देव शोधतोय
तरुण ( तरुण हे नाव आहे मुलाच ) शाळेतून आला आणि इकडे तिकडे शोधाशोध करू लागला. आईन विचारल, अरे तरुण काय शोधतोयस ? तरुण म्हणाला, आई मी देव शोधतोय. आईन आश्चर्यान विचारल, का $ $ य ? अग ओरडतेस काय , मी खरच देव शोधतोय. काल शाळेतून येताना दुकानातून विकत आणला होता. आईन विचारल, कशाला ? तरुण म्हणाला, शाळेत निबंध स्पर्धा आहे. मी देव शोधतोय या विषयावर. आईन म्हंटल, अरे तरुण विषय छान आहे. तू काय लिहिणार आहेस ? तरुण म्हणाला, आई मी लिहिणार आहे. मी दगडात, मूर्तीत किंवा तसबीरीतच नव्हे तर माणसातही देव शोधत नाही. मी माणसात माणूस शोधतो. आणि हे पण लिहिणार आहे की माणसात माणूस कसा शोधतो. मी समता, स्वातंत्र्य, बंधुता, मैत्री आणि न्यायान वागणारी माणस शोधतोय. मी सर्व प्राणिमात्रावर दया करणारी,चोरी न करणारी भ्रष्टाचार, व्यभिचार न करणारी, वाईट हेतून खोट न बोलणारी , खोट न वागणारी, कुठलीच नशा न करणारी आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय या उदात्त हेतून जगणारी माणस शोधतोय. आईन शांतपणे ऐकल आणि विचारल, तरुण, अरे अशी माणस तुला भेटतील ? तरुण विचार करून म्हणाला, कदाचित नाही. आईन विचारल, का रे ? तरुण म्हणाला, अग आई माणसाला माणूस बनवणारा हा मानवतेचा मार्गच आपल्या देशातील लोकांना माहीत नाही. आणि ज्यांना माहित आहे त्यांची या मार्गावर चालण्याची लायकी नाही. किंवा या देशातील मनुवादी लोकांना इथल्या सामान्य लोकांना या मार्गावर चालूच द्यायच नाही. म्हणून तर हा मार्ग आपल्याच मातीतला असून इथल्या देवाच्या जन्मदात्यांनी तो माणसाला सांगितलाच नाही. आणि आमच्या नपुसंक शंढ औलादी आजच्या विज्ञान युगातही दगडात देव शोधत बसलेत आणि आत्म्याला स्वर्गात पाठवण्यासाठी आयुष्य वाया घालवत आहेत. माणूस म्हणून जन्माला येतात पण माणूस म्हणून जगतच नाही. नपुसंक, शंढ, गुलाम म्हणून जगतात आणि मरतात.
आई, माणसाला माणूस बनवण्याचा मार्ग तथागत गौतम बुध्दान दिलाय हे तू आणि बाबांनी मला सांगितलत, मी तो मार्ग अभ्यासला आणि मी स्वतःला माणूस बनवण्याच ठरवल. आई मला अशी माणस भेटतील, न भेटतील पण आई मी मात्र माणूस म्हणून जगणार. अग तो नसलेला देव, स्वर्ग, आत्मा, कुणाला भेटेलच कसा ?
अग आई देव शोधून थकली लोक, माणसातही देव शोधून थकली. पण या विश्वात तथागत बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, विश्वरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्री यांच्या सारख्या महान माता आणि महामानव या देशात जन्मले हेच बहुसंख्य बहुजनांना माहीत नाही. हा मानवतेचा खरा वारसा जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला जातोय मनुवादी औलादी कडून. इतके मूर्ख आहोत आम्ही भारतीय ? आम्हाला चांगल वाईट, खर खोट यातला फरकही कळूनये ? ईतके नेभळट आहोत आम्ही ? आजही हे वास्तव नाकारता येत नाही. अरे तरुण , तू खूपच छान बोलतोयस. पण मला सांग आज आपला देश अशिक्षित राहिलेला नाही. माणस शिक्षित उच्च शिक्षित होत आहेत. विज्ञानवादी होत आहेत . तरीही ही परिस्थिती का असावी ? आई मी एक सांगू ,बाबासाहेब म्हणाले होते की शिक्षणाला शिलाची जोड नसेल तर ते शिक्षण म्हणजे शिड फाटून वादळात सापडलेली होडीच जणू. आई जर शास्त्रज्ञ नविन विमान उड्डाणाच्या वेळी त्याला लिंबूमीरची बांधत असेल तर काय म्हणशील ? डाॕक्टर, वकील, देव पूजत असतील, आॕफीस मध्ये, किंवा दवाखान्यात देवाच्या मूर्ती बसवत असतील, तर काय म्हणशील ? आई माणूस शिक्षित असो , उच्च शिक्षित असो वा शास्त्रज्ञ , त्याला बुध्द माहीत नसेल तर तो अपूर्ण आहे ग. आणि या माझ्या वक्तव्यात काही अतिशयोक्ती असेल अस मला वाटत नाही. आई देवळाकडे जाणारी पावल जोवर शाळेकडे वळत नाहीत तोवर देशाची प्रगती होणार नाही हे सुध्दा अर्ध सत्य ठरलय. आई शाळेत जाणारे लोक देवळातही जातात. आगदी डाॕक्टर, कलेक्टर सुध्दा. आई मला वाटत प्रत्येक शाळेत, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांबरोबर बुध्द सुध्दा हवा. तसबीरी बरोबर या महामानवांचा मानवतावाद पुस्तकातही हवा. तरच आणि तरच नसलेला देव शोधण थांबेल, माणूस माणूस बनेल आणि माणूस स्वतःत आणि इतर माणसात माणूस शोधेल.
अग आई विश्व भारताकडे बुध्दभूमी म्हणून आदरान बघतय आणि आश्चर्य म्हणजे ईथ बुध्दच नाही.आई खर म्हणजे ईथ प्रत्येक वास्तूत बुध्द हवा होता. आई या देशाला आपली महानता नाही ग जपता आली. महामानव डाॕ. बाबासाहेबांनी ती महानता पुन्हा मिळवली पण आज चहुकडे पाहिल तर पुन्हा बुध्द गाडला जाईल की काय अशी भिती वाटते. आई म्हणाली, तरुण इतका निराश का होतोयस ? अरे बा भीमाची लेकर आहेत की. इतक्या सहज बाबासाहेबांनी पुनर्जीवीत केलेला बुध्द गाडण शक्य नाही. आई मला त्यांचीही शाश्वती नाही ग. बा भीमाची लेकरच बावीस प्रतिज्ञांच आचरण करीत नाहीत. देवळात जातात, स्वामी बुवा बापुंच्या सतसंगाला जातात. गंडे दोरे टिळे लाऊन मिरवतात. आई तू अशांना भीमाची लेकर म्हणतेस ? अग हे तर ना बाई ना बाप्या तशातले आहेत. जाऊ दे मी मात्र माणूस बनणार आणि माणसाला माणूस बनायला मदत करणार. आणि हाच निबंध मी शाळेत लिहिणार.
जे खरच देव शोधत नाहीत. माणूस म्हणून जगत आहेत. माणसाला माणूस बनवायला मदत करीत आहेत त्यांना मानाचा जयभीम. आणि जे बौध्द असून देव शोधत आहेत,गंडे , दोरे, टिळे लाऊन बैठकीला जातात, जत्रा वा-या करतात, करणी भानामतीवर विश्वास ठेवतात, नवस करतात त्यांना मी भीमाची औलाद मानत नाही. त्यांना माझ सांगण आहे, बाबांनो बुध्द धम्म नासऊ नका. जा ना बुडात दम असेल तर जुन्या व्यवस्थेत. मी एक वेळ दारू पिणा-या, खोट बोलणा-या माणासाचा तिरस्कार करणार नाही. पण धम्मात अंधश्रध्दा आणणा-याचा मी खूप तिरस्कार करतो. कारण दारू पिणारा माणूस एक दिवस दारू पिऊन मरतो पण देव पुजणारा आईबाप , आपल्या पुढच्या पिढ्यांच नुकसान करातो. त्यांना गुलामीच जीवन देऊन जातो. मी दारू पिणाराच समर्थन नाही करीत पण दैववाद किती घातक आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय.
एक कुत्र रस्त्याच्या कडेला शेदूर फासलेल्या दगडावर तंगडी वर करत. मांजरी समोर मातीचा उंदीर ठेवला तर ती त्या उंदराकडे ढुंकून बघत नाही. आणि आजच्या जगातला शिकलेसवरलेला शिक्षित दगाडासमोर हात जोडून भीक मागतोय. बा भीमान सांगितलय भीक मागण आणि भीक देण गुन्हा आहे. तो भीकारी देवळाच्या बाहेर येणा-या जाणा-या माणसांकड भीक मागतोय. देवळात नाही. का ? कारण देवळातला देव भीका-याला भीक देत नाही. उलट भीकारी देवळात गेला,तर पेकटात लाथ बसते. पुजारी हाकलून देतो. आणि त्यातूनही भीकारी देवळात बसला तर तो देव,नाही देत छदाम. माणसच माणसाला भीक देतात. देव हा तर पुजा-यांच पोट भरण्याच माध्यम आहे. देव हे भ्रष्टाचार, शोषण , अंधश्रध्दा आणि मानवी गुलामीच मूळ आहे. तरुण अचानक ओरडला,आई सापडला ग सापडला. देव सापडला.अग दिव्याखाली सापडला. दिव्याच्या खाली अंधार होता ना म्हणून तो दिसला नाही.
????
वसंत कासारे.
(8087480221)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत