मुख्य पान

युद्ध नको बुद्ध हवा!



🪷
पुलवामा झाला, आरडीएक्स भरीत कार आणि कार च्या ड्रायव्हर चा अता पता लागलेला नाही. कपडे सुद्धा मिळाले नाही, ना कारचा नंबर!
आणि
केंद्र सरकार च्या एजंसी, राॅ, गुप्त हेर वैगरे शोध घेण्यात अपयशी ठरल्या म्हणूनच तर पहलगाव च्या दहशत कृत्याची हिम्मत वाढली.
आणि निपराध लोकांचा जीव गेला. पण, कोणत्याही राष्ट्रीय एजंशीने, मंत्रालयाने स्वतःची जबाबदारी म्हणून ना गृहमंत्री, ना संरक्षणमंत्री, ना परराष्ट्रमंत्याने आपली राष्ट्रीय जबाबदारी म्हणुन सरकार कडे राजीनामा दिला नाही किंवा देण्याचे आश्वासन सुद्धा दिले नाही.असे काहीही न करता, कोणत्याही प्रकारची सत्य ,सत्यावर आधारित तपासणी आणि तपासणी अंती
परिपाक निश्चित न करताच,
एकदम गृहीतके निश्चित करून
युद्धाची भाषा!
आज
युद्धाने खरोखरच जगातील आतंकवाद संपुष्टात येईल कां?
हा खरा प्रश्न आहे.युद्धाने कोणाचेही भले होणे आणि प्रश्नाचे निरुत्तर शक्य नाही. एकदाचे युद्ध सुरू झाले तर ते संपणे कठीण आहे, आणि जेव्हा ते संपलेले असते तेव्हा मात्र;वेळ निघून गेलेली असते. दोन्ही
देशाची, फार मोठी हानी मात्र, निश्चित झालेली असणार, यातं शंका
नसते. जीव ज्यावर अतोनात प्रेम करणारे जीव असतात, ते जे युद्ध पार्श्वभूमीवर मृतू मुखी पडलेले असते, शहीद झालेले असते. ते कधीही पुन्हा परतणे शक्य नसते.
आर्थिक नुकसानाची भरपाई कित्तेक
वर्ष अशक्यप्रायः असते. तरीही, मनुष्य प्राण्यांनी आपसात युद्धाची भाषा कां करावी. आणि खरोखरच
पहिले जागतिक महायुद्ध झाले, दुसरेही जागतिक महायुद्ध झाले युद्धाने खरे प्रश्न संपलेत कां?
जगात अयुद्ध परिस्थिती ,शांतता नांदली कां? शांतता प्रस्थापित झाली नाही तर कां झाली नाही? जगात फ्रेंच राज्यक्रांती झाली, जगात, लोकशाहीराष्ट्रात सुद्धा शांतता प्रस्थापित झाली कां? भारता सारख्या लोकशाहीप्रिय देशात, ज्या सामाजिक समस्या आहेत, सामाजिक स्वातंत्र्य नाही, आर्थिक विषमता आहे आणि यासं आधारावर असंख्य प्रश्न, बेकारी, रोजगार समस्या, महागाई, शिक्षणातील भेदभाव, स्वास्थ्य समस्या, रोड रस्ते समस्या, शेती, शेतमजूर समस्या, उपासमारी समस्या असतांना युद्धाची भाषा!
खरोखरच मनात दहशत निर्माण करणारी आहे. युद्धातील दोन्हीही देशातील सरकारातील “वाममार्ग पक्ष” फॅसिझम म्हणजेच, युद्धखोर वृत्ती हेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मते, युद्धाचे प्रमुख कारण होय.

युद्ध नको बुद्ध हवा! असे म्हणणारे, जगात काही कमी नाहीत, आणि बुद्ध शांती ची भाषा करतो म्हणून युद्धखोर प्रवृत्तीना बुद्ध च नको आहे.
आणि म्हणूनच,भारताच्या इतिहासात बुद्धाला गाडण्याचा प्रयत्न झाला, बुद्धाला म्हणजेच शांतीला, म्हणजेच लोकशाहीला गाडुन टाकल्यामुळेच,देश हजारो वर्ष
युद्धाच्या आणि गुलामगिरीच्या दावणीला बांधला गेला. जेमतेम स्वातंत्र्याला 75वर्ष उलटून गेली,
पण लोकशाही मजबूत भारतात आजुन तरी होऊ शकली नाही.
कां?असा प्रश्न जो निर्माण करु इच्छितो तो देशद्रोही ठरविला जातो?
आणि जाती, परंपरा, अधर्म कृत्य म्हणजेच सद्धम्म न पाळता,लोकशाही, मानवता न पाळता, जातीभेद, जातीव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी, चातुर्वर्ण्य टिकवून ठेवण्यासाठी, आत्मा
ईश्वर ईश्वर करीत, ओरडून सांगत राहणे सारखे आत्मघाती कृत्य करीत
राहुन, देशात लुटमार करीत असतो,भ्रष्टाचार हाच ज्याचा छंद असतो, तो देशभक्त बनतो हा झाला फॅसिझम!
आणि जेव्हा फॅसिझम जीवंत असतो
तेथे युद्धाची भाषा, तळी, काष्ठी, आकाशी असते.
ज्या ज्या देशाच्या मनोवृत्तीत फॅसिझम वाढतो त्या त्या देशात
सहिष्णुता संपुष्टात येत जाते आणि युद्धखोर युद्धाची भाषा बोलत
राहतो. सत्ता आणि नफेखोरी हेच मुख्य कारण युद्धाचे असते. असे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत दिसते, दोन देशातील किंवा देशा
देशातील किंवा देशा अंतर्गत धुसफुस, युद्ध पार्श्वभूमी याचे फॅसिझम हेच मुख्य कारण होय.

भगवान बुद्धाचे 2500 वर्षा पुर्वी सांगुन ठेवले की, युद्धाने नव्हे तर मैत्रिभावानेच वैर /युद्ध संपविता येते. “वैर्याने वैर कधीच संपत नाही,तर अवैर्यानेच,मैत्रिभावानेच
वैर/युद्ध संपते.
हाच सनातन धर्म/प्राचीन सुसांस्कृतिक धर्म होय.
पण,घोषित सनातनी विचाराचे लोक, स्वतःला सनातनी धर्माचे ऐकीकडे घोषित करीत राहत असतात, चिल्लावत राहत असतात आणि दुसरीकडे बुद्ध विसरून युद्ध युद्ध करीत राहत असतात. युद्ध प्रिय देव देवतांची पुजा करीत राहत असतात. हा फॅसिझम ज्या संस्कृतित विकसित असतो, तो देश कधीच चिंतामुक्त राहू शकत नाही.
आणि अशा परिस्थितीत राष्ट्राचा उत्कर्ष म्हणजेच राजे सयाजीराव गायकवाड यांचे भाषेत, “प्रजेचे कल्याण हेच माझे कल्याण व तोच माझा मोक्ष ” ची भाषा विसरून जेव्हा देव देव, ईश्वर ईश्वर,अल्ला अल्ला ची भाषा बोलली जाते, राजा करीत राहत असतो, तेव्हा ती तथागत बुद्धाला अपेक्षित शांती ची भाषा नसते, मैत्रीची किंवा सनातनी धर्माची सुद्धा ती भाषा नसते तर ती युद्धखोरांची भाषा असते. भाषा एक संकेत असतो. आणि युद्ध खोर्यांच्या
शब्दात शांतता प्रस्थापित करण्याची भाषा उच्चारणे, बुद्ध सांगणे, हा देशद्रोह ठरत असतो. यालाच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्दात फॅसिझम होय.
बुद्धाने सांगितलेला कार्यकारण भाव, म्हणजे सुसांस्कृतिक शिक्षण हाच एकमेव उपाय, युद्ध म्हणजेच आतंकवाद संपविण्याचा, फॅसिझम संपविण्याचा, लोकशाही समृद्ध करण्याचा एकमेव मार्ग होय. राजे सयाजीराव गायकवाड यांचे भाषेत, “Education is the basic of all reforms and is the only way of solution from our present condition ” युद्धाच्या पाश्र्वभूमीवर एकमेव पर्याय म्हणजेच सुसांस्कृतिक शिक्षण होय.
युद्ध नको
बुद्ध [सुसांस्कृतिक शिक्षण] हवा!
हाच एकमेव उपाय होय. !
🌷
प्रा.मुकुंद दखणे.
यवतमाळ 9373011954.
जयभीम 🙏🏾जयभारत

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!