शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया बाबत वंचित बहुजन युवा आघाडीने घेतली शिक्षण विभागाची झाडाझडती.
राजेंद्रभाऊ पातोडे
अकोला दि २५
बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम, २००९ अंतर्गत
प्रवेश स्तर संदर्भात
कोणत्या शाळांनी पुर्व प्राथमिक चा प्रवेश बंद करून प्राथमिक
( वर्ग १) ला प्रवेश स्तर बदलविला कोणत्या निकषांवर त्यांनी ही प्रवेश स्तर बदलविला तसेच
प्राथमिक शिक्षण सोबत पुर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा यासंदर्भात संपूर्ण माहिती
त्याच प्रमाणे
भाषीक आणि धार्मिक अल्पसंख्याक संस्थां यांची इत्यभुत माहिती सुद्धा
वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने
जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि गट शिक्षणाधिकारी यांना वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने आज शिक्षण सभापती ह्यांचे उपस्थिती मध्ये झाडाझडती घेण्यात आली.
आर.टि.इ. प्रवेश प्रक्रियेतील अनास्थे बाबत युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.शिक्षण विभाग ह्या संदर्भात गंभीर नसल्याचे त्यांनी उदाहरणे देवून सिद्ध केले.प्रवेश स्तर संदर्भात
कोणत्या शाळांनी पुर्व प्राथमिक चा प्रवेश बंद करून प्राथमिक
( वर्ग १) ला प्रवेश स्तर बदलविला कोणत्या निकषांवर त्यांनी ही प्रवेश स्तर बदलविला तसेच
प्राथमिक शिक्षण सोबत पुर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा यासंदर्भात संपूर्ण माहिती
त्याच प्रमाणे
भाषीक आणि धार्मिक अल्पसंख्याक संस्थां यांची इत्यभुत माहिती शिक्षण विभागाने नीट ठेवावी.त्याच बरोबर पालक आणि विद्यार्थी ह्यांना त्रास होणार नाही, ह्याची सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिक्षण सभापती ह्यांचे समक्ष जिल्हा शिक्षणाधिकारी रतणसिंग चव्हाण यांनी माहिती उद्या पर्यंत देण्याची हमी दिली.
यावेळी युवा प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे,
शिक्षण सभापती मायाताई नाईक,
युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर,
जि प सदस्य प्रगतीताई दांदळे
स्पुर्तीताई गावंडे,
मिनाताई बावने,
रामकुमार गव्हाणकर,
जिल्हा कोषाध्यक्ष दादाराव पवार, सचिन शिराळे,
अकोला महानगर पुर्व अध्यक्ष वैभव खडसे,
आनंद खंडारे,ऍड मिनल मेंढे, ऍड सुबोध डोंगरे,श्रीकृष्ण देवकुणबी, रितेश यादव,
जय तायडे,आकाश जंजाळ,सुरज दामोदर,साहील बोदडे, सचिन डोंगरे, स्वप्निल आखरे, संतोष वनवे,
अकोला गट शिक्षणाधिकारी श्याम राऊत,
बाळापूर गट शिक्षणाधिकारी वैशाली रामटेके,
पातुर गट शिक्षणाधिकारी संदीप मालवे,
उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत