अनपेक्षितपणे जरी विरोधकांना दिलासा मिळालेला असला, तरी तलवार अजूनही टांगलेलीच आहें.
व्यवस्थेने ( RSS मोदी – शहाने कुटनीतीच्या बळावर अपहृत केलेल्या न्यायालय, निवडणूक आयोग, सीबीआय, कॅग, RBI गव्हर्नर, संसद, पत्रकारिता, विविध राज्यांची सरकारे आणि EVM द्वारे हिरावलेला जनतेचा मताचा अधिकार ) जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला हायड्रोजन बॉम्बचे धक्के दिले………..
” अनपेक्षितपणे जरी विरोधकांना दिलासा मिळालेला असला, तरी तलवार अजूनही टांगलेलीच आहें.
कारण गेल्या दहा वर्षात मोदी – शहाने जनतेच्या व देशाच्या फायद्याचे कोणते काम केले, म्हणून तिसऱ्यांदा ते देशाची धुरा सांभाळतात……?
(1) स्विसबँकेतले किती पॆसे आणले आणि प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकले..? का आणून स्वतःच्याच खात्यात टाकून घेतले.
(2) दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देणारे….
दहा वर्षात 20 कोटी नोकऱ्या दिल्यात का?
(3) 2014 ते 2019 च्या पहिल्या पाच वर्षात पायाला भिंगरी लावून जगभर हिंडले. देशात कोणती जागतिक अर्थनीती वापरली?
(4) New Education Policy नुसार महाराष्ट्रातील 62000 सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन खाजगी करणाची सुरुवात केली.
(5) शिक्षण आणि आरोग्य मोफत असतांना उद्योजकांच्या मदतीने गरीब श्रीमंतीची दरी निर्माण केली.
(6) नोटबंदीचा लाभ कुणाला झाला हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.
(7) शेतकऱ्यांच्या विरोधात आणि भांडवलदारांच्या लाभासाठी अनेक कृषी कायदे केले. शेतकऱ्यांनी 750 बांधवाचा बळी देऊन कायदे मागे घ्यायला भाग पाडले.
(8) 15 ऑगस्ट 2022 पर्यंत म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशात प्रत्येक कुटुंब स्वतःच्या पक्क्या घरात राहतील ही घोषणा हवेतच विरली.
(9) दहा वर्षात एकाही मंत्री मंडळातील सदस्याला आणि स्वतः पत्रकार परिषद घेतली नाही आणि घेउही दिली नाही.
(10) 2013 पर्यंत देशावरील सर्वमिळून कर्ज जेवढं होतं, तेवढंच कर्ज अवघ्या 10 वर्षात करून ठेवलं…
(11) रेल्वेचे स्वतंत्र बजेट बंद करून रेल्वे , विमान कंपन्या, विमानतळे भांडवल दारांना विकून टाकले.
(12 ) जनतेला भुलविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला हाताशी धरून अयोध्येत राममंदिर बांधून अपूर्ण स्थितीतच स्वतःच उदघाटन केले. निवृत्त झाल्यानंतर त्याच सरन्यायाधीशाला राज्यसभा सदस्यत्वाचे बक्षीस देऊन संविधानाचे उल्लंघन केले.
(13) गरज नसतानाही सेंट्रल व्हिस्टाची निर्मिती 20, 000 कोटी रुपये कोरोनाचे आर्थिक संकट असतांना करून, राष्ट्रपतीला निमंत्रण न देता भगव्या धारकांच्याहस्ते उदघाटन करून धार्मिक प्रतिक असलेल्या सेंगोल चे प्रतिक हे राष्ट्रीय बोधचिन्ह वापरून संविधानावरच प्रथम डायरेक्ट घाला घातला.
(14) संविधानात धर्मनिरपेक्ष शब्द काढून पंथनिरपेक्ष हा शब्द टाकला.
(15) डॉलरच्या तुलनेत रुपया 2013 ला 60 रुपये होता, आणि आज 83 रुपयावर पोहचला.
(16) चीनने आमच्या हद्दीत घुसून आमचा भाग बळकावला, परंतू , केंद्रसरकार त्यावर चुप्पी साधते.
(17) पुलवामा हल्ला स्वतःच घडवून आणला आणि पाकिस्तानला दोषी ठरवण्याचे काम यांनी केले. असा आरोप त्यांच्याच पक्षाच्या राज्यपालांनी केला.
(18) अदानी अंबानीला मणिपूर मधील नैसर्गिक खनिज संपत्ती देण्यासाठी तेथील आदिवासीमध्ये वांशिक तेढ निर्माण करून तिथून हाकलण्याचे कटकारस्थान केले. ते हटत नाहीत हे लक्षात येताच त्यांच्यात हिंसाचार भडकवला आणि बघ्याची भूमिका घेतली. 8 महिने मणिपूर जळत होते. कारगिल मधील शहीद झालेल्या जवानांच्या दोन अर्धांगिनीची 150 च्या वर जमावाने नग्न धिंड काढून बलात्कार केले. परंतू , तेथील राज्य सरकार आणि केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेतली. तेंव्हा CJI ला भूमिका स्वतः हाती घ्यावी लागली. आणि दुसऱ्या राज्यातील पोलीस प्रशासनाकडून परिस्थिती हाताळावी लागली. परंतू , आमचे प्रधानमंत्री ढुंकूनही त्या मणिपूरला अजूनही भेट देऊ शकले नाहीत. याची दखल जेंव्हा जगाने घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावर जेंव्हा मानवी हक्काच्या उल्लंघनाची नाचक्की झाली तेंव्हा आणि विरोधकांनी संसदेत बोलण्याची मागणी केली. तेंव्हा कुठे मोदी अस्पष्ट बोलले.
(19) 146 खासदारांना येनकेन प्रकारे संसदेतून बाहेर काढून महत्वाचे बील पास करून घेतले.
(20) मणिपूर जळीत प्रकरणानंतर अमेरिकेतील व्हाईट हाऊस मधील शेवटच्या मोदीच्या भाषणावर 75 % अमेरिकन खासदारांनी बहिष्कार टाकला होता.
(21) देशातील राज्यसरकारे चांगले चालत असतांना केवळ आपलीच सत्ता तिथे असावी यासाठी सर्व नितीचा वापर करून आपली सरकारे स्थापन केली. त्यात महाराष्ट्र हे चांगले उदाहरण आहें.
(22) विरोधकांना संपवण्याची नीती ही हिटलरची नीती पुरेपूर त्याने वापरली. परंतू , हिटलरचा चांगल्या गुणांचा आदर्श मात्र घेतला नाही. हिटलर स्वतःचा वयक्तिक खर्च हा…
” माझा संघर्ष
लिहिलेल्या ग्रंथाच्या रॉयल्टीमधून भागवत असे.
इथे मात्र दिवसातून 10 / 10 लाखाचे जॅकेट दिवसातून बदलल्या जातात…..!
(23) देशाचा एकमेव मालक बनण्याची त्याची महत्वाकांक्षाच आम्हाला ( जनतेला )व विरोधकांना लवकर समजलीच नाही. जेंव्हा समजली तेंव्हा पुलाखालून पाणि भरपूर वाहून गेलेले होते. शिवाय आम्ही आणि विरोधक लोकशाहीवादी आणि संविधानवादी असल्यामुळे आमच्यापुढे नीतिमत्तेचा माउंट एव्हरेस्ट असल्यामुळे मोदी – शहाचा वारू अडविण्यात आम्ही कमी पडलो. याचाच लाभ मोदी – शहाने व RSS ने उचलला आणि लोकशाहीचे रूपांतर हुकूमशाहीत करण्याचा शेवटचा डाव टाकला आहें.
(24) प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाना हाताशी धरून अब की बार 400 पारचा नारा यशस्वी करण्यासाठी शेवटचा एक्झिट पोलचा सहारा घेण्यात आला.
(25) एकंदरीत गेल्या दहा वर्षात संविधानातील लोकशाहीची मूल्ये स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या तत्वाना धर्माच्या नावावर थोपवून हिंदू राष्ट्राच्या नावाखाली सत्ताकारण करून संविधान आणि लोकशाही कायमची संपवून जनतेला मानसिक व शारीरिक गुलाम बनविण्याचे षडयंत्र या जोडगोळीने केले.
(अशी अनेक उदाहरणे आहेत येथे महत्वाची 25 दिली आहेत )
“आता प्रत्येकांनी स्वतःच्या सदसदविवेक बुद्धीला प्रश्न विचारावेत की असे असतांना सुद्धा मोदी – शहा यांना ( भाजपला) 240 पर्यंत मजल कशी गाठता आली, तेही हॅट्ट्रिकसाठी……..!!!!!!!!!!!
याचा अर्थ स्पष्ट आहे की, मुख्य निवडणूक आयोगाने, सर्वोच्च न्यायालयाने, विरोधकांचा, जनतेचा, वकिलांचा EVM ला असलेला विरोध झुगारून टाकून झुकते माप भाजपला देण्याचा प्रयत्न पुरेपूर झालेला आहे………..
परंतू , विरोधकांच्या सावधानतेने, जनतेच्या जागृतीने त्यांच्या प्रयत्नांना थोडीशी खीळ बसल्यामुळे त्यांचे मनसूबे 100% यशस्वी होऊ शकले नाहीत. परंतू अजूनही संकट टळलेले नाही.........
त्यासाठी केवळ आणि केवळ जनतेनीच धर्म आणि जाती यांना बाजूला फेकून संविधानालाच राष्ट्रीय ग्रंथ समजून संविधान जागृतीचे काम करावे लागणार आहें. त्यासाठी सुशिक्षित युवापिढीवरच त्याची जबाबदारी राहणार आहें…….
टीप या लेखाचा उत्तरार्ध उद्याच्या म्हणजे ( 7/6 /2024 ) भागात वाचायला विसरू नका
आवाहनकर्ता :- अनंत केरबाजी भवरे ( संविधान विश्लेषक , औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत