“बहिष्कृत हितकारिणी सभा”च्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील संघर्षाला अन् मानवमुक्तीच्या लढ्याला सुरुवात केली
२० जुलै १९२४ रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “बहिष्कृत हितकारिणी सभा” या सामाजिक चळवळीची सुरुवात केली होती. तत्कालीन सगळ्याच अस्पृश्य जातींच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्वपूर्ण अशी ऐतिहासिक घटना होती. “शिका, संघर्ष करा, संघटित व्हा” हे बहिष्कृत हितकारिणी सभेचे ब्रीदवाक्य होते. याच चळवळीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील संघर्षाला अन् मानवमुक्तीच्या लढ्याला सुरुवात केली होती.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी काळारम मंदिर सत्याग्रह आणि महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह याच चळवळीच्या माध्यमातून केला होता. आज (२०,जुलै) बहिष्कृत हितकारिणी सभेच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणून एका अर्थाने आजच्या दलित समूहाच्या अर्थात अनुसूचित जातींच्या दृष्टीने देखील ही एक ऐतिहासिक घटना ठरते.
युगनायक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन…!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत