आंबेडकरवादी चळवळीचे मुक्त विद्यापीठ महाकवी वामनदादा कर्डक
आंबेडकरवादी चळवळीचे मुक्त विद्यापीठ महाकवी वामनदादा कर्डक यांनी
“भीमा विचार तुझा
पिंपळाचा पार आहे
सुखाचे द्वार आहे
शीलाचे भांडार आहे…”
हे ध्रुवपद करत तथागत बुद्ध, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनगाणे खेड्यापाड्यात-वाड्या-तांड्यार पोहचविले.
“बोल उठी हलचल, जमाना बदलेगा,
आज नहीं तो कल जमाना बदलेगा…
नहीं चलेगा जोर, यहां धन चोरों का,
बढ़ जाएगा बल, जमाना बदलेगा
यूं वामन जैसे गीत लिखने वालों को,
भूख से लढकर जीना सिखने वालों को मिल जाएगा फल, जमाना बदलेगा
आज नहीं तो कल, जमाना बदलेगा…!”
आजच्या स्मृतिदिनानिमित्त या ‘वादळ वा-याला’ अभिवादन करताना त्यांच्याच शब्दांत एवढेच म्हणावेसे वाटते…
व्हा रे खुशाल आता
नेता नव्या पिढीचा
माझ्या तरी पिढीचा
सरताज मीच आहे !
लेखनीलाच तलवार करून उभं आयुष्य जातदांडगे-धनदांडग्यांच्या विरोधात फ्रंटवर येऊन लढणा-या सेनानीला विनम्र अभिवादन !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत