महापुरुषांची व महामातांची संयुक्त जयंती साजरी करणे हा स्तुत्य उपक्रम -ॲड. डॉ. डी. एस. सावंत सर
मालवणी मुंबई बहुजन अन्याय अत्याचार निर्मूलन कृती समिती द्वारे महापुरुष आणि महामातांची जयंती एक मे महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन आदरणीय श्याम झळके यांच्याद्वारे करण्यात आले होते. या प्रसंगी सह कामगार आयुक्त शरीन लोखंडे मॅडम, ॲड. डॉक्टर डी एस सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ डी एस सावंत यांनी सध्य राजकीय परिस्थितीचा खरपूस समाचार घेतला. आपल्या मनोगतात ते म्हणाले की अंधार युगाची सुरुवात झाली आहे, प्रबोधनाच्या मशाली पेटत्या ठेवल्या पाहिजेत. फिल्म इंडस्ट्री मधील मल्होत्रा साहेबांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाला आशीर्वाद दिले.
सह कामगार आयुक्त शरीन लोखंडे मॅडमनी आपल्या भाषणामध्ये कामगार कायद्यांचा आणि कामगारांच्या प्रश्नांचा आढावा घेतला व अनेक स्कीम्स बद्दल डिटेल माहिती देण्याचे काम केले. रिटायर एसीपी गंगावणे साहेब यांनीही खूप मोलाचे मार्गदर्शन केलं.
यावेळी रोजच्या धकाधकीच्या जीवनात सर्व कर्तव्य बजावत, जबाबदाऱ्या पार पाडत सामाजिक जाण ठेवून समाजकार्या तही मोलाचे कार्य करत असलेल्या आणि या सर्वातून वेळ काढत नुकतेच लॉ मध्ये PHD मिळवलेल्या आदरणीय ॲड. डॉ. डी एस सावंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरगच्च असा अविस्मरणीय सोहळा पार पडला त्याबद्दल आयोजक आयू झळके यांना सर्वांनी धन्यवाद दिले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत