नळदुर्ग येथील धरित्री विद्यालयातील चार विद्यार्थिनीचे राज्यस्तरीय साने गुरुजी आकलन स्पर्धेत प्रावीण्य
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
ज्ञानदीप कलोपासक मंडळ संचलित नळदुर्ग अलियाबाद येथील धरित्री विद्यालयातील चार विद्यार्थिनींनी एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनद्वारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय श्यामची आई आकलन राज्यस्तरीय स्पर्धेत चार विद्यार्थीनींनी प्राविण्य मिळवले आहे .
या स्पर्धेसाठी जून महिन्यात आपला सहभाग नोंदवला होता दोन टप्प्यात ही स्पर्धा घेण्यात आली होती. श्यामची आई पुस्तक वाचून त्यावर आधारित ऑनलाइन प्रश्न पहिल्या टप्प्यात विचारले गेले होते. त्यात अयोध्या करदुरे, संस्कृती कदम ,वैष्णवी पवार, ज्ञानेश्वरी पवार इत्यादी विद्यार्थिनींनी ३० पैकी ३० गुण घेऊन पहिल्या ५० मध्ये येण्याचा मान मिळवला. यानंतर स्पर्धेची दुसरी फेरी घेण्यात आली. या फेरीत आकलनावर आधारित पुस्तकातील चिकित्सक प्रश्न विचारले गेले होते. त्यातही या चारही विद्यार्थिनींना ३० पैकी २५ च्या पुढे गुण प्राप्त झाले आणि उत्तेजनार्थ पारितोषिकावर आपले नाव कोरले आहे
महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक सुनील पुजारी यांनी या विद्यार्थिनींचा पुष्प देऊन सत्कार केला. एस एम जोशी फाउंडेशन तर्फे या विद्यार्थिनींचा सत्कार पुणे येथे २७ जुलै २०२४ रोजी एस एम जोशी फाउंडेशन सभागृहात होणार आहे. यामध्ये त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या विद्यार्थिनींना शाळेचे मुख्याध्यापक सुनील पुजारी यांनी मार्गदर्शन केले होते.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव भाऊ चव्हाण ,सचिव अॅड सयाजी शिंदे ,कोषाध्यक्ष मल्लिनाथ माळगे ,सहसचिव वसंतराव रामदासी ,किरण पाटील ,सुभाष दासकर,नीताताई पाटील,ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा ,विलास वकील यांनी हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत