीशांनी त्यांचे खांद्यावर बंदूक ठेवून बंदुकीचा ट्रिगर ब्राह्मण न्यायाधीशाने दाबला. व खेळ खतम. आतापर्यंत ओबीसी व मराठ्यांमध्ये भांडण लावण्याची कामे प्रस्थापितांनी केली,खूप मोठ्या प्रमाणात सध्या ओबीसी व मराठे भांडत आहेत एकमेकांचे खून खून पाडण्यापर्यंत मजल गेली आहे. आता एससी मधील जाती मध्ये भांडण लावून त्यांचेही त्यांचेही घरे जाळण्याचा व खून पाडण्याचा कटकारस्थान शिजत आहे. अनुसूचित जमाती मधील जाती-जातीमध्ये भांडणे लाऊन त्यांचे खून पडण्याची वाट बघत आहेत. पुन्हा त्यांना या देशातील जनतेमध्ये फूट पाडून हजारो वर्ष राज्य करण्याचे षडयंत्र सुरू झाले.

सिद्धार्थ देवरे
फोन नंबर 9970847391

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!