आरोग्यविषयकमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

“देवांवर विश्वास एक मानसिक आजार…!!!”

“देवावर श्रध्दा ” ह्या विषयावर अमेरिकेत अनेक वर्षापासुन संशोधन सुरु होत.
शेवटी “देवावर श्रध्दा हा मानसिक आजार आहे” असे तेथील Psychological Association नी जाहीर केले.
सर्वप्रथम भारतात “चार्वाक” यांनी असे म्हटले की प्रमाणाशिवाय कशालाही मान्यता देवु नये”.
त्यानतर बुध्द आले. बुध्द हे मनोवैज्ञानिक (Human Scientist) होते. त्यांनी
यावर अनेक वर्ष चिन्तन (meditation) केले.
शेवटी त्यांनी देव ह्या शब्दालाच तिलांजली दिली.
बुध्द म्हणतात एखादी गोष्ट अनुश्रयावरुन म्हणजे ऐकीव माहितीवरुन स्वीकारु नका.
परंपरा आहे म्हणुन स्वीकारु नका.
कोणी तरी असे असे आहे म्हणून स्वीकारु नका.
एखादी गोष्ट पिटकातून आली आहे एवढ्यावरुन स्वीकारु नका.
बाह्य रुपाचा विचार करुन स्वीकारु नका.
अंदाज बांधण्याचा आनंद मिळतो म्हणून स्वीकारु नका.
( किंवा एखादी गोष्ट आपल्या मताला अनुकूल आहे म्हणून स्वीकारु नका.)
(सांगणा-याचे) सुंदर रुप पाहुन स्वीकारु नका. (किवा संभाव्यता आहे एवढ्यावरुन स्वीकारु नका.)
हा श्रमण आपला गुरु आहे,असा विचार करुन स्वीकारु नका.
अशाप्रकारचे विचार पसरवुन बुध्दानी माणसाच्या मनामध्ये बुध्दिप्रामाण्य
वाद रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे.शिवाय इतर अवैज्ञानिक रुढी, परंपरा, देव याचा समावेश धम्मात होवु नये, याची पुरेसी काळजी बुध्दाने घेतलेली आहे.
यानंतर बुध्द धम्माची पिछेहाट झाली.
मनुवाद पुढे आला आणि बुध्दिप्रामण्यवाद मागे पडला.
बुध्दाचे मुळतत्वज्ञानचा आपल्याला विसर पडला.
भारतात मानवी मेंदू गोठवण्याचे तत्वज्ञान पेरण्यात आले.
परिणाम हा झाला की त्यामुळे
धर्म विरुध्द विज्ञान ही लढाई फक्त युरोप मधेच सुरु झाली.
भारतामध्ये ही लढाई सुरु झालीच नाही,
आजही आपण विज्ञान स्वीकारत नाही. आपण फक्त तंत्रज्ञान स्वीकारतो.
आपल्या देशात
अणुभट्टीमधे काम करणारा माणुस सुध्दा भलमोठे गंध लावून जातो.
इथल्या धर्मग्रंथानी विचार निर्माण होण्याकरिता माणसामधे मेंदूच शिल्लक ठेवला नाही.
ईश्वर कोणीही पाहीलेला नाही, त्याला काहीही प्रमाण नाही.*तरीही आपण *त्याचे पुजन करतो.
त्याचे नमन करतो. मला जे काही मिळालेले आहे*ते *ईश्वराच्याच कृपेने मिळालेले
आहे असे मानतो.
ही मानसिक गुलामगिरी आहे.जे मुळात अस्तित्वाचच नाही. त्याला मान्यता देणे, त्याची पुजा करणे ही मानसिक विकृतीच आहे.
हा मानसिक आजार आहे.
अमेरिकेतील Psychological Association नी जगासमोर मांडलेले संशोधन हा चार्वाक आणि बुध्द विचारांचा विजय आहे.
*पुन्हा एकदा देवाच विसर्जन करुया, अंधश्रद्धेच्या बेड्या तोडुया.देव,धर्म , रुढी ,परम्परा, कर्मकांड,भविष्य ,बुवाबाजी अंधश्रध्देचा हा हजार पायांचा ऑक्टोपस आहे, याला कायमचे मनातुन काढुन व्यक्तिस्वातंत्र्याचे आत्मतत्वच गहाण टाकणा-या देवाला रिटायर करुया.. डॉक्टर श्रीराम लागू.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!