1974 च्या आंदोलनाचे विद्यार्थी नेते, बिहारचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचे निधन..
दैनिक जागृत भारत परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली..
नवी दिल्ली : बिहारमधील ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं सोमवारी रात्री एम्स येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झालं आहे. ते बिहार राज्यातील भाजपा चे सक्षम नेतृत्व होते. ते 72 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, एम्स येथे सुशील कुमार मोदी गेल्या काही काळापासून कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत होते. बिहारचे सध्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. ते कॅन्सरने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू होते. लोकसभा निवडणूक 2024 ची घोषणा होण्यापूर्वीच सुशील कुमार मोदी यांनी मीडियामध्ये या आजारपणाबाबत खुलासा केला होता.
भाजप, जेडीयू, आरजेडीनेही सह सर्व राजकीय पक्षांनी सामाजिक संघटनांनी शोक व्यक्त केला आहे. सुशील मोदीजी यांचे संपूर्ण आयुष्य बिहारला समर्पित होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की सुशील कुमार मोदी जेपी चळवळीचे खरे सैनिक होते आणि त्यांनी आमच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ काम केले. माझे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध होते आणि त्यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत