ब्राह्मामणी राजकीय सत्तेचे गौडबंगाल.-डॉ.आर.जे. इंगोले
भारत देशाला हिंदुस्तान म्हणणे यातील ब्राह्मामणी कावा आपल्या बहुजन समाजाला आजपर्यंत समजला नाही. आणि त्यामुळे गेली अनेक वर्ष हे चालू आहे. यात पुन्हा विशेष वाटते की, काही लोकांना याबद्दल सविस्तर माहीत आहे आणि काही लोक माहीत नसतांना सहज म्हणतात. यात देशातील अनेक राजकीय पक्षातील प्रमुख लोक आहेत. आणि यात अल्पसंख्य असणारे मुस्लिम राजकीय पक्ष सुद्धा आहेत हे विशेष आहे. ज्या आर.एस.एस सारख्या संघटनेने हा अजेंडा सुरू केला आहे आणि ज्यांना आपल्या देशातील लोकांचे धार्मिक आणि जातीय आधारावर विभाजन करून स्वार्थ साधायचा आहे. आर.एस.एस. त्यांच्या एका ग्रंथात स्पष्ट म्हणते की, या देशाचे शत्रू दोन आहेत ख्रिश्चन आणि मुस्लिम आहेत तर मग त्यांचा अजेंडा निदान आपल्या देशातील मुस्लिम नेत्यांनी राबवू नये जो शब्द आर.आर.एस.एस. सर्व बहुजन समाजाला वापरते तोच शब्द मुस्लिम नेते वापरतात हे विशेष आहे . जर नांव सांगायचे असेल तर एम.आय.एम. या पक्षाचे प्रमुख ओवेसी हा शब्द त्यांच्या बोलण्यात नेहमी वापरतात मला तर तो शब्द ऐकून किळस येते. म्हणजे आपल्या देशात ब्राह्मामणी विचाराचा प्रभाव कुठपर्यंत आहे याचा आपणास अंदाज येतो. आता ते स्वत: वकील आहेत आणि चांगले वक्ते आहेत त्यांचा अभ्यास चांगला आहे हे पण मान्य करू पण भारतीय संविधानात जर आपल्या देशाला India that is Bharat असा उल्लेख असेल तर मग आपण एक तर भारत म्हणा किंवा इंडिया म्हणा पण हिंदुस्तान का म्हणता हेच कळत नाही. हे सर्व सांगण्याचे कारण आपल्या देशात बहुजन मग यात सर्व आले फक्त ब्राह्मामण सोडून सर्व म्हणजे बहुजन अशी माझ्या वाचण्यात आलेली संकल्पना आहे. मग या ब्राह्मामण समाजाची संख्या आहे 3.50 टक्के आता यात कोणी 2.50 टक्के सांगतात तो विषय वेगळा आहे पण आता 3.50 टक्के जरी गृहीत धरली तरी इतर समाज 96.50 होईल आणि मग आपण जर सामाजिक ,आर्थिक आणि प्रशासकीय सहभाग पाहिला तर फार कमी आहे याचे प्रमाण उलट आहे म्हणजे 3.50 टक्के ब्राह्मामण आणि प्रशासकीय आणि राजकीय जागा व्यापल्या आहेत सरासरी 80 टक्क्याच्या पुढे मग याचे गमक काय आहे ? याचा विचार करण्यासाठी हा लेखप्रपंच आहे.
आपण भारतीय समाजाचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की, ब्राह्मामण समाजाने असे लोकांना सांगितले की, शिक्षण देण्याचा अधिकार फक्त ब्राह्मामण समाजाला आहे. आणि शिक्षण घेण्याचा अधिकार ब्राह्मामण,क्षत्रीय आणि वैश्य यांना आणि मग शिक्षण देण्याचा हा महत्वाचा अधिकार त्यांनी आपल्याकडे का ठेवला तर यामागे सुद्धा ब्राह्मामणी कावा आहे. म्हणजे शिक्षण देत असतांना सर्व ज्ञान काय आहे आपला इतिहास काय आहे आणि कोणी इतिहास घडवला याची संपूर्ण माहिती ब्राह्मामण आपल्याला सांगणार आणि मग सर्व समाजाने ती ऐकून मान्य करायची यात कोणतीही शंका घ्यायची नाही. कारण हे धर्माचे ठेकेदार होते आणि मग बहुजन समाजाला सर्व समस्यावर उत्तर हे ब्राह्मामण सांगणार आणि समाज त्यांचे ऐकणार एवढेच काय यांनी आपल्या बहुजन राजांना सुद्धा त्यांच्या ताब्यात ठेवले होते. याचे दाखले इतिहासात आहेत. छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करताना तो करता येणार नाही कारण ते क्षत्रिय नाहीत हे कोणी सांगितले तर याच मंत्रिमंडळातील पंत आणि वकील असणारे ब्राह्मामण आता शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीत याला काही आधार नाही. पण ब्राह्मामण म्हणतात तर मग असेल अशी मानसिकता बहुजन समाजाची होती आणि एवढया मोठया पदावर असणार्या राजांची सुद्धा होती म्हणूनच काशीवरुन गागाभट बोलावून राज्याभिषेक करावा लागला म्हणजे गागाभट का असेना पण ब्राह्मामण पाहिजे. हे काही फार विद्वान नाहीत आणि नव्हते पण आपल्या बहुजन समाजाची मानसिकता आहे की, हे विद्वान असतात त्यामुळे आज सुद्धा असेच होते. 2014 ला महाराष्ट्रात अनेक बहुजन आमदार होते पण मला तर देवेंद्र फडणवीस कोण आहे म्हणजे आमदार आहे का कोण कुठे असतात, हे सुद्धा माहीत नव्हते पण मुख्यमंत्री झाले. आणि आमचे विद्वान प्राध्यापक तेंव्हा म्हणत होते की, फडणवीस फार हुशार माणूस आहे. आणि आता तेच लोक म्हणतात फार नुकसान केले या राज्याचे आता काय म्हणावे या विद्वान असणार्या प्राध्यापकांना तेच मला समजत नाही. मी 2014 लाच सांगत होतो की, भाजपा आपल्या देशाचे आणि राज्याचे मोठे नुकसान करणार आहे. पण जनता कुठे ऐकणार आहे यांनी आपल्या महापुरुषांचे ऐकले नाही तर मग माझ्यासारखे तर हजारो आहेत आमचे कोण ऐकणार आहे. आपले अनेक बहुजन लोक विद्वान आहेत प्रामाणिक आहेत ते चांगल्या प्रकारे राज्याचा कारभार सांभाळू शकतात पण त्यांची मानसिकता नाही. आणि एकदा मानसिकता कमजोर झाली की, माणूस कोणत्याही साध्या जबाबदार्या सुद्धा पार पाडू शकत नाही. छ्त्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून औरंगजेबाने मारले असा आपणास इतिहास सांगितला जातो पण अशी शिक्षा दिली पाहिजे असे सांगणारे डोके कोणाचे होते ? हे मात्र सांगितले जात नाही. हे डोके त्या मंत्रिमंडळातील ब्रह्मामण मंत्री यांनी सल्ला दिला कारण जो मंत्री होता त्याच्या आजोबाला राज्याशी गद्दारी केली म्हणून आणि त्याची शिक्षा म्हणून संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिले होते आणि त्याचा बदला घ्यायचा म्हणून अशी सूचना या मंत्र्याने केली पण हे सत्य किंवा न्याय आहे का याची तसदी औरंगजेबाने घेतली नाही हे सुद्धा ब्रह्मामणी मानसिकता आपल्यावर नियंत्रण करते याचे द्योतक आहे. पुन्हा तोच विषय आहे की, आपल्या बहुजन समाजच्या डोक्यावर बसलेले ब्रह्मामणी भूत काही उतरत नाही. आणि आज 2024 ला अनेक विद्वान लोकांच्या डोक्यातून जात नाही तर तो काळ तर आणखी मागचा होता. आणि ब्रह्मामण मग कोणत्याही क्षेत्रात असेल तरी तो त्याच्या समाजाचे मोठेपण सांगतो आणि आपण मात्र मोठे असून सुद्धा त्याचा प्रचार करीत नाही आणि मग आपल्याला ब्राह्मामण श्रेष्ठ आणि विद्वान वाटतो. संत रविदासाचे समकालीन ब्राह्मामण कवी तुलसीदास लिखित त्यांच्या रामचरितमानस मध्ये म्हणतात,
पुजिए विप्र ( विप्र म्हणजे ब्राह्मामण) गुणग्यान शीलविहीना,
ना पूजिए शूद्र गुणग्यान शीलप्रविना !
म्हणजे ब्राह्मामण कितीही गुणहीन असला तरीही त्याची पूजा करावी पण शूद्र कितीही गुणवान असला शीलप्रविण तरीही त्याची पुजा करायची नाही. आणि आपले महापुरुष संत रविदास तुलसीदासाला उत्तर देतांना म्हणतात,
ब्राह्मामण मत पूजिए जो होए गुणहीन ,
पुजही चरण चंडालके जो होए गुणप्रविण !
आता हे सर्व आपल्या महापुरुष आणि संतांनी आपणास सांगून ठेवले आहे पण आता प्रश्न असा आहे की, आपणास तरीही ब्राह्मामण श्रेष्ठ का वाटतो ? याचे कारण आपण मानसिक सशक्त नाही तर कमजोर आहोत आणि आपल्याला अकारण भीती दाखवून यांनीच त्यांच्या फायदयासाठी आपल्याला मानसिक गुलाम केले आहे. वारकरी आंदोलन हे ब्राह्मामण व्यवस्थेवर वार करण्याचे आंदोलन होते पण यांनी त्याला भक्तीचे आंदोलन केले आणि आपण बहुजन त्याला बळी पडलो. कारण आपण कधीच व्यवस्थेला प्रश्न विचारीत नाही. आपल्याला छ्त्रपती शिवाजी महाराज हे गोब्राह्मामण प्रतिपालक नव्हते हे लोकांना समजायला 50 वर्ष लागली आणि आता आपण त्यांना बहुजन प्रतिपालक म्हणत आहोत आपली जागृत होण्याची प्रक्रिया खुप संथ आहे त्याचा हा परिणाम आहे. आपल्या सर्व महापूररूषांचे ब्राह्मामणकरण करणे अनेक वर्षापासून चालू आहे. म्हणून आपलेच वारकरी तथागत बुद्ध हे विष्णूचा नववा अवतार आहे असे म्हणतात. पण मग हे त्यांच्या घरात बुद्धाचा फोटो का ठेवत नाहीत याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही. आपल्या अनेक महापुरुष आणि संत यांच्या मागे ब्राह्मामण गुरु लावणे हे एक मोठे षडयंत्र आहे हे आपणास समजले पाहिजे. याबबात आपल्याला फार पूर्वी एका जागतिक विद्वानाने सावध केले होते पण आपण त्यांच्या बोलण्यावर विचार केला नाही आणि आजपर्यंत आपले जे राजकीय नुकसान झाले त्याची भरपाई कधी होईल हे सांगता येणार नाही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी बहुजन समाजाला सावध करतांना म्हणाले होते,
“ब्राह्मामणांचे धार्मिक वर्चस्व जे आजवर टिकून आहे याचे मुख्य कारण म्हणजे ब्रह्मामणेत्तरांच्या हाती असलेली राजकीय व धार्मिक सत्ता ब्राह्मामणकडे गेली हे होय. राजकीय सत्तेचा पाया तुटल्याबरोबर सामाजिक व धार्मिक सत्तेचा पाया ढासळून पडणार आहे. जेथे धार्मिक व राजकीय सत्तेची जोड मिळाली तेथे ब्राह्मामण राज्यावर बसले याची साक्ष पेशवाई आहे.
ज्या दिवशी ही जोडी फुटेल आणि ब्राह्मामणांच्या हातची राजकीय सत्ता ब्राह्मामणेत्तरांच्या हातात जाईल त्यादिवशी ब्राह्मामणांचा घडा भरणार आहे. मागासलेल्या हिंदूंना अगर मागासवर्गीयांना राखीव जागा दिल्या तर त्याप्रमाणात ब्राह्मामणांची राजकारणातील मिरास कमी होईल. अस्पृश्यांना व मागासलेल्या हिंदूंना राजकीय सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय ब्राह्मामणी वर्चस्व टिकून राहू शकत नाही. यास्तव आम्ही असे म्हणतो की, नेहरू कमिटीने मतदारसंघाची जी पद्धत सुचविली आहे तिच्यात सरळ राजकारणापेक्षा ब्राह्मामणी कावाच जास्त भरला आहे.” (संदर्भ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गाजलेले लेख. नेहा प्रकाशन नागपूर , 24 ऑक्टोबर 2012 )
आपण जर आपल्या बहुजन विचारधारेचा विचार केला तर आपण एक आहोत पण आपल्याला हे समजू दिले जात नाही आणि ही नीती इंग्रज नीती आहे फोडा आणि राज्य करा. कारण यांना माहीत आहे जर बहुजन सर्व एक झाले तर मग आपले काहीच चालणार नाही. पण आपल्याला चार वर्णात विभागले आणि सांगितले की, एक वर्ण दुसर्या वर्णा पेक्षा श्रेष्ठ आहे. आणि आपल्या बहुजन समाजाला याचेच मोठेपण वाटले. पण ब्राह्मामणी कावा समजला नाही. तो फार धोकादायक आहे. आपले सर्व महापुरुष एका विचाराने बांधले होते आणि त्यामुळे आपले एकच उद्दीष्ट असले पाहिजे की, या विषारी ब्राह्मामण जातीला बाजूला करा आणि आपले बहुजन राज्य आणा आणि याचा अनेक वेळेस प्रयोग झाला आहे. पण आता महाराष्ट्रात मराठा समाजाला वाटते मी श्रेष्ठ आहे इतर जातीपेक्षा आणि पुन्हा एखादा ओबीसी आहे त्याला वाटते की, तो श्रेष्ठ आहे एखाद्या अनुसूचीत जातीपेक्षा पण हे एक मोठे षड्यंत्र आहे हे मात्र आपण बहुजन मान्य करीत नाही. पण आपण एक कसे आहोत यासाठी आपणास आपला सामाजिक आणि संस्कृतिक इतिहास अभ्यासावा लागेल आणि हाच तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता. पण त्यांना आयुष्य कमी मिळाले आणि त्यामुळे ते कार्य अपूर्ण राहिले. ते जर पूर्ण झाले असते तर आज बहुजन समाज सत्तेवर आला असता आणि आपला समाज पुढे गेला असता.
म. फुले यांनी बळीवंशाचा शोध घेतला आणि त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपले गुरु मनात होते. बुद्ध ,कबीर आणि फुले ही विचारसाखळी आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. म. फुले यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांना प्रेरणास्थान मानले ,तर छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी संत तुकाराम यांना प्रेरणास्थान मानले तर संत तुकारामानी नामदेवांना प्रेरणास्थान मानले, पुढे नामदेवांनी आपले प्रेरणास्थान बुद्धाला मानले ,बुद्धाने आपले प्रेरणास्थान प्रल्हादपुत्र कपिलाला मानले अशी आपली विचारसाखळी आहे. या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर “ बुद्धा अँड हिज धम्मा ” च्या इंग्रजी आवृत्तीत म्हणतात , “ ऑफ ऑल दी फिलोसफर्स बुद्ध वाज ग्रेटली इम्प्रेस्ड बाय द डॉक्ट्रिन ऑफ कपील.” याचा अर्थ बळीवंश ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यन्त बहुजन सामाजिक ,संस्कृतिक विचारधारा एकच आहे. पण आम्हाला हे या ब्राह्मामणी व्यवस्थेने समजू दिले नाही. आणि त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “ जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही.”
काठमांडू येथील धम्मपरिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “ मी सर्व भारत बौद्धमय करीन.” आता आपण जर याचा विचार केला तर बाबासाहेब हे कशाच्या आधारावर म्हटले असतील तर याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे बाबासाहेब आपल्या मुलनिवासी बहुजन समाजाला त्यांचा सामाजिक आणि संस्कृतीक इतिहास सांगणार होते. पण बाबासाहेब पुढे जास्त दिवस जगले नाही. आपल्या बहुजन समाजाला त्यांचा उज्वल इतिहास या ब्राह्मामण लोकांनी कळू दिला नाही आणि यांच्याकडे इतिहास लिहण्याचे अधिकार असल्यामुळे आपणास चुकीचा इतिहास सांगितला आणि त्यामुळे आपला समाज ब्रह्मामणांचा गुलाम झाला. पुढे चार्वाकाने लोकायत धर्म सांगितला आणि समाजात बुद्धीप्रामाण्यवाद आणि प्रयत्नवाद निर्माण केला आणि त्यामुळे लोकायत संबधी सर्व शास्त्रे नष्ट केली आणि चार्वाकला जीवंत जाळले. नंतर सर्वात मोठी बहुजन क्रांती बुद्धाने केली. बुद्धाने यज्ञ संस्कृती मोडीत काढली आणि आज आपल्याकडे जी लोकशाही आणि संसद आहे त्याचे मूळ बुद्धकाळात आहे. बुद्धाने जी गणव्यवस्था निर्माण केली यावरून आज आपण जो सर्व लोकशाही कारभार पाहतो तो सर्व बुद्ध काळात होता. आणि मग हे या ब्राह्मामनांना सहन झाले नाही आणि त्यांनी आपल्या बहुजन समाजाची सहा हजार जातीत विभागणी केली आणि जात हे या ब्रह्मामणांचे समाजाच्या विभागणीचे मोठे हत्यार आहे. आज स्थिती अशी आहे की, आम्हाला प्रत्येक जातीचा गर्व झाला आहे आणि प्रत्येकाने आपल्या जातीत असणारे अनेक महापुरुष शोधून काढले पण हे सुद्धा एक षडयंत्र आहे हे आमच्या बहुजन समाजाला समजले नाही. कारण आपण सर्व बहुजन फुले ,शाहू आणि आंबेडकर यांच्या विचाराने एक होणार आणि संघटित झाल्यावर मग आपल्या समाजात वैज्ञानिक विचार येणार आणि मग यांना आपण एका बाजूला करणार या भीतीने मग यांनी प्रत्येकाला एक एक आपल्या जातीत झालेला महापुरुष सांगितला आहे.
आज प्रत्येक जातीच्या संघटना आहेत आणि त्यामुळे एका नव्या रूपात ही विभागणी झाली आहे. आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्षापासून “ गर्व से कहो हम हिंदू है.” अशी एक फसवी घोषणा चालू आहे आणि आपला समाज सुद्धा जास्त अभ्यास नसल्यामुळे त्यांच्या मागे जातो. पण मुळात हिंदू शब्द कधी आला आणि का आला याचा विचार आपण कधीच करीत नाही. आणि तेवढी आपली वैचारिक पातळी सुद्धा वाढलेली नाही. कारण लोकशाही असणार्या देशात असे जाती आणि धर्माच्या नांवाने घोषणा होत असतील आणि आपला समाज त्यांना फॉलो करीत असेल तर मग आपला समाज एका विनाशाकडे जात आहे. आपल्या देशात सर्व जनता आहे पण लोकशाहीत आपणास एक जबाबदार नागरिक असले पाहिजेत. आणि या नागरिकीकरणाच्या प्रक्रियेत अशी जात आणि धर्मावर आधारित घोषणा एक मोठा धोका आहे. आपला जात आणि धर्म हा आपल्या घरात असावा बाहेर आपण एक भारतीय म्हणून आले पाहिजे. याबद्दल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, “ जो समाज समूहात विभाजित होतो. त्या समूहातील व्यक्तींना मानसिक सुसंगती साधता येत नाही. समूहातील व्यक्तीचे ध्येय आणि आदर्श भिन्न असतील तर समूहातील व्यक्तींचे विचारा बहकतात आणि दृष्टी विकृत होते. विभाजित समूहात पक्षपातीपणा वाढतो आणि मग न्याय मिळणे मुश्किल होते.” अशी विभागणी करून या ब्राह्मामण लोकांनी आपल्या बहुजन समाजाला देवा –धर्माच्या नादी लावले अनेक मंदिरे आणि देवालये सुरू झाली आता आपल्या समाजाला हे माहीत नाही की, या मंदिरात देव नाही तर या भटाचे पोट आहे हे आपणास आपले महापुरुष आणि आदर्श शिक्षक महात्मा फुले यांनी सांगितले आहे. पण आपला विश्वास ब्राह्मामणावर जास्त आहे. यावर एक जालिम औषध आहे. आणि ते म्हणजे बौद्ध धम्म पण आपल्या बहुजन समाजाला हे समजत नाही याचे कारण सुद्धा मानसिक गुलामगिरीच आहे म्हणजे आपला समाज बुद्धाला सुद्धा आपला मनात नाही कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 ला हा धम्म स्वीकारला म्हणून म्हणजे आपल्याकडे कितीही महान कार्य करा ते जर तत्कालीन अस्पृश्य जातीतील व्यक्तीने केले असेल तर ते कमी महत्वाचे आहे हे या भटांनी आपल्या समाजाच्या डोक्यात टाकले आहे. याचे एक उदाहरण म्हणजे शंकराचार्य करपात्री याची भारतीय संविधनावर दिलेली प्रतिक्रिया आहे की, “ आमची घटना अत्युत्तम आहे ,पण तिचा एक दोष आहे ती एका अस्पृश्याने निर्मिलेली आहे.” म्हणजे एवढा द्वेष यांनी आपल्या समाजात भरला आहे. पण भारतीय संविधान किती महान आहे हे आपण आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आणि संसदेत अनेक खासदार जेंव्हा शपथ घेत असतांना पाहिले असेल की, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा एवढया मोठया प्रमाणावर भारतीय संविधान आणि जयभीम या शब्दाचा वापर अनेक खासदारांनी केला आहे. आपण पाहिले असेल की, मागील अनेक वर्ष झाली आहे ज्यांना हे समजले त्यांनी तो धम्म स्वीकारला आहे. मागील 30-40 वर्षात ज्या ज्या वेळी धर्मांतर झाले आहे ते बौद्ध धम्माचे झाले आहे इतर दुसर्या धर्माचे नाही. आणि आपल्या देशातील ओबीसी हा हिंदू धर्म अर्थात ब्रह्मामणी धर्माचे काम सोडत नाही म्हणजे त्यांच्या गुलामीत जीवन जगत आहे आणि आपला ओबीसी हा सर्वात मोठया संख्येने आहे त्यामुळे आज या ब्राह्मामण लोकांना याची मोठी भीती आहे की, जर ओबीसी आपल्याकडुन गेला तर यांचा मोठा आधार जाईल. यामुळे आपल्या ओबीसी बांधवांना ते अनेक प्रथा आणि परंपरात अडकवतात. आता उत्तर प्रदेशात कावड सारख्या कार्यक्रमातून लोकांना भावनिक मुद्द्यावर एकत्र आणतात आणि त्यांची पोळी भाजून घेतात. आता या विज्ञान युगात कावड यात्रा ,पायी यात्रा आणि अशा प्रकरामुळे काय साध्य होणार आहे ? तर आपल्या तरुणाचे करियर हे चांगल्या प्रकारचे शिक्षण घेण्यात आहे पण आपला तरुण आज हातात मशाल घेतो आणि निघतो पायी अनेक किलोमीटर ऊन,पाऊस ,थंडी याचा विचार न करता हे चित्र पाहून मनाला खूप वेदना होतात. पण यांना सांगावे कोणी ? आपले बहुजन पालक आज जागृत होत आहेत पण पुन्हा जास्त प्रमाणात आज मीडिया सुद्धा याच गोष्टी प्रसारीत करीत असतो. आणि त्यामुळे आपला बहुजन समाज अशा निरर्थक प्रथांना बळी पडत आहे. आज आपल्या सर्व महापुरुषांचा इतिहास आपण वाचला पाहिजे आणि त्यांच्या बलिदानाचा विचार करून आपले वर्तन ठेवले पाहिजे. तरच आपला देश आणि समाज पुढे जाईल. आणि आपल्या समाजाला जर कोणती विचारधारा वाचवू शकत असेल तर ती बुद्धिझम आहे. याबद्दल जागतिक किर्तीचा शास्त्रज्ञ आणि विचारवंत अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतो,
“ इस दुनिया मे एक ही मार्ग है , जो विश्व को बचा सकता है , वह बौद्ध धम्म है |
डॉ.आर.जे. इंगोले
नाशिक
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत