डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय प्रवासातील माणगाव परिषद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय प्रवासातील माणगाव परिषद एक अविस्मरणीय सौंदर्यस्थळ होय. या ऐतिहासिक परिषदेला आज 21 मार्चला 105 वर्षे पूर्ण झाली.
1920 मध्ये कोल्हापूरजवळील माणगाव येथे दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे अधिवेशन झाले. हे अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले होते. विशेष म्हणजे या अधिवेशनाला प्रामुख्याने शाहू महाराज यांची उपस्थिती होती.
या परिषदेत राजर्षी शाहू महाराज आपल्या भाषणात म्हणतात की, “तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात त्याबद्दल अंतःकरणपूर्वक अभिनंदन ! माझी खात्री आहे की, भीमराव तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. एक वेळ येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील! “साक्षात शाहू महाराजांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याने बाबासाहेबांना नव्या उमेदी , नव्या जाणिवा नव्या प्रेरणा मिळाल्या…नवी उर्जा मिळाली !! तसेच या दोन्ही महामानवातील ऋणानुबंध जास्त घट्ट होत गेला…
पुढे बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण देशाचे नेते
झाले !!!
महाराजांच्या कार्याचा गुणगौरव करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,”शाहू महाराजांची जयंती सणासारखी धुमधडाक्यात साजरी करा..!” ही असते सामाजिक कार्याची उदार अंतःकरणाने घेतलेली नोंद… हे असते ऋणाचे मनापासून अधोरेखाटन !!
निर्भेळ कृतज्ञता !!!
राजर्षी शाहू आणि संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत नि अपेक्षित समताधिष्ठित भारत निर्माणासाठी त्यांच्या संदेशांचा अन्वयार्थ लावत वाटचाल करणं हेच त्यांना सच्चे अभिवादन ठरेल…!
जय भीम !
जय संविधान !!
जय भारत !!!
भीमप्रकाश गायकवाड,
‘मूकनायक’,
रविराजपार्क, परभणी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत