जाती छोडो समाज जोडो राष्ट्रीय बौद्ध एवं बहुजन अधिकार संमेलन


आपल्या देशातच काय तर सर्वच देशात एक काळ असा येतो की अज्ञानी लोकांचे राज्य येते.परंतु जेव्हा सत्य ज्ञान देणाऱ्यांचे आगमन होते तेव्हा हे अज्ञान आणि अज्ञानी पार दिसेनासे होतात.तथागत बुध्द,सॉक्रेटिस, रॉजर बेकन, गॅलिलिओ,अल्बर्टआईन्स्टाईन, न्यूटन , बाबासाहेब आंबेडकर या व अशा अनेक प्रकाशसूर्याचे आगमन झाल्यानंतर जगातील गडद अंधार दूर होण्यास मदत झाली.
जगात अनेक भाकड कथा रचल्या गेल्यात.या भाकड कथांवर अनेकांनी विश्वास देखील ठेवला. परंतु विज्ञानवादी, विचारवंत व शास्त्रज्ञांनी या कथा पार उद्ध्वस्त केल्याचे आपण पाहतो.
तारा मंडल बैठि के
चाँद बढाई खाय
उदै भया जब सूर का
तब तारा छिपी जाय
वर नभांगणात जेव्हा रात्रीची वेळ असते तेव्हा चंद्र आपला मोठेपणा ऐकवत असतो. फुशारक्या मारत असतो. परंतु जेव्हा सूर्याचा उदय होतो तेव्हा हे चंद्र, तारे पार दिसेनासे होतात लोप पावतात.
साध्याभोळ्या लोकांना काही धूर्त व स्वार्थी लोकं फसवतात पण हे काहीच काळ चालतं. जेव्हा ज्ञानसूर्याचा उदय होतो आणि तो आपल्या ज्ञानाच्या तेजाने असं दिपवून टाकतो की हे धूर्त व स्वार्थी लोकं पार कुठल्याकुठे पसार होतात.
देखन का सब कोय भलो
जैसे सित का कोट
रवि के उदै न दिस ही
बॅंधे न जल की मोट
पाहायला बर्फाचा किल्ला छान वाटतो.परंतु सूर्याचा उदय झाल्यावर हा बर्फाचा किल्ला पार वितळून जातो त्याचं पाण्यात रुपांतर होते आणि या वितळलेल्या पाण्याची मोळी बांधल्या जाऊ शकत नाही. ते एकत्रित केले जाऊ शकत नाही.
तात्पर्य काय… नकली, बेगडी लोकांचं ज्ञान हे क्षणिक असते.सत्यासमोर असत्य फार काळ टिकून राहू शकत नाही.
प्राचार्य वसंत वावरे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत