निवडणुक आयोगाने आधीच प्रसिध्द केलेल्या आंकडेवारीपेक्षा अंतिम मतदानाच्या टक्केवारीत सुमारे ५.७५ टक्के वाढ
आज दिनांक २/५/२०२४ चा म.टा.तील बातमी —
लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिला टप्पा १९ एप्रील २०२४, १०२ जागेसाठी,तर दुसरा टप्पा २६ एप्रील २०२४,८८जागेसाठी मतदान झाले.
पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर ११ दिवसांनी आणि दुस-या टप्प्यातील मतदानानंतर ४ दिवसांनी निवडणुक आयोगाने मतदानाची अंतिम आंकडेवारी जाहिर केली.
निवडणुक आयोगाने आधीच प्रसिध्द केलेल्या आंकडेवारीपेक्षा अंतिम मतदानाच्या टक्केवारीत सुमारे ५.७५ टक्के वाढ झाली आहे.
या वाढीसंदर्भात माकपचे नेते सीताराम येचुरी,नुकतेच निवृत्त झालेले खासदार कुमार केतकर,कांग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश,तृणमूल कांग्रेसचे डेरेक ओब्रायन तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अंतिम मतदान आंकडेवारीतील वाढीबाबत संशय,प्रश्नचिन्ह उपस्थित केले असुन,भाजप कडुन निकालात फेरफार होण्याची भीती व्यक्त केली आहे.
यात आधीची टक्केवारी आणि अंतिमची टक्केवारी यात फरक, बदल ५.७५ टक्के वाढ कशी झाली, ही बाब संशयास्पद आहे.याचा अर्थबोध होत नाही. सत्यतेसाठी कोर्टाशिवाय पर्याय नाही. उमेदवार निवडून येण्यासाठी ही वाढीव टक्केवारी भाजपला उपयुक्त ठरु शकते.तसे निकाल आल्यास लोकशाहीला गंभीर धोका आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत