मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात 10 मे रोजी फेरमतदान होणार; बस ला आग लागल्याने 4 EVM मशीन जळून खाक.

मध्य प्रदेश येथील बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई विधानसभा मतदारसंघातील 4 मतदान केंद्रांवर 10 मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी अनुपम राजन यांना पत्र जारी केले आहे.
याबाबत निवडणूक आयोगाकडून मतदानाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बैतूलमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार पडले होते. तेव्हा तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर साहित्य घेऊन जाताना 7 मे रोजी बसला आग लागली होती होती. आगीमुळे बसमधील काही ईव्हीएम मशिन जळाले होते. त्यामुळे फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात 4 ठिकाणी 10 मे रोजी फेरमतदान पार पडणार आहे. बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई येथील 4 मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होणार आहे.
बूथ 275- राजापूर, बुथ 276- दुदर रयत, बुथ 279- कुंदा रयत आणि बुथ 280- चिखलीमाळ या ठिकाणी फेरमतदान होणार आहे. या फेर मतदानासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत