लोकमन एक्झिट पोलवर विश्वास ठेवायला तयार नाही…!
भीमप्रकाश गायकवाड,
लोकसभा निवडणुकांच्या अधिकृत निकालांची संपूर्ण देशाला प्रचंड उत्सुकता लागली असल्याचे जाणवत आहे. याचाच दुसरा अर्थ असा की लोकमन एक्झिट पोलवर विश्वास ठेवायला तयार नाही. ह्या चॅनेलवाल्यांनी हे आंकडे कुठून आणि कसे आणले हे त्यांना आणि त्यांच्या मालकांनाच माहीत. पण INDIA आघाडीच्या प्रचारसभांना उसळलेला जनसैलाब त्यांच्या समस्त निकष आणि कसोट्यांना केराची टोपली दाखवल्याशिवाय राहाणार नाही !
उद्याचा दिवस बाकी आहे. त्यांना, त्यांचे भक्त आणि मालकांना आनंद घेऊ द्या ! त्यांच्या आनंदात कशाला विरजन ? 4 जून, 2024 ला दूध का दूध और पानी का पानी होणारच आहे !!
तसं पाहिलं तर गर्दी दोन्ही बाजुंकडील सभांना होती. पण दोन गर्दींमधील फरक जाणण्यासाठी सायकॉलॉजीचा वापर उड्डाणछू नवशिक्या सेफॉलॉजिस्टनी केलेला दिसत नाही.
अधिकृत निकाल पिके-बिकेंच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आणि त्यांच्या इमानदारीवर कायमस्वरूपी प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असतील…
भीमप्रकाश गायकवाड,
‘मूकनायक’,
रविराज पार्क, परभणी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत