कुस्तीपटू विनेश फोगट चा आशियाई ऑलिम्पिक पात्रता अंतिम फेरीत प्रवेश; खेळाडूंचे लैंगिक शोषण प्रकरणी भाजपा च्या ब्रिजभूषण सिंह यांना टक्कर देणारी लढवय्यी.
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरूद्ध महिला खेळाडूंचे लैंगिक शोषणाच्या आरोप केलेल्या कुस्तीपटूंपेकी एक असलेल्या विनेश फोगट हीने महिलांच्या 50 किलो वजनी गटात पॅरिस 2024 कोटा जिंकला, आशियाई ऑलिम्पिक पात्रता अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारताच्या विनेश फोगटने शनिवारी आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या लॉरा गानिकिझीचा 10-0 असा पराभव करत पॅरिस 2024 प्रवेश केला आहे. कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्स चॅम्पियन फोगटने 4:18 मिनिटांत कझाक कुस्तीपटूविरुद्ध तांत्रिक श्रेष्ठतेद्वारे सामना जिंकला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत