बारामतीत मतदानाचा टक्का घसरला; मतदारांना गृहीत धरणे, फोडा फोडीचे राजकारण व कौटुंबिक कलहाला जनता वैतागली.

बारामती: लोकसभा 2024 मध्ये देशात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. संपूर्ण देशाच लक्ष लागलेला बारामती मतदार संच यापैकी एक.
महाराष्ट्र राज्यात या लोकसभा निवडणुकीत मतदारांना गृहीत धरत वाट्टेल त्या पद्धतीने सत्तेत येण्यासाठी ची समीकरण बनवण्यात आली. पक्ष फोडा फोडी, आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवून ऐन निवडणुकीच्या काळात करण्यात आलेल्या कारवाया, नेत्यांच्या पक्षांतर उड्या या सगळ्या गोष्टी नेत्यांना योग्य वाटत असल्या तरी जनतेने मात्र यावर विचार केल्याचे दिसून येत आहे.
2024 मध्ये मतदानाचा टक्का घसरत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात 56.07% मतदान झालं. तर 2019 मध्ये 61% मतदान झालं होतं. बारामतीत झालेल्या विधानसभानिहाय मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यावरही याचं चित्र स्पष्ट होतंय..
भोरमध्ये यंदा 59% तर 2019 मध्ये 60.84% मतदान झालं होतं.
खडकवासल्यात यंदा 43 टक्के तर 2019 मध्ये मात्र 53.20 टक्के मतदान झालं होतं.
बारामतीमध्ये यंदा 64 टक्के मतदान झालं, तोच आकडा 2019 मध्ये 70.24 टक्के एवढा होता.
दौंडमध्ये यंदा 59 टक्के मतदान झालं, तेच 2019 मध्ये 64.05 टक्के एवढं मतदान झालं होतं.
पुरंदरमध्ये यंदा 48 टक्के तर 2019 मध्ये 60.48 टक्के मतदान झालं होतं.
इंदापूरमध्ये यंदा 61.82 तर 2019 मध्ये 64.39 टक्के मतदान झालं होतं.
याचा अर्थ बारामती लोकसभा मतदारसंघातील एकाही विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी इतकं किंवा त्यापेक्षा अधिक मतदान झालं नाही. अटीतटीच्या लढतीत मतदानाची टक्केवारी वाढणं अपेक्षित असताना राज्यातील इतर ठिकाणी बघायला मिळायला ट्रेण्ड बारामतीतही कायम राहिला; ही बाब अनपेक्षित म्हणावी अशीच आहे..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत