देशात होत आहे नारी शोषण व अनैतिकतेचं राजकारण
किरण उपाध्ये
भारतीय राजकारणात अनैतिकतेचे स्तोम माजले आहे. सौजन्य,चारित्र्य संपन्नता,विवेक, हे शब्द बाद झाले आहेत. अर्थहीन झाले आहेत. शब्दांचे संदर्भ व परिभाषा बदलली आहे. जो जास्तीत जास्त भ्रष्ट, हिंसाचारी, बलात्कारी त्याला उच्चपदी बहुमान देण्याचा नवा ट्रेण्ड गेल्या दशकीय धर्मांध राजकारणात पडला आहे. प्रधानमंत्र्यांनी ‘महिलांचा सन्मान करा ‘असे सांगितले. त्याच सत्तेत महिलांचे वस्त्रहरण होत असून न्यायासाठी बलिदान द्यावे लागत आहे. तशा नेत्यांची राजकारणात तुच्छ छाप दिसते.या लैंगिक शोषणाला धार्मिक पार्श्वभूमी असावी असे वाटते.मानवी मनावर जसे संस्कार घडवले जातात तशी मनुष्याची विचारधारा बनते व तो तशी कृती करतो. तेचं संस्कार प्रतिगामी संघ परिवाराने आपल्या सेवकांना दिल्याने लैंगिक विकृती विकोपाला गेलीं आहे. मायबाप इंग्रज सरकारला तब्बल पाच वेळा माफीनामा सादर केलेल्या वीराला भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे. इंग्लंडमध्ये 1908 साली मार्गारेट लारेन्स नावाच्या महिलेने माफीवीराने बलात्कार केल्याचा आरोप केला.त्यात त्यांना चार महिन्याची शिक्षा पण झाली होती. या वीरांना नशेची सवय होती तसेच ते समलैंगिक संबंध ठेवत होते.
2002 मध्ये गुजरातच्या बिल्किस बानो या पाच महिन्याच्या गर्भवती महिलेवर स्त्रीलंपट पिसाटांनी सामूहिक बलात्कार केला. ऩतर तीच्या डोळ्यासमोर तीच्या तीन मुलींसह सात जणांची हत्या केली. पण 16 आगष्ट 2022मध्ये आरोपींना मुदतपूर्व सुटका करून त्यांचा जाहीर सत्कार स्वतःला संस्कारी समजणाऱ्या राजकीय पक्षांकडून केला जातो. या बलात्कारी लोकांना पाठिशी घालणाऱ्या सरकारवर अद्यापही मनुवादी नीतीचा पगडा आहे, हे उघडच दिसते.
आज देशातील 98 टक्के साधू , बुवा,बाबा, महाराज हिंदू महिलांचे लैंगिक शोषण करून बलात्कारांच्या आरोपाखाली तुरुंगात सुरक्षित आहेत. हजारो साधू निर्लज्जपणे नंगे राहतात, नंगे राहण्यात कोणती धार्मिकता असते.हे समजायला मार्ग नाही.
भाजपशासित पूर्वोत्तर राज्य मणिपूर मध्ये ३ मे २०२३ पासून मैतेई आणि अल्पसंख्याक कुकी समाजात गृहयुद्ध छेडले जात आहे. यात शेकडो महिलांवर बलात्कार झाले, त्यांची हत्या झाली. नग्न धिंड काढली गेली. दोन महिलांचा तर निवस्र करून लैंगिक छळ केला गेला. नंतर त्यांना मारुन टाकले गेले. हे सर्व धर्म पुरस्कृत आहे की काय? एकही सनातनी यावर तोंड का उघडत नाही. महिलांचा सन्मान करा म्हणणारा पाखंडी नेता तोडगा काढत नाही. ब्र सुद्धा काढत नाही. उलट मणिपूर येथील भाजपचे आमदार पाओलीनलाल हाओकीप 24 जुलै 2023 ला मणिपूरचे सरकार या हिंसाचारात व सर्व घटनेत सामिल आहे असे निर्लज्जपणे सांगतो. लैंगिक शोषणाच्या घटना रोजचं घडतात. तरीही सरकार कोणतीही कारवाई करत नाही. अत्याचारित महिला हिंदू,आदिवासी आहेत. राष्ट्रपती मुर्मू आदिवासी आहेत. पण मनूवादी संस्कारामुळे मोदी आणि मुर्मू दगड बनले आहेत असे वाटते. आदिवासी महिलांचे शोषण करणारे 85 टक्के विशिष्ट धर्माचे लोक असून ते निर्दोष सुटतात. सुसंस्कृत,सभ्य, उच्चतेचा टेंभा मिरवणारेच धार्मिक, राजकीय लोकं स्वैराचार, बलात्कार, शोषणाचे आरोपी का असतात. त्यांचा पक्ष बलात्कारी पक्ष म्हणून का गणला जातो. नवी मुंबईत हिंदू महिलेला गांजा पाजून शामसुंदर शर्मा, संतोष मिश्रा, राजकुमार पांडे या पुजऱ्यांनी मंदिरात बलात्कार करुन गळा दाबून हत्या केली. इतक्यातच जुलै 2024 महिन्यात उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबांच्या सत्संगतीत चेंगराचेंगरीत 121 महिलांना मोक्ष मिळाला. हे सुरज पाल ऊर्फ भोले बाबा बलात्काराच्या आरोपात बडतर्फ झालेले नराधम आहेत. नंतर त्यांनी बाबागिरीचा धंदा करुन प्रचंड माया जमवली. असे शतप्रतिशत बाबा,संत, मठाधिपती, महंत लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. शंकराचार्य आनंद स्वरूप महाराज श्रीलंकेत वेशेसोबत सापडले.लोकांनी त्यांची भरपूर सेवा केल्याने सोशल मीडियावर (जून – २४) मध्ये गाजले. नित्यानंद,कृपालू,आसाराम,रामरहिम, रामपाल सह शेकडो महाराजांचे दिव्य प्रताप चांगलेच गाजले.
अश्लील संबंध ठेवणारा प्रा. प्रदीप जोशी यांचे सीडी प्रकरण उजेडात आले. व्यापम घोटाळ्यात त्यांचा हात होता हे सिद्ध झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिफारसीवरून त्यांना सरकारनं अनेक महत्त्वाच्या मोठ्या पदांवर प्रमोशन दिले .मुंबईच्या एका तोतड्या नेत्याच्या अश्लिल व्हिडिओने परिवाराची नीतीमत्ता जगात गाजली.महिलेला धर्माने शोषण,ताडण के अधिकारी ,शुद्र म्हणून स्थान दिले आहे.मात्र भारतीय घटनेने तीला सन्मानाने जगण्याची संधी दिली असून अब्रूचे संरक्षण, चारित्र्यसंपन्न जीवन जगण्यासाठी मानवीय अधिकार दिले आहेत.
अश्लीलता विरोधी कायदा,महिला संरक्षण कायदा,मुक्त स्वातंत्र्य व सन्मानाने जगण्याचा प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे तरीही धार्मिक, राजकीय पक्ष तीला क्षुद्रतेची वागणूक देतात. हीन समजून बोलतात. बलात्कारी आरोपींना फाशीची शिक्षेची कायद्यात तरतूद केली असतांना पण सत्ताधारी सरकार बलात्काऱ्यांना पाठिशी घालतं असेल तर आरोप कसा सिध्द होईल.? भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक सोलापूर जिल्ह्यातील भोसे गावात सन २०१७ च्या पंचायत संस्था निवडणुकांमध्ये, पंजाब मधील सैनिक वर्षभर सीमेवर राहतो. एका वर्षात मुलगा झाला म्हणून पेढे वाटतो, असे व्यक्तव्य करून सैनिक आणि स्रियांचा अपमान करतो. हाथरस येथे १४ सप्टेंबर २०२० रोजी चार जणांनी एका महिलेवर बलात्कार केला. पंधरा दिवसांनी उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला. मात्र भाजपच्या भगवाधारी योगी सरकारने तीच्यावर बलात्कार झाला नसल्याचे कोर्टात सांगितले. नंतर सीबीआयने चौकशीत बलात्कार झाल्याचे सांगितले. हे धार्मिक लोकांचं नारी नीतीचं नीच राजकारण करतात. ती मेल्यावर तिच्या आई वडिलांना घरांत डांबून ठेवून तीच्या घरासमोर रात्री अडीच वाजता पेट्रोल टाकून पेटवून दिले. हा संस्कारी लोकांचा खरा राक्षसी चेहरा त्यावेळी दुनियेत दिसला.
उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचे कुलददिपसिंग सेंगर आरोपी आहेत. या प्रकरणात पिडीतेच्या परिवारावर खोटे गुन्हे दाखल करून तीच्या वडिलाची तुरुंगात हत्या केली. पीडीता आपल्या काकांना भेटायला जाताना खोटा अपघात घडवून काकू, मावशी,वाहन चालकाला मारुन टाकण्यात आले. अपघातात पिडीताचे वकील गंभीर जखमी झाले. योगी सरकारने त्या बलात्कारी सेंगरला वाचवण्यासाठी पूर्ण सत्ताशक्ती पणाला लावली. हेच संस्कार केले जातात का संघात?
कठुवा मध्ये १० जानेवारी १८ ला आठ वर्षांच्या आसिफाचे अपहरण झाले. आठ दिवसांनी तिच प्रेतं सापडलं. यातील आठ बलात्काऱ्यां विरुध्द एप्रिल मध्ये पोलिस आरोप दाखल करण्यास गेले असता बार कौन्सिल अध्यक्षांसह वकिलांनी हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय,म्हणत विरोध केला. बलात्कारी लोकांना पाठिंबा दिला. बलियाचे भाजप आमदार सुरेन्द्र सिंग यांनी तर बलात्काराचे समर्थन केले. इतकी नीच पातळी भारतात कुठल्याही राजकीय पक्षाने गाठली नसेल. या, होऊ द्या,आमचं लैंगिक शोषण करा अशी विकृत मनोवृत्ती ज्यातून घडते तीच प्रवृत्ती यांना मतदान करून पुन्हा पुन्हा सत्तेवर पाठवते. याला लोकशाहीचे पतन म्हणावे नाही तर काय?
खा. बृजभूषण सिंग भाजपचे खासदार होते. त्यांनी आलिंपिक गोल्ड मेडल विजेत्या साक्षी मलिक,विनेश फोगाट यांचेसह अनेक महिला पहेलवानाचे लैंगिक शोषण केले.असा प्रत्यक्ष आरोप केल्यानंतर त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी करत जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले. पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असूनही त्यांना अटक केली नाही.यावरून सत्तेतल्या दगडाला मानवी संवेदना नसतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. केंद्र सरकारने बृजभूषण सिंगला वाचवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली.महिला पहेलवानांनी एक महिना संघर्ष केला. जानेवारी २०२३ ते २३ एप्रिल २०२३ पर्यंत आंदोलन केले. पण संघीय संस्कृतीच्या मोदींनी बलात्कारी ब्रजभूषणला अटक केली नाही. उलट पद्मश्री, ध्यानचंद,अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंना रस्त्यावर फरफटत नेले.
मागिल एका दशकात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने महिलांचे जीवन असुरक्षित झाले आहे. तीच्याकडे आजही मनुवादी नजरेने बघितले जात आहे.महिलांना मनुवादी विचाराने वागणूक दिली जात आहे. तीच मनूस्मृती अभ्यासक्रमात आणतं आहे. महिलांना गुलाम करण्याच्या मोठ्या कटाचा हा एक भाग आहे.या कटात महिला बळी पडत आहेत. उच्चवर्णीयाने बलात्कार केल्यास त्याला शिक्षा करु नये,हा मनुवादी कायदा धर्मांध राजकारणात अमलात येत आहे असे सर्वत्र दिसून येत आहे.हेच आजचे खरे वास्तव आहे.
किरण उपाध्ये (पत्रकार),पुलगांव त.देवळी,जि.वर्धा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत