डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे साम्राज्य डोळ्यासमोर ठेवून भारतीय संविधान लिहिले आहे याचा पुरावा. – भंते महानाम.
1) भारत देशाची राजमुद्रा सम्राट अशोकाचे 4 सिंहाचे अशोक स्तंभ आहे
2) भारत देशाचे ब्रीद वाक्य ‘सत्यमेव जयते’ आहे ‘सत्यमेव जयते’ हे सम्राट अशोकाचे वाक्य आहे
3) भारत देशाच्या तिरंग्या झेंड्यावर सम्राट अशोकांचे 24 आरे असलेले धम्मचक्र आहे
4) “बहुजन हिताय बहुजन सुखाय” अशीच आपल्या भारत देशाची राज्यघटना आहे
“बहुजन हिताय बहुजन सुखाय” हे तथागत गौतम बुद्धांचे वाक्य आहे
5) भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारत रत्न मानले जाते
6) रत्न हा शब्द बौद्ध धम्माशी संबंधीत आहे
उदा. त्रिरत्न, धम्मरत्न, संगरत्न, दिपरत्न अनेक बौद्ध भिख्खूचे नाव रत्न असतात
7) भारत रत्न पुरस्कार पिंपळाचे पान आहे ज्या व्यक्तीला भारतरत्न सन्मानित केले जाते त्या व्यक्तीचे नाव सुवर्ण अक्षरात पिंपळाच्या पानावर कोरले जाते
8) भारत रत्न पुरस्कार देण्यासाठी पिंपळाचे पान का निवडले आहे कारण गौतम बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली सम्यक संबोधी आणि बुद्धत्व प्राप्त झाले आहे
9) भारतीय संसदेत ज्या खुर्चीवर राष्ट्रपती बसतो त्या खुर्चीवर अशोक स्तंभ म्हणजेच सम्राट अशोकाची राजमुद्रा आहे त्या राजमुद्राच्या वरच्या बाजूला ‘धर्मचक्र प्रवर्तनाय’ लिहिले आहे
‘धम्रचक्र प्रवर्तनाय’ या शब्दाचा अर्थ पाली भाषेत “धम्मचक्क” पवतनाय असा अर्थ होतो
10) भारतात सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणून ‘अशोक चक्र’ दिला जातो
11) समता, समानता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय हे शब्द बुद्धांशी निगडित आहेत
12) राष्ट्रपतींच्या शपथेसाठी केवळ बुद्धरूप साक्षीदार मानले आहे
13) राष्ट्रपतीच्या आसनाच्या भिंतीमागे धम्मचक्र प्रर्वतनाय हे ब्रीदवाक्य लिहिले आहे
सम्राट अशोकांनी जसे संपूर्ण राज्यात आणि जगात बुद्धविचार पेरण्याचे काम केले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात बुद्धविचार पेरले आहे
2,200 वर्षांपूर्वी जसे सम्राट अशोकांनी 84,000 बौद्ध स्तूप निर्माण करून भारत बुद्धमय केले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मातील चिन्ह वापरून भारताला बुद्धमय केले
नमो बुध्दाय जय भिम जय सम्राट अशोक जय संविधान जय भारत
– भन्ते. महानाम.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत