दिनविशेष 2 मे 2024

आज दि. २ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, गुरूवारो, चेत मासो, गुरूवार, चैत्र माहे.
२ मे १९०८ – रोजी पु. भ. डॉ. जगदीश काश्यप महाथेरो जयंती.
२ मे १९५० – रोजी दिल्ली येथे भगवान बुद्धांच्या २४९४ व्यां जयंतीनिमित्त विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धंम्माचां उघडपणे पुरस्कार केला.
२ मे १९५४ – रोजी मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये युथ असेंबलीचे उद्घाटन प्रसंगी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “तत्त्व आणि व्यवहाराची सांगड घातली नाही तर वरिष्ठ वर्गाचा निःपात होण्यास वेळ लागणार नाही.”
२ मे १९५४ – रोजी भंडारा येथे पोटनिवडणूक झाली. शेड्युल्ड कास्टस फेडरेशनतर्फे विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व काँग्रेस पक्षातर्फे बोरकर उभे होते. या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला. या निवडणुकीत मात्र बाबासाहेब विरोधी पक्षांना पुरून उरले.
२ मे १९५४ – रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विदर्भ साहित्य संघ नागपूरला भेट.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत