दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

राजश्री छत्रपती शाहू महाराज – स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

लोककल्याणकारी राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा ६ मे १९२२ रोजी स्मृतिदिन आहे.कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी घाडगे घराण्यातील यशवंत यास दत्तक घेतले १७ मार्च १८८४ रोजी आणि नामकरण झाले शाहू महाराज यांचा राज्याभिषेक इ. स.१८९४ पार पडला महाराजांचे शिक्षण राजकोट आणि धारवाड येथे पार पडले महाराजांनी सर्व दलित मुला मुलींची शिक्षणाची व्यवस्था मोफत केली शेतकऱ्यांचे प्रश्न पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था वीज निर्मिती यासाठी १९०९ सली राधानगरी धरण सुरुवात झाली १९५७ ला प्रकल्प पूर्ण झाला अशी नोंद इतिहासात आहे.कुस्तीला राजेश्री मिळवून दिला भटक्या जनावरांसाठी पांजरपोळ घोड्यांच्या देख साठी मोठी बाग गुळाची मोठी बाजारपेठ ही तयार केली,१९१७ विधवा पुन्हाविवाह कायदा,१९१९ मध्ये आंतरजातीय विवाहाचे कायद्याची मंजुरी दिली सर्व लोकांना समानतेचा दर्जा दिला ज्यावेळेस महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर १० पास झाले त्यावेळेस शाहू महाराजांनी हत्तीवर बसून साखर वाटली होती या दोन महापुरुषांच्या मध्ये भावनिक नातं होतं परंतु दिन दलितांबद्दल कनव आणि सामाजिक न्याय हा समान धागा होता १९२० आणि १९२१ या दोन वर्षात बाबासाहेबांनी आणि शाहू महाराजांनी पत्रव्यवहार सबनीस यांच्या दप्तरात आढळून आले पहिलं पत्र बाबासाहेबांनी मूकनायक कार्यालयातून लिहिलं शाहू महाराज नागपूरच्या परिषदेला येणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला,तर दुसरा पत्र ६ ऑक्टोंबर १९२१रोजी लंडनहून पाठवलं होतं आर्थिक अडचण आहे २०० पाउंड गरज असल्याचे व्यक्त केलं.तिसरा पत्र २० ऑक्टोंबर १९२१ रोजी या पत्रामध्ये बाबासाहेबांनी रक्कम मिळाली असे लिहिलेला आहे एकमेकांवर खूप प्रेम करायचे बाबासाहेबांना लंडनमध्ये ज्यावेळेस समजलं शाहू महाराजांचे निधन झालं.. त्यावेळेस त्यांना सर्वात जास्त दुःख झालं होतं त्यांचा खूप मोठा सहारा गेला होता छत्रपती घरांना आपल्यासाठी खूप महान आहेत त्यांचे उपकार कधीच विसरू नका,असे त्या लोककल्याणकारी राज्याचे निधन ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे झाले,आज त्यांची पुण्यतिथी आहे त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो व महाराजांना मानाचा मुजरा करतो

सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य..
आकाश दादा शिरसाट..
छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो
,,????जय भीम जय शिवराय ????????,,

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!