मोदी सरकारला हटवावेच लागेल – राहुल गांधीनी भारतीय रेल्वेची दुरावस्था दाखवत केले आवाहन.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी शहा यांच्या सततच्या टीकेला उत्तर देण्यासाठी एक धक्कादायक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करुन सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. 70 वर्षात काँग्रेस ने काय केले हे विचारणाऱ्या भाजपा ला या व्हिडिओ द्वारे राहुल गांधी यांनी मागच्या 10 वर्षात भाजपा सरकारने भारतीय रेल्वेची किती दुरवस्था केली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय रेल्वेचा एक व्हिडीओ शेअर करुन मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. वायनाडचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स हँडलवरुन नवी दिल्ली ते तिरुअनंतपुरम धावणाऱ्या केरळ एक्सप्रेस ट्रेनचा व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये प्रवासी ट्रेनच्या एसी कोचमध्ये टॉयलेटजवळ बसलेले दिसत आहेत. कोचच्या आतही बरीच गर्दी दिसत आहे. प्रवासी अगदी दाटीवाटीने बसलेले असून अन्य प्रवाशांना तर ट्रेनमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळणार नाही अशी परिस्थिती आहे.
नरेंद्र मोदींच्या राजवटीत ‘रेल्वे प्रवास’ ही शिक्षा झाली आहे. सर्वसामान्यांच्या गाड्यांमधून जनरल डबे कमी करून केवळ ‘एलिट ट्रेन्स’चा प्रचार करणाऱ्या मोदी सरकारकडून प्रत्येक वर्गातील प्रवाशांना त्रास दिला जात आहे. कन्फर्म तिकीट घेऊनही लोकांना त्यांच्या जागेवर शांतपणे प्रवास करता येत नाहीये. मोदी सरकारला आपल्या धोरणांनी रेल्वे कमकुवत करून स्वतःला ‘अक्षम’ सिद्ध करायचे आहे, जेणेकरून ती आपल्या मित्रांना विकण्याचे निमित्त त्यांना मिळू शकेल. सर्वसामान्यांचा प्रवास वाचवायचा असेल, तर रेल्वेची नासाडी करण्यात मग्न असलेल्या मोदी सरकारला हटवावे लागेल,” असे राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत