आय.ए.एस. पूजा खेडकर प्रकरणाचा पर्दाफाश वैभवच्या एका पोस्टमुळं झालाय.-किरण माने.
…”मला अमुक गोष्ट खटकलीय पण मी पोस्ट करू की नको? ट्रोल्स अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ करतात…कशाला ट्रोल व्हायचं उगाच?? माझ्या पोस्टनं परिस्थिती बदलणार थोडीच आहे???”
असं म्हणून गप्प बसणार्यांचे डोळे खाडकन उघडतील असं काम करून दाखवलंय वैभव कोकाट नांवाच्या वाघानं !
झालं असं की, पूजा खेडकरनं पुण्यात ट्रेनिंग पिरियडमध्ये असताना केलेल्या मागण्यांविषयी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी एक अहवाल राज्य सरकारकडं पाठवला होता… पण तिथं खुर्चीवर किती स्वच्छ बांडगुळं बसली आहेत, हे तुम्हाला माहिती आहेच. गुवाहाटीला पळुन जाऊन खोक्यांचा डोंगर आणि एक पक्ष हडप करणारे गद्दार… घरातल्या वडिलधार्यांनाही थुका लावून हजारो कोटींचा घोटाळा पचवणारे लाचार… आणि भ्रष्ट मार्गानं पक्षच्या पक्ष फोडून, लोचट लोक विकत घेऊन जातीधर्मांत फूट पाडून सत्ता हिसकावून कब्जा केलेले कारस्थानी… या सगळ्यांसाठी पूजा खेडकरांच्या गैरवर्तनाचा तो अहवाल म्हणजे ‘दर्या में खसखस’ होता… कुठल्या कुठे गायब झाला असता कुणाला कळलेही नसते…
पण या अहवालाकडं वैभव कोकाट या तरुणाचं लक्ष गेलं. त्यानं या प्रकरणाची सगळी पाळंमुळं तपासली. त्याला कळलं की आपलं कोडगं सरकार आणि बधिर प्रशासन हे प्रकरण दाबणार. त्यानं ठरवलं आपण किमाने ट्विटरवर एक पोस्ट तरी करायची.
या पोस्टनं अभूतपुर्व असं काम केलं भावांनो… ही पोस्ट वाचून आरटीआय कार्यकर्त्यांनी वैभवशी संपर्क साधला. पूजा खेडकरची सगळी माहिती गोळा केली आणि अख्खा देश जागा केला !
भावांनो, आत्ताचा काळ हा प्रतिक्रांतीचा आहे. सुमारांची सद्दी आहे. सत्तेत आणि सगळ्या महत्त्वाच्या पदांवर लबाड लांडगे आणि हिंस्त्र रानडुकरं आहेत. त्यांच्या विरोधात बोललं की ट्रोल करणार्या त्यांच्या डुक्करपिलावळीने कमालीचा उच्छाद मांडलाय. यात सर्वसामान्य मध्यमवर्गीय, गरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला, लहान मुलं, तुम्हीआम्ही सगळे सगळे भरडले जाताहेत.
म्हणूनच सगळे एक व्हा. वैयक्तिक मतभेद आणि जातधर्म बाजूला ठेवा. निडर व्हा. व्यक्त व्हा. आपल्या एका पोस्टमध्ये काय ताकद असते हे वैभवनं दाखवून दिलंय. काळ कितीही खडतर असला तरीही आपल्या पुर्वजांनी आपल्या हातात दिलेल्या देशासाठी आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपण भक्कमपणे उभं रहायला हवं. शिवशाहूफुलेआंबेडकरांची ही भुमी आहे. त्यांनी हीच व्यवस्था लाथाडली आणि गाडली. त्यानंतर पुन्हा मुंडकं वर काढलेल्या या व्यवस्थेविरोधात बोलायचं, लिहायचं बिनधास्त. दडपशाहीला मातीत गाडून क्रांती करण्याची ताकद आपल्यात आहे.
वैभव, तुझ्या निडरतेला कडकडीत सलाम.
- किरण माने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत