राज्यघटना शिकणारा अन्यायाविरूध्द गुरगुरल्याशिवाय राहात नाही.
— अॅड.अण्णाराव पाटील यांचे प्रतिपादन
लातूर – कायदा बनविण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया डावलून विरोधी पक्षाच्या लोकसभा सदस्यांना विश्वासात न घेता भारत सरकारने कायदा नविन तीन फौजदारी कायदे तयार करून ते अंमलात आणले आहेत. यामागे सत्ताधाऱ्यांचा हेतू संशयास्पद असून भारतीय जनतेला अडचणीत आणले जात आहे. म्हणून या नविन कायद्याची चिकीत्सात्मक चर्चा आणि लिखान होणे आवश्यय आहे. आगामी काळात समाजातील वकील आणि बुध्दीजीवी वर्गाने राज्यघटना समजून घेण्यासाठी प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यावेत. कारण राज्यघटना शिकलेला माणूस अन्याय – अत्त्याचाराविरूध्द गुरगुरल्याशिवाय राहात नाही. तो न्यायाच्या बाजूने उभा राहातो. असे प्रतिपादन सुप्रसिध्द निधीज्ञ तथा महाराष्ट्र अॅन्ड गोवा बार कॉन्सीलचे सदस्य अॅड. अण्णाराव पाटील यांनी केले आहे.
लातूर येथील भालचंद्र ब्लड बॅंकेच्या सभागृहात ‘ जी – 24 ‘ या संघटनेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमीत्त जिल्हास्तरीय वकील परिषद संपन्न झाली. प्रा.डॉ. मारोती गायकवाड यांनी अध्यक्षपद भूषविले.या परिषदेचे उदघाटकीय भाषण करताना अॅड. पाटील पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष असून दैववाद नाकारते.परंतु सत्तेत असलेल्या जातीयवादी आणि धर्मवादी लोकांनी राज्यघटनेला सुरूंग लावला आहे. हा धोका ओळखून भारतीय समाजाने आपले भविष्य ठरवावे. असे अवाहनही त्यांनी केले.
दिवसभर चाललेल्या या परिषदेत ‘ आयईए ‘, ‘सीआरपीसी ‘ आणि ‘ आयपीसी या नविन कायद्याची चिकीत्सा करणारी भाषणे झाली. यामध्ये सर्वश्री अॅड. सिध्दार्थ खूर्यवंशी, अॅड.मंचकराव डोणे, माजी न्यायाधिश अॅड. आर. वाय. शेख, अॅड. महेंद्र इंगळे, अॅड. डॉ.जी. लक्ष्मण, प्रा.डॉ. हर्षवर्धन कोल्हापूरे यांनी यावेळी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर वकील फोरमच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरसिंग घोडके यांनी केले. सूत्रसंचलन अॅड. राजकुमार गंडले यांनी केले तर प्रा. श्रीकांत मुद्दे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतसाठी सर्वश्री अॅड. किरण कांबळे, अॅड. दिपक साठे, रामराजे आत्राम, शिरीष दिवेकर, नारायण कांबळे, श्रीधर शेवाळे, श्रीहरी कांबळे, अॅड. श्रीमती कुंदन कोल्हापूरे यांनी परिश्रम घेतले. या परिषदेस जिल्ह्यातील वकील, प्राध्यापक, कार्यकर्ते , महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत