हे लोक अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा प्रयत्न करत आहेत ! – सुनीता केजरीवाल यांचे गंभीर आरोप
नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात वेगळा आदर्श निर्माण करणारे राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या ED चौकशी साठी तुरुंगात आहेत. यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी आज रांची येथील इंडिया आघाडीच्या जाहीर सभेत भाजपावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. भाजपा तिहार जेलमध्येच अरविंद केजरीवाल यांची हत्या करण्याचा कट आखत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच अरविंद केजरीवाल यांना खाण्यात दिल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थावर प्रशासन लक्ष ठेवत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
“अरविंद केजरीवाल काय खातात यावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसवले आहेत यापेक्षा लाजिरवाण काय असू शकत ? त्यांनी घेतलेल्या प्रत्येक घासावर लक्ष ठेवलं जात आहे. ते शुगर पेशंट असून गेल्या 12 वर्षांपासून इंसुलिन घेत आहेत. पण जेलमध्ये त्यांना इंसुलिन नाकारली जात आहे. त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची हत्या करायची आहे,” असा गंभीर आरोप सुनिता केजरीवाल यांनी केला आहे.
पुढे बोलताना सुनिता केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना दोषी सिद्ध न करता तुरुंगात टाकल्याबद्दल विद्यमान सरकारला ‘हुकूमशाही’ म्हटलं. “त्यांनी अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना जेलमध्ये टाकलं आहे. त्यांना दोषी सिद्ध न करताच जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. ही हुकूमशाही आहे. माझ्या पतीचा काय दोष आहे? चांगला शिक्षण, आरोग्य सुविधा देणं ही चूक आहे का?,” अशी विचारणा सुनिता केजरीवाल यांनी केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लोकांसाठी आपला जीव पणाला लावला आहे, असंही त्या म्हणाल्या. “ते एक IITan आहेत. ते परदेशात जाऊ शकले असते, पण ते देशभक्तीला प्राधान्य देताता. IRS असतानाही सार्वजनिक सेवा करण्यासाठी त्यांनी रजा घेतली. त्यांनी लोकांसाठी आपला जीव पणाला लावला,” असं त्या म्हणाल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत