छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजे
विनायक अंहकारी
नळदुर्ग शहरात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
नळदुर्ग
दादासाहेब बनसोड
महाराष्ट्रात शिवजयंतीच्या तारखेला महत्त्व नसून त्यांचा त्याग रयतेची जबाबदारी आणि लाखोंनी घेऊन चढाई करणाऱ्या मोगल साम्राज्याचा अंत करणे हे महत्त्वाचे होते ज्याप्रमाणे शिवजयंती चौकात साजरी केली जाते त्या प्रमाणे प्रत्येकांच्या घरा घरात हृदयाला साक्ष ठेवून छत्रपती शिवरायांचे विचार मांडले पाहिजे छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा प्रत्येक घरामध्ये केलेच पाहिजे छत्रपती शिवरायांचे जयंती साजरी करण्यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या विचारांची जयंती साजरी करणे आजच्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन नळदुर्ग नगरीचे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी केले सालाबादाप्रमाणे याहीवर्षी दि. ६ जुन रोजी नळदुर्ग येथे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवास स्थानी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते .
दि. ६ जुन रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नळदुर्गचे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर दुग्धअभिषेक करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.यावेळी नळदुर्ग शहरातील सर्वपक्षीय नेते व नागरीक उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक संजय बताले,माजी उपानगराध्यक्ष शरद बागल, माजी नगरसेवक अमृत पुदाले, महालिंग स्वामी, बसवराज धरणे, विलास येडगे, शिवाजी नाईक, विकास सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे,शिवसेनेचे सरदारसिंह ठाकुर, बलदेवसिंह ठाकुर भाजपाचे शहर अध्यक्ष धिमाजी घुगे,विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे, भाजपचे युवा नेते सुशांत भुमकर, युवा व्यापारी मंडळाचे समीर मोरे, भाजपचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोतदार,भाजपा युवा मोर्चाचे सागर हजारे, भगवंत सुरवसे, पत्रकार दादासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव,अमर भाळे,आंबाबाई मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश जाधव, राजेंद्र महाबोले,नंदकुमार जोशी, शिवराम मोटे, प्रमोद जोशी, किशोर जोशी, अरुण जोशी, तानाजी नागणे, शिवाजी नागणे,अनिल गुरव,नारायण दोपारे,उमेश जाधव,संतोष जाधव,उमेश नाईक,सचिन भुमकर,राजकुमार वैद्य,अजित देशपांडे , प्रदीप ग्रामोपाध्याय,अमित भूमकर,संदीप वैद्य, ज्ञानेश्वर केसकर,रोहित वाले, अनिल पाटील, मारुती घोडके, अनिल कुलकर्णी, मयुर जोशी, सुहास पुराणिक अनिल पाटील , मारुती घोडके , अनिल कुलकर्णी , मयूर जोशी , सुहास पुराणिक , आदीजन उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर दुग्धभिषेक करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत