सत्यशोधक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व अभ्यास प्रा .जी. ए. उगले अभिवादन सभा व विशेष बैठक..
सत्यशोधक समाज प्रतिष्ठान, नांदेडच्या वतीने अभिवादन सभा व विशेष बैठक..
सत्यशोधक समाज प्रतिष्ठान, नांदेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व सत्यशोधक कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की, सत्यशोधक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व अभ्यास प्रा .जी. ए. उगले यांचे दिनांक १८जुलै २०२४ रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या समाजकार्याला अभिवादन करण्यासाठी प्रतिष्ठानच्या नांदेड शाखेतर्फे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच ४ ऑगस्ट २०२४ रोजी होणाऱ्या व्याख्यान व सत्यशोधक समाजकार्य राज्य पुरस्कार वितरण सोहळ्याच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण अभिवादन सभा व बैठकीस आवर्जून उपस्थित रहावे, ही विनंती.
सभा दिनांक: २० जुलै २०२४
वेळ: सायंकाळी ४:३० वाजता.
स्थळ: सत्यशोधक समाज प्रतिष्ठान कार्यालय, युगांतर , वाय.आर.स्टुडिओ, व्यंकटेश्वरानगर,रिंग रोड नांदेड.(डॉ.अनंत राऊत यांचे राहते घर)
विनीत –
दत्ता तुमवाड
अध्यक्ष
डॉ. बालाजी पोतुलवार,
कार्याध्यक्ष,(मो.९८२३४४४१०७)
डॉ. विठ्ठल दहिफळे,
सचिव
डॉ. श्रीमंत राऊत, प्रा.मंजुषा पावडे
उपाध्यक्ष
प्रा.अनुराधा पाटील
सहसचिव
डॉ.शिवसांब कापसे
कोषाध्यक्ष
प्रा. इरवंत सूर्यकार,
जिल्हा संघटक
सर्व सदस्य सत्यशोधक समाज प्रतिष्ठान, शाखा नांदेड.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत