सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा वाढदिवस दैनिक जागृत भारत तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आनंदपर्वात सामील व्हा
सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा वाढदिवस ‘आनंदपर्व’ या टायटलखाली रिपब्लिकन सेना, बौद्ध जन पंचायत समिती, भारतीय बौद्ध महासभा व पीपल्स एज्युकेशन सोसायटी या
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित संस्थांच्या पुढाकाराने तमाम आंबेडकरी समूह, आनंदराज आंबेडकर साहेबांवर प्रेम करणारे वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक यांच्या सहभागाने मोठ्या धुमधडाक्यात ‘प्रबोधन पंधरवडा’ म्हणून साजरा केला जात आहे. त्याची सुरुवात रविवार दि. 2 जून 2024 रोजी
‘डॉ.आंबेडकर भवन’ गोकुळदास पास्ता लेन, दादर मुंबई (पू) येथे प्रचंड जल्लोषात झाली. रिपब्लिकन सेनेच्या बॅनरखाली सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा समारोप पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नांदेड येथील नागसेन हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन खऱ्या अर्थाने त्यांना आपण खरोखरच आनंदपर्वात वावरत असल्याचा अनुभव घेता यावा या पद्धतीने ‘नागसेन हायस्कूल’ च्या आजी-माजी विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे हितचिंतक यांनी नियोजन केले आहे. त्यानुसार या आनंदपर्वात सामील होण्याची संधी सर्वांना उपलब्ध आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या देशभरातील सर्व शाखांनी ‘नागसेन हायस्कूल’ चा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचे अनुकरण करायला हरकत नाही. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ हे जगप्रसिद्ध ‘बॅनर’ असून संपूर्ण देशात समता व नैतिक, बौद्धिक, सामाजिक लोकशाही दृढमूल करणारे सर्वात शक्तिशाली ‘संस्कार केंद्र’ आहे. या संस्कार केंद्राशी संबंधित सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्यावर ‘संसद’ या आपल्या देशातील सर्वोच्च संस्कार केंद्राएवढीच किंबहुना त्यापेक्षाही मोठी जबाबदारी आहे, हे या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समजून घ्यावे. तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर करीत असाल किंवा जाणीवपूर्वक कटकारस्थाने करून बाबासाहेबांच्या संस्थाची माती करणार असाल तर तुमच्याएवढे ‘पापी’ या जगात केवळ आणि केवळ तुम्हीच आहात हे जेव्हा तुमच्या पुढच्या पिढीच्या लक्षात येईल तेव्हा तुमची ‘प्रतिमा’ त्या पिढीच्या मनात कशी असेल? अशी कल्पना जरी केली तरी तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपोआप मिळतील. अजूनही वेळ गेलेली नाही. आणखी एक ‘पंधरवडा’ हाताशी आहे. ज्या शाखेत तुम्ही मोबदला घेऊन सेवा करीत आहात, निष्काम सेवा नव्हे, ती मी सुद्धा केली नाही आणि तुम्हांलाही तसा सल्ला देणार नाही, फक्त एवढेच तुम्हाला सांगेल, “तुम्ही खाल्ल्या मिठाला जागा.” तुम्ही ज्या शाखेत काम करता त्या परिसरातील तुमच्याच माजी विद्यार्थ्यांना व पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या हितचिंतकांना केवळ आवाहन करा ते तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाहीत हे मी स्वतः च्या अनुभवाने खात्रीलायकपणे सांगतो. थोडे मनाने मोठे व्हा. मी सांगतो ते करा आणि आनंदपर्वात सामील व्हा म्हणजे तुम्हालाही संतश्रेष्ठ तुकोबाराय यांच्या सारखाच, “आनंदाचे डोही आनंद तरंग’ हा अनुभव येईल. आनंदराज आंबेडकरांच्या जन्म दिना मुळे निर्माण झालेल्या आनंदपर्वात वावरता येईल. तेव्हा करंटेपणा सोडा आणि आनंदपर्वात सामील व्हा.
श्रीपती ढोले, मुंबई
सोमवार दि. 3 जून 2024
मो.9834875500
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत