एका विशिष्ट समाजाचे स्थान अबाधित ठेवण्यासाठीच काल्पनिक धर्म ग्रंथांची निर्मिती..!
समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी धर्मग्रंथाची निर्मिती केली जाते.आपण कुठले धर्मग्रंथ मानतो त्यावर आपण कोणत्या समाजव्यवस्थेचे घटक आहोत हे स्पष्ट होत असते. आपणास या समाजव्यवस्थेत विषमता, गुलामी,भेदभाव आणि अन्याय सहन करावा लागत असेल तर समजून जा, हे धर्मग्रंथ त्यांनी लिहिले आहेत जे उच्चस्थानी आणि अधिकार संपन्न आहेत. हे स्थान अबाधित ठेवण्यासाठीच त्यांनीच काल्पनिक धर्म ग्रंथ निर्माण केले आहेत.
हे काल्पनिक धर्मग्रंथ म्हणजे धार्मिक दहशतवाद आहे.वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था हा धार्मिक दहशतवाद आहे. हा दहशतवाद धर्मग्रंथांची समीक्षा केल्या शिवाय संपवता येणे कदापि शक्य नाही. धर्मग्रंथातील अनुभव शुन्य कल्पित कथा मानवाला बौद्धिक पंगु बनवण्यासाठी लिहिल्या गेल्या आहेत.चमत्कार आणि दगडाच्या देवाला नमस्कार करणाऱ्या लोकांची तर्कबुद्धी धर्मग्रंथांनी संपवून टाकली आहे.मानवी उत्क्रांतीला खिळ घालणाऱ्या या धर्मांना आणि धर्मग्रंथांना संपवल्याशिवाय समता,स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करता येणे शक्य नाही.
आयु. संतोष मधुकर पाटणकर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत