राजकीय चोर आणि सामान्य चोर:

बलदेव आड़े
चोरी ही एक कला आहे पण ती समाजाला आवडत नाही.त्याचे जगात कुठेही औपचारिक प्रशिक्षण उपलब्ध नाही.तरीही अत्यंत कुशल चोर सर्वत्र असतात.ते जीव मुठीत घेऊन अत्यंत कठीण आणि धोकादायक जोखीम पत्करतात.जेव्हा ते पकड़ले जातात तेव्हा त्यांना खूप झोड़पले जाते,थर्ड डिग्रीचा उपयोग करून त्यांना चोरीची माहिती घेतली जाते.त्यांचा व्यवसाय सामाजिक आणि कायदेशीररित्या अस्वीकार्य आहे.ही माहिती आहे सामान्य चोरां बाबत.
राजकीय क्षेत्रातील संतवृत्तीच्या आणि प्रामाणिक लोकांची क्षमा मागून
राजकीय चोर हे समाजात उजळ माथ्याने फिरतात.राजकीय चोरांना समाजात मानाचे स्थान असते.राजकीय चोरांकड़े मोठ्या प्रमाणात पाठिराखे असतात.हे राजकीय चोर केवळ पांच वर्षात हजारपतीचे लाखोपती बनतात आणि लखोपतीचे करोड़पती बनतात आणि करोड़पतीचे अब्जपती बनतात.सर्व सामान्य लोकांपासुन तर उच्चस्थानी असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या चोरी बाबत माहिती असते.परन्तु त्यांचे कुणीच वाकडे करू शकत नाही.कारण त्यांच्या समर्थनार्थ लढण्यासाठी पोलिस,वकील आणि त्यांचे राजकीय पाठीराखे आणि त्यांचे राजकीय पक्ष असतात.राजकीय क्षेत्रात जितका मोठा चोर तितकी त्याची इतर पक्षात स्वागत होण्याची जास्त शक्यता असते.हे राजकीय चोर त्यांना विरोध करणाऱ्यांना जीवनातून उठवतात.त्यांना त्रस्त करतात.त्यांना पूर्णपणे संपवतात.त्यांना ठार करतात.म्हणून त्यांच्या विरोधात लढायला कुणी धजावत नाही.हे राजकीय चोर म्हणजे Lawmakers असतात.आणि तेच Lawbreakers असतात.जेव्हा हे राजकीय चोर जेलात जातात आणि जेलातून सुटतात तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी तुरुंगाच्या बाहेर हजारोंची गर्दी जमते.आणि हा प्रकार म्हणजे ह्या देशात राष्ट्रीय चारित्र्य(National Character) नसल्याचे एक उदाहरण आहे.
राजकीय क्षेत्रातील संतवृत्ती च्या लोकांची क्षमा मागून.
आज जी लुटालूट आहे,भ्रष्टाचार आहे,अनागोंदी आहे,अराजकता आहे,अन्याय आहे,अत्याचार आहे,गरीबी आहे,दारिद्रय आहे,उपासमार आहे,अज्ञान आहे,दहशतवाद आहे,खून आहेत,दारोडेखोरी आहेत,फसवणूक आहे,लुबाडणूक आहे,नागवणूक आहे,शेतकरी आत्महत्या आहेत,छोट्या छोट्या बालकांचे उपचाराविना मृत्यु आहेत,आदिवासी लोकांच्या छोट्या छोट्या बालकांचे कुपोषण आहे,दलितांचे आणि अल्पसंख्यक लोकांचे मॉब लिंचिंग आहे,हिन्दू मुस्लिम लोकांमधील सामाजिक दुरावा आहे,धार्मिक द्वेष आहे,जातीय द्वेष आहे,सामाजिक तेढ़ आहे,अंधश्रद्धा आहे,श्रीमंतांची चंगळ आहे,कायदयांचे उल्लंघन आहे,बेशिस्त आहे,बनवेगीरी आहे,खोटेपणा आहे,षड़यंत्र आहे,कटकारस्थाने आहेत,मनमानी आहे,अरेरावी आहे,महिलांचे बलात्कार आहेत,महिलांची असुरक्षितता आहे,भयग्रस्त वातावरण आहे,अस्वस्थतता आहे,राग आहे,संताप आहे,नाराजी आहे,सर्व प्रकारचे प्रचंड नुकसान आहे,शासन प्रशासनातील भ्र्ष्टाचार आणि लालफीताशाही आहे,हुजरेगिरी आहे,विसंगती आहे,न्यायालयांमधील तुम्बलेले खटले आहेत,संविधानाचे उल्लंघन आणि अनादर आहे ह्या सर्वांचे एकमेव कारण म्हणजे ह्या देशातील चारित्र्यहीन,स्वार्थी,उदासीन, असंवेदनशील राजकीय चोर आहेत.
आपण सत्ता परिवर्तन करताना एका चोराकड़ून दुसऱ्या चोराकडे हस्तांतरण करत असतो.हे राजकीय चोर राजकीय खेळी करण्यात अत्यंत कुशल असतात.ते अत्यंत हुशार असतात,ते अत्यंत बेशर्म असतात.ह्या चोरांमुळे सम्पूर्ण देश त्रस्त आहे.
ह्या देशाला अत्यंत प्रामाणिक,अत्यंत संवेदनशील,अत्यंत कार्यकुशल,अत्यंत धोरणी,अत्यंत ज्ञानी राजकीय नेतृत्वाची गरज आहे.
बलदेव आड़े
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत