ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे बुद्ध जयंती उत्साहात संपन्न
गडचांदुर त. कोरपना जि चंद्रपूर येथे जोगाई पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक बुद्धभूमी येथे तथागत बुद्ध यांची २५६८ वी जयंती साजरी करण्यात आली.
आज दिनांक २३ मे २०२४ ला सकाळी ७ वाजता ऐतिहासिक बुद्धभूमी येथील ऐतिहासिक विहारात भंते कश्यप यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध वंदना घेण्यात आली. तदनंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथाताचे वाचन करण्यात आले. सकाळी ठीक ८:३० वाजता तथागत बुद्ध यांच्या प्रतिमेचे पुजापाठ करून भंते कश्यप यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
तसेच ऐतिहासिक बुद्धभूमी येथील तथागत बुद्ध आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अगरबत्ती मेणबत्ती लावून उपस्थित जणांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केल्यानंतर सामुहिक बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमास भंते कश्यप, अशोककुमार उमरे, गौतम भसारकर, संपादक प्रभाकर खाडे, मधुकर चुनारकर, देवराव भगत, पत्रूजी दुर्गे, सुनील वालदे, कुणाल वासेकर, कु. तेलंग, पडवेकर, मनोहरे, रविंद्र वाकडे, पोलिस मुंडे साहेब आणि इतर उपासक हजर होते.
कार्यक्रमानंतर पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत