महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक
कट्टर क्रांतियोद्धा भिमसैनिक – योगेश भाऊ रायपुरे


हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा पूर्णाकृती पुतळा यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहर मधील चौकात स्थित असून अंदाजे 10 वर्षापूर्वी त्याच शहरातील विकृत बुद्धीच्या व्यक्तीने रात्रीचे दरम्यान केव्हातरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या पुतळ्याला शेण फासले होते
दुसरे दिवशी ज्या वेळेस सकाळी काही लोक फिरण्यासाठी ये - जा करीत असता तसें केलेले कृत्य सगळ्यांनी पाहिले आणि सदरची बातमी ही वाऱ्यासारखी यवतमाळ जिल्ह्यात पसरली. परिसरातील, जिल्ह्यातील सगळे बौद्ध बांधव हे त्या स्थळी जमा झालेत. सगळ्यांनी त्या वेळेस स्थानिक पोलीस स्टेशन वणी गाठून रितसर निवेदन देऊन नीच कृत्य केलेल्या विकृत बुद्धीच्या माणसांना त्वरित अटक करावी असे लेखी निवेदन दिले होते.
लगेच तपासाला गती निर्माण झाली आणि बौद्ध समाजातील गटागटातील विभागलेले लोक एकत्र आलेत. त्यावेळेस ज्या व्यक्तीने कृत्य केले तो व्यक्ती किड्यासारखा वळवळ आमच्या संघटनेत करीत होता. बौद्ध समाजातील लोकांना थोडा फार शक किड्यासारखा वळवळ करणाऱ्या वणी शहरातील राजेश मेश्राम ( चिल्लर सांजीचा पत्रकार ) हा फुलमाळी समाजाचा होता. गुप्त खात्यातील व्यक्तींनी सुई समान धागा लावून शेवटी तपासांती पत्रकार राजेश मेश्राम यांचेच नाव समोर आले आणि त्याला अटक करून संबंधित न्यायालयाने दोन महिने जमानत दिली नाही. आरोपीला जमानात मिळाल्यानंतर ही तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर येऊन सिगारेट फुकत होता , वायफळ शब्दात बोलून बौद्ध समाजातील लोक माझे काहीही वाकडे करू शकत नाही, त्यांच्यात दम नाही असा चिडवीत होता.
यातच वरील शब्दात बोलत असलेला राजेश मेश्राम ह्याचे शब्द कानी पडल्यावर वणी शहरातील शरीरयष्टीने मजबूत असलेला " एका डोळ्यात ' शांती ' अन दुसऱ्या डोळ्यात ' क्रांती ' असलेला कट्टर, स्वाभिमानी भीमसैनिक आद. योगेश भाऊ रायपुरे यांनी ऐकले. " त्यांना राग अनावर झालामुळे नंगी धारदार तलवार आणून राजेश मेश्राम ह्याचे शिर विच्छेदन केले होते. रक्ताच्या थारोळ्यात राजेश मेश्राम तडफडत पडून राहिला आणि स्थानिक परिसरात जमलेले लोक काही पळून गेलेत , स्वाभिमानी भीमसैनिक योगेश भाऊ रायपुरेच्या सोबतीला असलेले भीमसैनिक योगेश भाऊ आगे बढो , हम तुम्हारे साथ है , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो , अशा गगनभेदी घोषणा देत भीमसैनिक - योगेश भाऊ रायपुरे हे रक्ताने माखलेली धारदार तलवार हातात घेऊन सरळ पोलीस स्टेशन गाठून तिथेच म्हणाला , " ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पत्रकार राजेश मेश्राम यांनी विटंबना केली त्याचे शिरविच्छेदन करून आलो आहे. मी आरोपी आहे मला अटक करा.....
तत्कालीन पोलीस स्टेशन अधिकारी ह्यांनी भीमसैनिक योगेश रायपुरे ह्यांना अटक करून, तपास पूर्ण करून तोपर्यंत संबंधित न्यायालयाने काही महिने जमानत न देता करागृहात बंदिस्त राहिला. भीमसैनिक योगेश रायपुरे ह्यांची जमानत घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे परिसरातील कमीत कमी 200 लोक तयार झाले होते. जो तो हिरहिरीने त्याची जमानत घेण्यासाठी पुढे सरसावत होते. " 19 महिन्याचे कालावधी नंतर भीमसैनिक योगेश रायपुरे कारागृहातून बाहेर आले आणि प्रत्येक तालुक्यात, शहरात आणि जिल्ह्यात बौद्ध समाजातील लोकांनी जंगी स्वागत केले होते. आजही मला त्या गोष्टीची जाण आहे"
शेवटी काही वर्षांनी संबंधित न्यायालयाने पुराव्या अभावी भीमसैनिक योगेश रायपुरे यांची निर्दोष सुटका केली. आजही वणी शहराचे परिसरातील लोक भीमसैनिक योगेश भाऊ रायपुरे यांच्याकडे कट्टर , स्वाभिमानी भीमसैनिक या नजरेने बघतात.. अशी त्यांची ओळख " शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस सिंहासारखे जगा " या युक्तीप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्व आहे ....
आपणा सर्वाना आपल्या जन्मदात्या आई - वडिलांनी जरी जन्म दिला असेल पण गुलामगिरीच्या बंधनातून आपणा सर्वांना मुक्त करून सुकर जीवन जगण्याचा मार्ग भारतीय राज्यघटना लिहून सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक प्रगती करा , उन्नतीचा मार्ग मोकळा करा तसेच न्यायदानाचा मार्ग मोकळा करून न्याय देणारे न्यायाधीशत्व तसेच अन्यायाचा प्रतिकार करण्यास शिकवणारे प्रज्ञावंत , विद्येचा महामेरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चारित्र्यावर किंवा पुतळ्यावर मनुवादीची विकृत पिलावळ असे कृत्य करून शिंतोडे उडवीत असतील तर ते कदापी खपवून घेणार नाही. म्हणूनच क्रांतीयोद्धा योगेश भाऊ रायपुरे ह्यांनी पाऊल उचलून वणी शहर परिसरात एक नवा इतिहासच रचवून दिला.... त्यांचे कार्य प्रेरणादायी असे आहे..
( आद. योगेश भाऊ रायपुरे ,
मोबा. नं.8888754091 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत