दिनविशेष – शनिवार दिनांक 25 मे 2024
आज दि. २५ मे २०२४, बुद्धाब्द २५६८, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, सनिवारो, वेसाख मासो, शनिवार, वैशाख माहे.
२५ मे १९२९ – रोजी वऱ्हाडातील बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मध्य प्रांत आणि वऱ्हाड अस्पृश्य परिषदेचे अधिवेशन पार पडले.
२५ मे १९५० – रोजी श्रीलंकेत बौद्ध धंम्म कसा पाळला जातो? याचे निरीक्षण करण्यासाठी सिलोन बुद्धिस्ट काँग्रेसने आयोजित केलेल्या सिलोनची राजधानी कँडी येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची पत्नी डॉ. सवितामाई आंबेडकर उपस्थित राहिले.
२५ मे १९५१ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “लोकप्रतिनिधी (क्रमांक २) विधेयक Representaction of People (No. 2) Bill” यावर चर्चा सुरू ठेवली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत