दिनविशेष – सोमवार दिनांक 3 जून 2024
आज दि. ३ जून २०२४, बुद्धाब्द २५६८, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४शं, चंदवारो, वेसाख मासो, सोमवार, वैशाख माहे.
३ जून १९२९ – रोजी श्री. गोविंदनाथ सुरेंद्र टिपणीस यांचे अध्यक्षतेखाली महाड, माणगाव तालुक्यातील अस्पृश्य लोकांची जाहीर सभा.
३ जून १९३५ – रोजी मुंबई शे. का. फे. ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण.
३ जून १९५३ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माईसाहेब आंबेडकर यांनी मुंबईतील रावळी कॅम्प महिला मंडळाला भेट दिली. त्यावेळी बाबासाहेबांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शिलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे.”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत