मोदी शहा यांना आचारसंहितेतून सुट आहे का ? आधी भाजपा वर कारवाई करा मग आम्हाला नोटीस पाठवा..- उध्दव ठाकरे यांचे निवडणूक आयोगाला पत्र
mumbai : कायद्या समोर सर्व समान हे भारतातील संवैधनिक वैशिष्ट आहे. परंतु स्वायत्त संस्था असलेले निवडणूक आयोग मात्र भाजपा ला वेगळी वागणूक व इतरांना वेगळी अशा पद्धतीने वागत असल्याची तक्रार काल उध्दव ठाकरे यांनी केली.
शिवसेना उबाठा यापक्षाने आपलं प्रचार गीत मशाल लॉन्च केलं. या गाण्यामध्ये ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू हा तुझा धर्म’ हे शब्द असल्यामुळे निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना नोटीस बजावली. ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू हा तुझा धर्म’ हे शब्द काढा अशी नोटीस निवडणूक आयोगाने ठाकरेंना पाठवली.
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत ऑडियो क्लिप ऐकवली. यामध्ये नरेंद्र मोदी बजरंग बली की जय बोलून बटण दाबा असं म्हणताना दिसत आहेत. तर अमित शहा हे आमचं सरकार आल्यावर प्रभू श्रीरामाचं दर्शन मोफत करु, असं सांगत आहेत. त्यामुळे मोदी, शहांनी धार्मिक प्रचार केला तर चालतो का, त्यांच्यासाठी नियम वेगळे आहेत का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केला. तसेच, आधी मोदी, शहांवर कारवाई करा असंही ते म्हणाले.
आम्ही निवडणूक आयोगाला म्हटलं होती की तुम्ही आधी उत्तर द्या, जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर तुम्ही नियम बदलले आहेत असं गृहित धरुन आम्हीही असा प्रचार केला तर तुम्हाला आमच्यावर कारवाई करता येणार नाही, अन्यथा जर नियम बदलला नसेल तर त्याच्यावर काय कारवाई केली ते आम्हाला सांगा, असंही ठाकरे म्हणाले. आम्ही जय भवानी म्हणणारच, या भूमिकेवर ठाम असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत